आता रेल्वेचं जाळं जम्मू-काश्मीरपर्यंत; सर्वात लांब रेल्वे बोगद्याचं काम युद्धपातळीवर सुरू

| Updated on: Nov 24, 2022 | 3:15 PM

यूएसबीआरएल प्रकल्पासाठी अनेक बोगदे आणि पुलांवर दशकभराहून अधिक काळ काम करत असलेली अफकॉन्स लवकरच भारतीय रेल्वेसाठी सर्वात लांब रेल्वे बोगदा पूर्ण करत आहे.

आता रेल्वेचं जाळं जम्मू-काश्मीरपर्यंत; सर्वात लांब रेल्वे बोगद्याचं काम युद्धपातळीवर सुरू
आता रेल्वेचं जाळं जम्मू-काश्मीरपर्यंत; सर्वात लांब रेल्वे बोगद्याचं काम युद्धपातळीवर सुरू
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

श्रीनगर: जगातील सर्वात मोठे रेल्वे जाळे अशी ओळख असलेल्या भारतीय रेल्वे अधिक आधुनिक होताना दिसत आहे. कारण भारतीय रेल्वेने देशभर आपलं जाळं वाढवण्याचा सपाटा सुरू केला आहे. आता भारतीय रेल्वे जम्मू आणि काश्मीरला (Jammu & Kashmir) उर्वरित भारताशी जोडत आहे. त्यासाठी हिमालयाच्या खडकाळ पर्वतीय प्रदेशात दळणवळण सुलभ होण्यासाठी बोगदे आणि अनेक पूल बांधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल लिंक (Udhampur-Srinagar-Baramulla Rail Link) प्रकल्पाद्वारे जम्मू आणि काश्मीरला उर्वरित भारताशी जोडण्याचे हे कठीण मिशन हाती घेण्यात आले आहे.

यूएसबीआरएल प्रकल्पासाठी अनेक बोगदे आणि पुलांवर दशकभराहून अधिक काळ काम करत असलेली अफकॉन्स लवकरच भारतीय रेल्वेसाठी सर्वात लांब रेल्वे बोगदा पूर्ण करत आहे. T49 नावाचा हा बोगदा 12.75 किमी लांब असून जम्मू आणि काश्मीरच्या रामबन जिल्ह्यातील संबर आणि अर्पिंचला स्टेशन्सना जोडतो.

हे सुद्धा वाचा

अफकॉन्सने एकूण बोगद्यापैकी 7.32 किमी बोगदा बांधला आहे जो संपूर्ण बोगद्याच्या सुमारे साठ टक्के आहे. मुख्य बोगद्याच्या व्यतिरिक्त, अफकॉन्सने दोन ऑडिट, वीस क्रॉस पॅसेजेस, दोन पूल आणि स्टेशन यार्ड देखील या प्रकल्पामध्ये बांधले आहे.

बोगदा बांधणे हे हिमालयातील खरे आव्हान आहे. उतारप्रवणासह बोगदा बांधताना जटिलतेची पातळी आणखीच कठीण होते. बोगद्याचा ग्रेडियंट हा उतार किंवा रेषा किती तिरकस आहे याचे मोजमाप आहे.

एकूणच अभियांत्रिकी आणि बांधकामात ती मोठी भूमिका बजावते. अफकॉन्सने उत्तर पोर्टल (अर्पिंचाला गाव) पासून 7.32 किमी बोगदा बांधला आहे जो 1,600 मीटर उंचीवर आहे.

गुरुत्वाकर्षणाच्या अनोख्या आव्हानाव्यतिरिक्त, या प्रदेशात, आणि विशेषतः, इतका लांब बोगदा बांधण्याच्या संदर्भात, इतर काही आव्हाने होती. वेंटिलेशन सिस्टीमची (ventilation system) व्यवस्था करणे, पाण्याचा निचरा करणे आणि प्रतिकूल भूवैज्ञानिक आणि हवामानाच्या परिस्थितीमध्ये काम करणे हे धोके होते.

बोगद्याच्या एका विभागामध्ये, 450 मीटर-लांब असलेल्या भागावर 800-850 मीटर इतका जाडीच्या भार होता. “त्यामुळे उत्खननादरम्यान खडक फुटणे, तुंबणे आणि फुटणे अशा घटना होत होत्या.

ते सोडवण्यासाठी प्रेशर रिलीफ होल पाडले आणि तत्काळ आधार देण्यासाठी स्वेलेक्स बोल्ट बसवले,” चंद्रशेखर दीक्षित, अफकॉन्सचे प्रकल्प व्यवस्थापक म्हणाले.

मुख्य बोगद्याच्या आणखी दोन किलोमीटरच्या पट्ट्यात जमिनीच्या विशिष्ट स्थितीमुळे उच्च विकृतीचा धोका होता. “आम्ही जवळजवळ 1-1.5 मीटर ने व्यास कमी करण्याच्या कठीण आव्हानाचा सामना करत होतो. यामुळे प्रकल्पाच्या प्रगतीवर लक्षणीय परिणाम होईल. हे टाळण्यासाठी, आम्ही ते टप्पे ओळखले आणि ते पुनर्स्थापित केले,” असेही दीक्षित यांनी सांगितले.

T49 बोगद्याची वैशिष्टे

T49 हा देशातील सर्वात लांब रेल्वे बोगदा आहे

हा बोगदा 12.75 किमी लांब आहे आणि तो पीर-पंजाल बोगद्याला (11.2 किमी) मागे टाकतो.

हा बोगदा उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक (USBRL) प्रकल्पाचा भाग आहे.

15 फेब्रुवारी 2022 रोजी बोगद्याचे काम (tunnel breakthrough) पूर्ण झाले.

अफकॉन्सने एकूण बोगद्यापैकी 7.32 किमी (जवळपास 60%) बांधला आहे

अफकॉन्सने नॉर्थ पोर्टलवरून बोगदा बांधला आहे जो 1,600 मीटर उंचीवर आहे.