जम्मू-काश्मीरमध्ये गुपकार गटाची आघाडी; भाजप दुसऱ्या क्रमांकावर; वाचा संपूर्ण रिपोर्ट!

जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून सुरुवातीच्या कलांमध्ये गुपकार गटाला येथील जनतेने कौल दिल्याचं चित्रं आहे. (Ddc Elections Results: Big Lead For Farooq Abdullah-Led Gupkar Alliance In J&K Local Polls)

जम्मू-काश्मीरमध्ये गुपकार गटाची आघाडी; भाजप दुसऱ्या क्रमांकावर; वाचा संपूर्ण रिपोर्ट!
भीमराव गवळी

|

Dec 22, 2020 | 2:46 PM

श्रीनगर: जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून सुरुवातीच्या कलांमध्ये गुपकार गटाला येथील जनतेने कौल दिल्याचं चित्रं आहे. गुपकार गट 88 जागांवर आघाडीवर त्यांच्या चार उमेदवारांनी आतापर्यंत विजय मिळविला आहे. भाजप 43 जागांवर आघाडीवर असून त्यांच्या एका उमदेवाराला विजय मिळविता आला आहे. तर काँग्रेसने 20 जागांवर आघाडी घेतली असून त्यांचाही एक उमेदवार विजयी झाला आहे. हे सुरुवातीचे कल असले तरी संध्याकाळपर्यंत या निवडणुकीचं चित्रं पूर्णपणे स्पष्ट होणार आहे. (Ddc Elections Results: Big Lead For Farooq Abdullah-Led Gupkar Alliance In J&K Local Polls)

केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरची स्वायत्ता काढून घेतल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर गुपकार आघाडी स्थापन करण्यात आली आहे. नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी, पीपल्स कॉन्फरन्स, आवामी नॅशनल कॉन्फरन्स, जम्मू-काश्मीर पीपल्स मुव्हमेंट, सीपीआय आणि सीपीएम आदी सात पक्ष या गुपकार आघाडीत सामिल आहेत.

280 जागांचा निकाल लागणार

जिल्हा विकास परिषदेच्या 280 जागांसाठी जम्मू-काश्मीरमध्ये मतदान झालं होतं. आठ टप्प्यात या निवडणुका पार पडल्या होत्या. या निवडणुकीत एकूण 4 हजार 181 उमेदवार उभे होते. त्यात 450 महिलांचा समावेश होता.

जनतेचा कौल गुपकारला

भाजपने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. भाजपने या ठिकाणी प्रचाराचा जोरही लावला होता. पण सात पक्षांनी एकत्र येऊन आघाडी केल्याने भाजप या निवडणुकीत बाजी मारेल की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात होती. आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा भाजपने गुपकार गटाला मागे टाकत आघाडीही घेतली होती. मात्र, दुपारनंतर हे चित्रं पूर्णपणे पालटलं असून पुन्हा एकदा गुपकार गटाने आघाडी घेतली आहे. आतापर्यंत कलांमध्ये गुपकार गटाने 88, भाजपने 43 आणि काँग्रेसने 20 जागांवर आघाडी घेतली आहे. अपनी पार्टीनेही सहा जागांवर आघाडी घेतली असून अपक्ष उमेदवारांनी 43 जागांवर आघाडी घेतली आहे.

निकालातही गुपकार आघाडीवर

सुरुवातीच्या कलानुसार गुपकार गट आघाडीवर असला तरी निकालातही गुपकारने आघाडी घेतली आहे. गुपकार गटाते आतापर्यंत ४, भाजप, अपनी पार्टी आणि काँग्रेसचा प्रत्येकी १ आणि सात अपक्ष आमदार निवडून आले आहेत.

भाजपचा ऐतिहासिक विजय

भाजपने काश्मीर खोऱ्यात खातं खोललं आहे. श्रीनगरच्या बल्हमा मतदारसंघात भाजपचे उमेदवार ऐजाज हुसैन विजयी झाले आहे. काश्मीर खोऱ्यात भाजपला कधीच विजय मिळाला नव्हता. पहिल्यांदाच त्यांना विजय मिळाल्याने भाजपसाठी हा ऐतिसिक विजय असल्याचं मानलं जात आहे. (Ddc Elections Results: Big Lead For Farooq Abdullah-Led Gupkar Alliance In J&K Local Polls)

काश्मीरमधील कल

>> भाजप- 04 >> गुपकार- 47 >> काँग्रेस- 10 >> अपनी पार्टी- 8 >> अन्य- 34

जम्मूतील कल

>> भाजप- 62 >> गुपकार- 15 >> काँग्रेस- 15 >> अपनी पार्टी- 2 >> अन्य- 26

174 जागांचे कल

>> गुपकार- 64 ( 62 जागांवर आघाडी, 2 जागांवर विजय) >> भाजप- 48 >> काँग्रेस- 19 (18 जागांवर आघाडी, एका जागेवर विजय) >> अपनी पार्टी- 5 (4 जागांवर आघाडी, एका जागेवर विजय) >> अन्य- 38 (31 जागांवर आघाडी, 7 जागांवर विजयी) (Ddc Elections Results: Big Lead For Farooq Abdullah-Led Gupkar Alliance In J&K Local Polls)

संबंधित बातम्या:

Photo ! जम्मू-काश्मीरमध्येही निवडणुकीचे वारे; जिल्हा विकास परिषदेसाठी शांततेत मतदान

अलिगढ मुस्लिम विद्यापीठात ‘मिनी इंडिया’, मोदींकडून पुन्हा ‘सबका साथ’चा नारा

ममतांच्या मदतीला पवार, प्रचारही करणार?

(Ddc Elections Results: Big Lead For Farooq Abdullah-Led Gupkar Alliance In J&K Local Polls)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें