Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

| Updated on: Nov 25, 2022 | 7:17 AM

Marathi News Live Update महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाच्या शहरांसह गावागावांतील बातम्यांचे अपडेट आणि ताज्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

Marathi News LIVE Update : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

मुंबई : आज गुरुवार, 24 नोव्हेंबर 2022. बुधवारी कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद पुन्हा उफाळून आला होता. त्याचे राजकीय पडसाद आज देखील उमटण्याची शक्यता आहे. त्यासोबत मुख्यमंत्र्यांचा शिर्डी दौरा, आदित्य ठाकरेंचा बिहार दौरा यावरुनही राजकीय प्रतिक्रिया समोर येऊ शकतात. महाराष्ट्रातील राजकारणासह महत्त्वाच्या शहरांतील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आणि मोठ्या बातम्यांचा आढावा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 24 Nov 2022 08:57 PM (IST)

    मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं शिष्टमंडळ घेणार पियुष गोयल यांची भेट

    पुढील आठवड्यात दिल्लीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं शिष्टमंडळ घेणार पियुष गोयल यांची भेट

    केंद्राशी संबंधित असणाऱ्या पिकांच्या हमीभावाविषयी करणार चर्चा

    उद्या राज्य सरकारकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पियुष गोयल यांना लिहीणार पत्र

    सोयाबीनची आयात थांबवण्याची शेतकऱ्यांची मागणी

    मुख्यमंत्र्यांच पत्र उद्या पाठवलं जाणार

    पुढील आठवड्यात दिल्लीत बैठक

    आजच्या रविकांत तुपकरांच्या बैठकीत निर्णय

    विश्वसनीय सूत्रांची माहिती

  • 24 Nov 2022 08:06 PM (IST)

    कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा

    Marathi News LIVE Update कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा

    ठाकरे गटाच्या नीलम गोऱ्हे यांची मागणी

    कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या एकतंत्री स्वभावाचा घेतला खरपूस समाचार

    ही तर त्यांची पाकिस्तानी मानसिकता, आमचंच खरं असल्याची हेकेखोर भूमिका

    सीमा प्रश्नावरुन गोऱ्हे ही आक्रमक

  • 24 Nov 2022 07:54 PM (IST)

    Warren Buffett यांनी देणगी देण्याचा पुन्हा केला विक्रम

    Marathi News LIVE Update

    बफे यांच्या चार धर्मादाय संस्थामार्फत अनेक संस्थांना आर्थिक मदत

    गरीब, शेतकरी, महिलांच्या कल्याण योजनांसाठी सढळ हाताने देणगी

    बफे यांनी गरिबांसाठी खुला केला खजिना

    6125 कोटी रुपयांचे केले दान, मनाच्या श्रीमंतीने सर्वच भारावले

  • 24 Nov 2022 07:52 PM (IST)

    राजू शेट्टी यांचे उद्याचे आंदोलन आठवडाभर स्थगित

    राजू शेट्टी यांचे उद्याचे आंदोलन आठवडाभर स्थगित

    स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यभर चक्कजाम आंदोलन करणार होती

    मुख्यमंत्री आणि अधिकाऱ्यांशी आज दिवसभर झालेल्या चर्चेनंतर निर्णय

    मुख्यमंत्र्यांकडून 29 तारखेला शेट्टी यांना चर्चेसाठी बोलावणं

    29 तारखेची चर्चा फिस्कटली तर 3 डिसेंबरला ताकदीने रस्त्यावर उतरणार

  • 24 Nov 2022 07:25 PM (IST)

    लॉरेन्स बिष्णोईचा ताबा एनआयकडे

    Marathi News LIVE Update लॉरेन्स बिष्णोईचा ताबा एनआयकडे

    गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई सध्या न्यायालयीन कोठडीत

    दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात कोठडीत

    दहशतवादी कारवाया घडवून आणण्याचा कट रचल्याचा आरोप

  • 24 Nov 2022 06:01 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार मोडले

    Marathi News LIVE Update

    उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचे विचार मोडले

    त्यांना शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार आहे का?

