अबबब… हे फक्त गुजरातमध्येच घडू शकतं… 186 लग्झरी कार खरेदी करून वाचवले 21 कोटी? कसे? काय आहे देशी जुगाड?

Jito: जैन समुदायाची संघटना असलेल्या जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या (JITO) एका निर्णयाने सर्वाचे लक्ष वेधले आहे. या संघटनेने एकत्रितपणे 186 लक्झरी कार खरेदी केल्या, यामुळे संघटनेला 21 कोटी रूपयांचा फायदा झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अबबब... हे फक्त गुजरातमध्येच घडू शकतं... 186 लग्झरी कार खरेदी करून वाचवले 21 कोटी? कसे? काय आहे देशी जुगाड?
Car Deal
| Updated on: Oct 18, 2025 | 10:24 PM

भारतातील गुजरात या राज्यातील नागरिकांची विचारसरणी ही वेगळी आहे. या राज्यातील लोक आपल्या व्यावसायिक कौशल्य आणि दूरदर्शी विचारसरणीसाठी ओळखले जाते. अशातच आता पैसे कमावण्यापेक्षा ते खर्च करण्यासाठी जास्त डोकं लागतं याचं एक उत्तम उदाहरण समोर आलं आहे. जैन समुदायाची संघटना असलेल्या जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या (JITO) एका निर्णयाने सर्वाचे लक्ष वेधले आहे. या संघटनेने एकत्रितपणे 186 लक्झरी कार खरेदी केल्या, यामुळे संघटनेला 21 कोटी रूपयांचा फायदा झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

एकत्र कार खरेदी करणे फायदेशीर

जैन आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या भारतातील 186 सदस्यांनी ऑडी, बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज या ब्रँडच्या लक्झरी कार खरेदी केल्या. या सर्व कारच्या किमती 60 लाख रुपयांपासून ते 1.34 कोटी रुपयांपर्यंत होत्या. अहमदाबाद आणि गुजरातमधील इतर अनेक शहरांमधील जैन सदस्यांनी या गाड्या खरेदी केला. JITO चे उपाध्यक्ष हिमांशू शाह यांनी याबाबत म्हटले की, जेव्हा लोक एकत्र कार खरेदी करतात तेव्हा कंपन्यांना एकाच वेळी जास्त विक्री झाल्याने फायदा होतो. त्यामुळे कंपन्या खरेदीदारांना सवलती देतात.

जैन संघटनेने एकाच वेळा 186 कार खरेदी केल्या आहेत. त्यामुळे सदस्यांना मोठ्या सवलती मिळाल्या आहेत. यामुळे कंपनीचा अतिरिक्त जाहिरात खर्च वाचला. जैन संघटनेने 149.54 कोटी किमतीच्या लक्झरी कार खरेदी केल्या. यावर संघटनेला एकत्र कार खरेदी केल्यामुळे 21.22 कोटींची बचत झाली आहे. ही डील जैन संघटनेसाठी खास ठरली आहे.

ही संकल्पना इतर क्षेत्रांमध्येही फायदेशीर ठरू शकते

कार खरेदीत झालेल्या फायद्यानंतर संस्थेने कम्युनिटी पर्चेसिंग नावाची एक नवीन शाखा तयार केली आहे. संघटनेच्या सदस्यांनी एकत्र येऊन एखादी वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी करून पैसे वाचवणे हा या संकल्पनेमागील हेतू आहे. यामुळे प्रत्येक सदस्याला परवडणाऱ्या किमतीत उत्पादने मिळण्यास मदत होणार आहे. हे मॉडेल आता कारपुरते मर्यादित राहणार नाही. आगामी काळात याच पद्धतीने इलेक्ट्रॉनिक्स, दागिने, औषधे आणि इतर उत्पादने खरेदी करणार आहे.

भरवाड समुदायाने घेतली प्रेरणा

जैन संघटनेनंतर आता गुजरातमधील भरवाड समुदायानेही या मॉडेलपासून प्रेरणा घेतली आहे. भरवाड युवा संघटनेने अलीकडेच एकत्रितपणे 12 जेसीबी मशीन खरेदी केल्या, ज्यामुळे प्रत्येक मशीनवर 3.3 लाखांची सूट मिळाली आहे. त्यामुळे भरवाड समुदायाची 4 कोटी रूपयांची बचत झाली आहे.