स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, स्फोट घडवून आणण्याच्या तयारीत असलेल्या 4 दहशतवाद्यांना अटक

जम्मू-काश्मीर पोलिसांनी जैशच्या दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला आहे. पोलिसांनी 4 दहशतवाद्यांना अटक केली आहे. स्वातंत्र्य दिनी मोटारसायकल आयईडी स्फोट घडवून आणण्याच्या मोठा कट या दहशतवाद्यांचा होता. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे दहशतवाद्यांचे मनसुबे सत्यात उतरू शकले नाहीत.

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, स्फोट घडवून आणण्याच्या तयारीत असलेल्या 4 दहशतवाद्यांना अटक
Jammu Kashmir Police (Image for representation only)
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Aug 14, 2021 | 2:24 PM

नवी दिल्ली : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी जैशच्या दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला आहे. पोलिसांनी 4 दहशतवाद्यांना अटक केली आहे. स्वातंत्र्य दिनी मोटारसायकल आयईडी स्फोट घडवून आणण्याच्या मोठा कट या दहशतवाद्यांचा होता. मात्र, पोलिसांच्या सतर्कतेमुळे दहशतवाद्यांचे मनसुबे सत्यात उतरू शकले नाहीत. (One day before Independence Day, Jammu and Kashmir Police arrested 4 terrorists)

जम्मू-काश्मीरमध्ये पोलीस आणि लष्कराकडून दहशतवाद्यांविरोधात मोहीम सुरु आहे. या मोहीमेअंतर्गत जम्मू-काश्मीर पोलिसांनी जैशच्या चार दहशतवाद्यांना आणि त्यांच्या साथिदारांना अटक केली आहे. हे दहशतवादी ड्रोनद्वारे टाकण्यात आलेली शस्त्रास्त्र गोळा करुन घाटीमध्ये सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांना पोहोचवण्याचा कट आखत होते. इतकंच नाही तर हे दहशतवादी 15 ऑगस्ट अर्थात स्वातंत्र्यदिनी वाहनात आयईडी लावून मोठा स्फोट घडवून आणण्याच्या तयारीत होते. त्यासह देशातील अन्य शहरातील टार्गेटची रेकीही हे दहशतवादी करत होते.

मुंतजिर मंजूर या दहशतवाद्याला अटक

पोलिसांनी सुरुवातीला मुंतजिर मंजूर या दहशतवाद्याला अटक केलीय. मुंतजिर हा पुलवामाचा राहणारा आणि जैशचा दहशतवादी आहे. मुंतजिरकडून पोलिसांनी एक पिस्तूल, एक मॅक्झीन, 8 राऊंड काडतूस आणि दोन चीनी हॅन्डग्रेनेड जप्त केलेत. तो एका ट्रकच्या सहाय्यानं शस्त्रास्त्र पुरवण्याच्या प्रयत्नात होता. पोलिसांनी तो ट्रकही जप्त केला आहे.

दहशतवाद्याकडून पानीपत ऑईल रिफायनरीची रेकी

मुंतजिरसह पोलिसांनी अजून तीन दहशतवाद्यांना अटक केलीय. यात इजाहर खान उर्फ सोनू खानचा समावेश आहे. सोनू हा उत्तर प्रदेशातील शामलीच्या कंडाला इथला रहिवासी आहे. सोनूने सांगितलं की त्याला पाकिस्तानच्या जैश कमांडर मनाजिर खान याने अमृतसरहून शस्त्रास्त्र गोळा करण्यास सांगितलं होतं. जे ड्रोनच्या माध्यमातून खाली टाकण्यात आले होते. इतकंच नाही तर त्याच्याकडून पानीपत ऑईल रिफायनरीची रेकी करण्यासही सांगण्यात आलं होतं. या दहशतवाद्याने रिफायनरीचा एक व्हिडीओ बनवून पाकिस्तानला पाठवला होता. त्यानंतर त्याला अयोध्येतील राम जन्मभूमीची रेकी करण्यासाठी सांगण्यात आलं होतं. मात्र, त्याला तिथे अटक करण्यात आली आहे.

इतर बातम्या :

Nitin Gadkari letter to Maha CM : भावनिक साद आणि गर्भित इशारा, नितीन गडकरींच्या पत्रातील पाचवा स्फोटक मुद्दा

EXCLUSIVE : कामं थांबवा, नितीन गडकरींच्या स्फोटक पत्रानंतर आता शिवसैनिकाची कथित Audio क्लिप समोर

One day before Independence Day, Jammu and Kashmir Police arrested 4 terrorists

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें