दहशतवादी अफजल गुरुचा भाऊ विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात, कोणी दिली उमेदवारी?

Jammu Kashmir Election: सोपोर विधानसभा मतदार संघ जमात-ए-इस्लामीचा बालेकिल्ला आहे. जमातच्या आवाहनावर सोपोर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीवर एकेकाळी पूर्ण बहिष्कार टाकण्यात आला होता. गेल्या 50 वर्षांपासून सोपोरकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत एजाज निवडणुकीत उतरला आहे.

दहशतवादी अफजल गुरुचा भाऊ विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात, कोणी दिली उमेदवारी?
ejaz guru
Follow us
| Updated on: Sep 17, 2024 | 4:11 PM
Jammu Kashmir Election: जम्मू काश्मीरमध्ये दहा वर्षानंतर विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी विविध पक्षांनी उमेदवार जाहीर केले आहेत. भाजप, काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांसह स्थानिक पक्षसुद्धा आहे. निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची भाऊगर्दी झाली आहे. बंदी असलेल्या जमात-ए-इस्लामीपासून इंजिनिअर रशिद याच्या अवामी इत्तेहाद पार्टीपर्यंत अनेक राजकीय पक्षांचे नेते आणि फुटीरतावादी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. संसद हल्ल्यातील दोषी अफजल गुरूचा भाऊ एजाज गुरू सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. अफझल गुरूचा भाऊ एजाजही आमदार बनण्याचे स्वप्न पाहत आहे. बारामुल्ला येथील डेलिना येथील रहिवासी असलेल्या इजाज याने सोपोर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

कोण आहे एजाज गुरु

संसदेवर हल्ल्याचा कट रचल्याप्रकरणी दोषी ठरलेला अफजल गुरू यांचा भाऊ एजाज गुरू आहे. संसद हल्ल्यात दोषी ठरल्यानंतर 2013 मध्ये अफजल याला फाशी देण्यात आली होती. 58 वर्षीय एजाज गुरु हा नववी पास आहे. त्याने पशुसंवर्धन विभागातही काम केले आहे. नोकरीतून व्हीआरएस घेऊन ठेकेदारी सुरु केली आहे. निवडणूक जाहीरनाम्यात दिलेल्या माहितीनुसार, एजाज गुरु याच्याकडे 50 लाख रुपयांची संपत्ती आहे. तसेच आठ लाख रुपयांची चल संपत्ती आहे. त्याच्या नावावर सहा लाख रुपयांचे बँकेचे कर्ज आहे. त्याच्या पत्नीकडे तीन लाखांची संपत्ती आहे.

का लढवत आहे निवडणूक

विधानसभा निवडणूक लढवणारे एजाज गुरू म्हणतो की, मी भावाच्या नावावर मते मागणार नाही. माझी विचारधारा माझ्या भावाच्या विचारसरणीपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. माझा मुलगा शोएब इजाज गुरु याला अंमली पदार्थांच्या तस्करीच्या प्रकरणात अटक केली. यामुळे आपण निवडणूक लढवत असल्याचे एजाजने सांगितले.

हे सुद्धा वाचा

विकास आणि एकात्मतेवर भर

सोपोर विधानसभा मतदार संघ जमात-ए-इस्लामीचा बालेकिल्ला आहे. जमातच्या आवाहनावर सोपोर विधानसभा मतदारसंघात निवडणुकीवर एकेकाळी पूर्ण बहिष्कार टाकण्यात आला होता. गेल्या 50 वर्षांपासून सोपोरकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करत एजाज निवडणुकीत उतरला आहे. या ठिकाणी जुने वैभव परत मिळवून देण्याचे आश्वासन तो देत आहेत. विकास आणि एकात्मतेबद्दल तो बोलत आहेत.

'ठाकरेंना CM करण्यास भाजप तयार...', शिंदे गटाच्या नेत्याचा दावा काय?
'ठाकरेंना CM करण्यास भाजप तयार...', शिंदे गटाच्या नेत्याचा दावा काय?.
बारामतीत अजित पवारांचे समर्थक हट्टाला पेटले, ताफा अडवत काय केली मागणी?
बारामतीत अजित पवारांचे समर्थक हट्टाला पेटले, ताफा अडवत काय केली मागणी?.
'सकाळच्या भोंग्याला विचारायचंय, आता कसं...', फडणवीसांनी राऊतांना डिवचल
'सकाळच्या भोंग्याला विचारायचंय, आता कसं...', फडणवीसांनी राऊतांना डिवचल.
हरियाणात भाजप मोठा पक्ष, बहुमतानं सत्ता स्थापन करणार? काय सांगतो कल?
हरियाणात भाजप मोठा पक्ष, बहुमतानं सत्ता स्थापन करणार? काय सांगतो कल?.
सुरजनं पटकावली बिग बॉसची ट्रॉफी, बारामतीत जंगी स्वागत होताच म्हणाला...
सुरजनं पटकावली बिग बॉसची ट्रॉफी, बारामतीत जंगी स्वागत होताच म्हणाला....
'ए शहाण्या, खोटं कशाला सांगतो?', भरसभेत अजितदादा नेमकं कोणावर संतापले?
'ए शहाण्या, खोटं कशाला सांगतो?', भरसभेत अजितदादा नेमकं कोणावर संतापले?.
तुतारी पक्ष मुस्लिम लीगचा पार्टनर? राणेंचा हल्लाबोल, काय केलं वक्तव्य?
तुतारी पक्ष मुस्लिम लीगचा पार्टनर? राणेंचा हल्लाबोल, काय केलं वक्तव्य?.
विनेश फोगाटनं भाजप उमेदवाराला चितपट करत विधानसभेची कुस्ती जिंकली
विनेश फोगाटनं भाजप उमेदवाराला चितपट करत विधानसभेची कुस्ती जिंकली.
सुळेंच्या गाडीत चेहरा लपवणारा नेता कोण? आणखी एक बडा नेता NCP त येणार?
सुळेंच्या गाडीत चेहरा लपवणारा नेता कोण? आणखी एक बडा नेता NCP त येणार?.
'भाजपचा निवडणूक आयोगावर दबाब', वेबसाईटवरील आकड्यांवर काँग्रेसची शंका
'भाजपचा निवडणूक आयोगावर दबाब', वेबसाईटवरील आकड्यांवर काँग्रेसची शंका.