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंवर हल्लाबोल

    बाळासाहेबांच्या विचाराचं सरकार राज्यात आलं आहे

    आमचं सरकार आल्याने ठाकरे यांच्या पायाखालची वाळू सरकली -शिंदे

  • 24 Nov 2022 05:50 PM (IST)

    सीमाप्रश्नी सुप्रीम कोर्ट योग्य निर्णय घेईल

    Marathi News LIVE Update

    सीमाप्रश्नी सुप्रीम कोर्ट योग्य निर्णय घेईल

    महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही

    उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

    बेळगाव, निपाणी प्रश्नी न्यायालयात भांडतोय

    माझ्याकडून कुठलेही चिथावणीखोर वक्तव्य नाही-फडणवीस

  • 24 Nov 2022 05:43 PM (IST)

    पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकण्याची शक्यता

    Marathi News LIVE Update

    पेट्रोल-डिझेलच्या किंमती भडकण्याची शक्यता

    कच्चा तेलाच्या कॅपिंगचा रशियाचा निर्णय

    भाव निश्चित करण्याचा धोरणाचा मोठा परिणाम

    भारतात पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता

  • 24 Nov 2022 02:38 PM (IST)

    मंत्री दादा भुसे यांची नाशिक जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट

    जिल्हा रुग्णालयात सुविधांचा अभाव असल्याच्या अनेक तक्रारी

    दादा भुसे यांच्या अचानक भेटीने प्रशासनाची धावपळ

  • 24 Nov 2022 12:56 PM (IST)

    हनुमान मंदिरातील मूर्तीची अज्ञातांकडून विटंबना

    चंद्रपूर : बल्लारपूर-चंद्रपूर महामार्गावर असलेल्या भिवकुंड नाला परिसरात असलेल्या हनुमान मंदिरातील मूर्तीची अज्ञातांकडून विटंबना, परिसरात मोठा तणाव, शेकडोचा जमाव रस्त्यावर उतरला

  • 24 Nov 2022 12:37 PM (IST)

    वादग्रस्त वक्तव्य करताना राज्यपालांना लाज वाटत नाही काय?: उदयनराजे भोसले

    राज्यपालांच्या तोंडून हे वाक्य आले मला क्षणभर काहीच कळाले नाही

    राज्यपालांनी जे वक्तव्य केले त्याला आधार काय ?

    छत्रपती शिवाजी महाराज यांनी लोकांसाठी आयुष्य वेचले,

    देशात अनेक योद्धे होऊन गेलेत मात्र त्यांच्यात शिवाजी महाराज यांच्यात मूलभूत वेगळेपण हेच आहे, शिवाजी महाराजांनी लोकांसाठी लढायला केल्यात

  • 24 Nov 2022 11:23 AM (IST)

    ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक

    ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक

    गेल्या 24 तासांपासून त्यांची तब्येत खालावली

    डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू

    गोखले यांचे फॅमिली फ्रेंड राजेश दामले यांची माहिती

    वाचा मेडीकल बुलेटिनमधील महत्त्वूपर्ण माहिती

  • 24 Nov 2022 10:36 AM (IST)

    नोटबंदी निर्णयावर आज सर्वोच्च सुनावणी

    नवी दिल्ली : नोटबंदी निर्णयावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, केंद्र सरकारकडून 12 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर, नोटबंदी निर्णय योग्य की अयोग्य? सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार संपूर्ण देशाचे लक्ष

  • 24 Nov 2022 10:31 AM (IST)

    मनी लाँड्रिंग प्रकरणी जॅकलिन फर्नांडिस कोर्टात हजर

    मनी लाँड्रिंग प्रकरणी जॅकलिन फर्नांडिस कोर्टात हजर

    दिल्लीच्या पतियाळा कोर्टात होणार सुनावणी

    जॅकलिनच्या जामिनाबाबत होणार निर्णय

  • 24 Nov 2022 10:11 AM (IST)

    भरधाव ट्रकने तीन कामगारांना चिरडले

    औरंगाबाद : औरंगाबादच्या वाळूज एमआयडीसीत भीषण अपघात, भरधाव ट्रकने तीन कामगारांना चिरडले, तिघांचाही जागीच मृत्यू, मृतांमध्ये दोन सख्या बहीण भावांचा समावेश

  • 24 Nov 2022 09:54 AM (IST)

