AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Stuart Broad Retirement | स्टुअर्ट ब्रॉड याच्या निर्णयाने सर्वांनाच धक्का, Ashes सीरिजदरम्यान निवृत्तीचा निर्णय

Stuart Broad England vs Australia 5th Test | युवराज सिंह याच्याकडून एका ओव्हरमध्ये 6 सिक्स खालेल्या स्टुअर्ट ब्रॉड याने क्रिकेटेमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

Stuart Broad Retirement | स्टुअर्ट ब्रॉड याच्या निर्णयाने सर्वांनाच धक्का, Ashes सीरिजदरम्यान निवृत्तीचा निर्णय
| Updated on: Jul 30, 2023 | 7:54 AM
Share

लंडन | इंग्लंड क्रिकेट टीमचा वेगवान आणि अनुभवी गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. स्टु्अर्ट ब्रॉर्ड याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध अ‍ॅशेस सीरिजमधील पाचव्या आणि शेवटच्या सामन्यातील तिसऱ्या दिवशी हा मोठा निर्णय घेतला. ब्रॉर्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटसह कोणत्याही देशांतर्गत स्पर्धेत खेळणार नसल्याचं स्पष्ट केलंय. स्टुअर्ट ब्रॉड याने 2006 मध्ये पदार्पण केलं होतं. ब्रॉर्डची क्रिकेट कारकीर्द ही एकूण 17 वर्षांची राहिली.

ब्रॉर्डची कसोटी कारकीर्द

ब्रॉर्डची प्रदीर्घ अशी कारकीर्द राहिली. स्टुअर्ट ब्रॉड याने 167 कसोटी सामन्यांमध्ये इंग्लंडचं प्रतिनिधित्व केलं. ब्रॉडने 167 कसोटी सामन्यांमध्ये आतापर्यंत 602 विकेट्स घेतल्या आहे. ब्रॉड कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा पाचवाच गोलंदाज आहे. स्टुअर्टच्या आधी मुथ्य्या मुरलीथरन, शेन वॉर्न, जेम्स एंडरसन आणि अनिल कुंबळे या चौघांनी सर्वाधिक विकेट्सची नोंद आहे. स्टुअर्ट ब्रॉड याला पाचव्या सामन्यात आणखी एका डावात बॉलिंग करायची आहे. त्यामुळे ब्रॉडचा अखेरच्या डावात उल्लेखनीय कामगिरी करण्याचा मानस असणार आहे.

स्टुअर्ट ब्रॉड निवृत्तीची घोषणा

उल्लेखनीय बाब म्हणजे ब्रॉडने कसोटी क्रिकेटमध्ये फलंदाजांना लाजवेल अशी कामगिरी केली आहे. ब्रॉडने टेस्टमध्ये 1 शतक आणि 13 अर्धशतकांसह 3 हजार 656 धावा केल्या आहेत.

स्टुअर्ट ब्रॉड याच्या कारकीर्दीतील सुवर्ण क्षण

ब्रॉड गेल्या काही वर्षांपासून फक्त कसोटी क्रिकेटच खेळतोय. ब्रॉड अखेरचा वनडे सामना 2016 आणि टी 20 सामना 2014 मध्ये खेळला होता. इंग्लंडने 2010 मध्ये टी 20 वर्ल्ड कप जिंकला होता. ब्रॉड त्या टीमचा भाग राहिला होता. ब्रॉडने 121 वनडेत 178 आणि 56 टी मॅचेसमध्ये 65 विकेट्स घेतल्या आहेत.

घरातूनच क्रिकेटचा वारसा

स्टुअर्ट ब्रॉड याला घरातूनच क्रिकेट धडे मिळाले. स्टुअर्टचे वडील क्रिस ब्रॉड हे देखील इंग्लंडसाठी खेळले आहेत. तसेच क्रिकेटनंतर त्यानंतर सामनाधिकारी अर्थात मॅच रेफरी ही भूमिका देखील चोखपणे पार पाडली.

ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हन | पॅट कमिन्स (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, जोश हेझलवूड आणि टॉड मर्फी.

इंग्लंड प्लेईंग इलेव्हन | बेन स्टोक्स (कॅप्टन), झॅक क्रॉली, बेन डकेट, मोईन अली, जो रूट, हॅरी ब्रूक, जॉनी बेअरस्टो (विकेटकीपर), ख्रिस वोक्स, मार्क वुड, स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.