J&K DDC election: जम्मू-काश्मीरमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, पण गुपकार आघाडीची बहुमताकडे वाटचाल

भाजप जम्मू-काश्मीरमधील सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. मात्र, तरीदेखील विजय भाजपच्या ऐवजी गुपकार आघाडी बाजूला जाण्याची शक्यता जास्त आहे (Jammu and Kashmir DDC election result).

J&K DDC election: जम्मू-काश्मीरमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, पण गुपकार आघाडीची बहुमताकडे वाटचाल
| Updated on: Dec 22, 2020 | 11:10 PM

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या जिल्हा विकास परिषदेच्या (डीडीसी) निवडणुकीचा निकाल (Jammu and Kashmir DDC election result) जवळपास स्पष्ट होत आला आहे. 280 जागांपैकी 229 जागांचा निकाल समोर आला आहे. आतापर्यंत समोर आलेल्या निकालांनुसार या निवडणुकीत भाजपने चांगलीच मुसंडी मारलेली दिसत आहे. अजूनही 51 जागांचा निकाल समोर येणं बाकी आहे. मात्र, सध्याच्या घडीचं वातावरण पाहता भाजप जम्मू-काश्मीरमधील सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. मात्र, तरीदेखील विजय भाजपच्या ऐवजी गुपकार आघाडी बाजूला जाण्याची शक्यता जास्त आहे (Jammu and Kashmir DDC election result).

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरची स्वायत्ता काढून घेतल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी जम्मू-काश्मीरच्या स्थानिक पक्षांकडून गुपकार आघाडीची स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, पीपल्स कॉन्फरन्स, आवामी नॅशनल कॉन्फरन्स, जम्मू-काश्मीर पीपल्स मुव्हमेंट, सीपीआय आणि सीपीएम अशा एकूण सात पक्षांचा समावेश आहे.

भाजप 65 जागांवर विजयी

आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार भाजपने 65 जागांवर एकहाती विजय मिळवला आहे. भाजपला सर्वाधिक यश जम्मूत आलं आहे. काश्मीर घाटात मुस्लीम समुदाय जास्त आहे. या भागात गुपकार गटाला चांगलं यश मिळालं आहे. मात्र, या भागातही भाजपने खातं उघडल्याची माहिती समोर आली आहे. तुलाल आणि काकपोरा या दोन ठिकाणी भाजपला यश आलं आहे.

भाजपचा ऐतिहासिक विजय

भाजपने काश्मीर खोऱ्यात खातं खोललं आहे. श्रीनगरच्या बल्हमा मतदारसंघात भाजपचे उमेदवार ऐजाज हुसैन विजयी झाले आहे. काश्मीर खोऱ्यात भाजपला कधीच विजय मिळाला नव्हता. पहिल्यांदाच त्यांना विजय मिळाल्याने भाजपसाठी हा ऐतिसिक विजय असल्याचं मानलं जात आहे. बांदीपोरा जिल्ह्यातील तुलाल जागेवर आणि पुलवामा जिल्ह्यातील काकपोरा जागेवरही भाजपने विजय मिळवला आहे.