    मुख्यमंत्री कार्यालयातून रविकांत तुपकर यांना भेटीचं निमंत्रण

    मुंबई : स्वाभिमानी शेतकरी आंदोलनाची राज्य सरकारकडून दखल, मुख्यमंत्री कार्यालयातून रविकांत तुपकर यांना भेटीचं निमंत्रण, २.३० वाजता रविकांत तुपकर हे सह्याद्री अतिथीगृह इथे मुख्यमंत्र्यांना भेटणार

  • 24 Nov 2022 09:21 AM (IST)

    अभिनेते विक्रम गोखले यांच्या प्रकृतीविषयी 10:30 वाजता मेडिकल बुलेटिन जारी होणार

    विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक

    10:30 वाजता दीनानाथ रुग्णालयाचे डॉक्टर आणि विक्रम गोखले यांच्या पत्नी माहिती देणार

    मीडियात निधनाच्या बातम्या आल्यानंतर विक्रम गोखले यांच्या पत्नीचे स्पष्टीकरण

  • 24 Nov 2022 09:20 AM (IST)

    नाशिकमध्ये गोवरचा धोका वाढला

    नाशिकमध्ये गोवरचा धोका वाढला

    नाशिकमध्ये आणखी 5 बालकांमध्ये गोवरची लक्षणं

    यापूर्वी 4 बालकांच्या रक्ताचे नमुने मुंबईला पाठवले

    मालेगावात आता पर्यंत 56 रुग्ण आढळले

    11 जणांची प्रकृती चिंताजनक

    नाशिक मनपाकडून स्वतंत्र कक्षाची निर्मिती

  • 24 Nov 2022 09:11 AM (IST)

    औरंगाबाद- वाहतूक पोलिसांच्या ट्राफिक केबिनला धडक देत भीषण अपघात..

    औरंगाबाद शहरातील दूध डेअरी सिग्नलवर कारचा भीषण अपघात..

    रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या लोखंडी बॅरिगेट्स ला धडकली कार..

    रात्री दोन वाजेच्या सुमारास भीषण अपघात..

  • 24 Nov 2022 09:02 AM (IST)

    पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी करवाई

    पुणे : पुण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी करवाई, गोव्यातून आलेली ८७ लाखांचं विदेशी मद्य जप्त, दोन आरोपींना पोलीसांकडून बेड्या

  • 24 Nov 2022 08:43 AM (IST)

    नाशिक : गोवरचा धोका वाढला

    नाशिक : गोवरचा धोका वाढला, नाशिकमध्ये आणखी 5 बालकांमध्ये गोवरची लक्षणं, मालेगावात आता पर्यंत 56 रुग्ण आढळले असून 11 जणांची प्रकृती चिंताजनक

  • 24 Nov 2022 08:26 AM (IST)

    मुंब्र्यामध्ये महिलेला पुढे करून मला बरबाद करण्याचा डाव रचला- जितेंद्र आव्हाड 

    मुस्लिम महिलेला पुढे करून मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला

    मुंब्र्यातील घटना आणि त्यासाठी दाखल केलेला गुन्हा मी कधीही विसरणार नाही- आव्हाड

    जितेंद्र आव्हाड यांचा शिंदे भाजप सरकारवर आरोप

  • 24 Nov 2022 07:34 AM (IST)

    चार वाहनांचा विचित्र अपघात

    मालेगाव : चांदवडच्या राहुल घाटात चार वाहनांचा विचित्र अपघात, सहा जण जखमी, एका ट्रकची दुसऱ्या ट्रक सह दोन खासगी बसला धडक

  • 24 Nov 2022 07:28 AM (IST)

    पुणेकरांना थंडीपासून दिलासा

    पुणे : पुणेकरांना थंडीपासून दिलासा, शहरातील तापमान १४ अंशाच्या वर, पुढील चार ते पाच दिवस पुण्यात थंडी कमीच राहणार, हवामान खात्याचा अंदाज

  • 24 Nov 2022 07:24 AM (IST)

    विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक

    पुणे : जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती चिंताजनक, गेल्या १५ दिवसांपासून विक्रम गोखले यांच्यावर दीनानाथ रुग्णालयात उपचार सुरू आहेत, थोड्याच वेळात हेल्थ बुलेटिन जारी केलं जाणार

Published On - Nov 24,2022 7:21 AM

Follow us
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.