ऐकावं ते नवलंच! असं काय झालं की त्याने कुत्रा होण्यासाठी केले लाखो रूपये खर्चे

एका व्यक्तीने स्वत:ला कुत्र्यामध्ये बदलून घेतलं आहे. संबंधित व्यक्तीच नाव टोको असं असून त्याने कुत्र्यामध्ये बदलून घेण्यासाठी पाण्यासारखा पैसा ओतला आहे. परंतु हा जपानी माणूस कुत्रा का बनला आहे? यासाठी त्याने इतके पैसै का खर्चे केले असावे असा प्रश्न तुम्हाला पडला असावा.

ऐकावं ते नवलंच! असं काय झालं की त्याने कुत्रा होण्यासाठी केले लाखो रूपये खर्चे
| Updated on: Jul 30, 2023 | 10:39 AM

टोकियो : जगात अनेक प्रकारची माणसं आपल्याला पाहायला मिळतात, यामधील प्रत्येकाला काहीना काही वेगळं करून दाखवण्याची इच्छा असते. (Japanese Man Transforms Into Human Dog)
यासाठी ते काय करू शकतील याचा काही नेम नाही, अशातच एका व्यक्तीने स्वत:ला कुत्र्यामध्ये बदलून घेतलं आहे. संबंधित व्यक्तीच नाव टोको असं असून त्याने कुत्र्यामध्ये बदलून घेण्यासाठी पाण्यासारखा पैसा ओतला आहे. परंतु हा जपानी माणूस कुत्रा का बनला आहे? यासाठी त्याने इतके पैसै का खर्चे केले असावे असा प्रश्न तुम्हाला पडला असावा.

‘जेपपेट’ या कंपनीने टोको या व्यक्तीला माणसातून कुत्र्याचं रूप देण्यासाठी मदत केली आहे. या कंडपनीने ४० दिवस प्रयत्नांची पराकाष्टा करत अखेर यशस्वीपणे टोको या व्यक्तीला कोल्ली ब्रीडचं रूपात त्याला बदललं आहे. कुत्र्यासारखा दिसणारा माणूस पाहून प्रत्येकाला धक्का बसत आहे.

 

टोको व्यक्तीने असं का केलं?

माणसाच्या रूपातून कुत्रा होण्यासाठी या व्यक्तिला जवळपास 22 हजार डॉलर्स म्हणजेच तब्बल18 लाख रुपये खर्च आला. टोको या व्यक्तिचं स्वप्न होतं की त्याला कुत्रा व्हायचं आहे. टोकोचा ‘I want To be an Animal’ या नावाने एक यूट्यूब चॅनेल असून त्याचे ३१००० सबस्क्राईबर्स आहेत. मात्र टोकोचा व्हिडीओ जवळपसा १ मिलीअनपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. यामध्ये तो इथर कुत्र्यांप्रमाणे लोळताना किंवा दुसऱ्या कोणत्या तर कुत्र्याला स्पर्श करत आहे.

दरम्यान, टोको याने मेलसोबत साधलेल्या संवादामध्ये, त्याला लहानपणापासूनच छंद होता, परंतु त्याच्या आजूबाजूच्या लोकांना यासंदर्भातील माहिती नाही पडावं अशी त्याची इच्छा होती. लोकांना जर समजलं की याला कुत्रा व्हायची इच्छा तर मी कुठेही तोंड दाखवू शकलो नसतो, असं टोकोने सांगितलं.