CCTV Video : छत्तीसगडमध्ये हवा भरताना जेसीबीचा टायर फुटला, दोघांचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद

| Updated on: May 05, 2022 | 4:08 PM

रायपूरमधील सिलतारा येथील घनकून स्टील प्रायव्हेट लिमिटेडच्या गॅरेजमध्ये ही भयानक घटना घडली आहे. दुपारी पावणे चारच्या सुमारास एका जेसीबीच्या टायरमध्ये हवा भरण्याचे काम गॅरजमधील दोन कर्मचारी राजपाल सिंग आणि प्रांजन नामदेव हे करत होते. यावेळी दुर्दैवाने हवा भरत असताना टायरचा स्फोट झाला.

CCTV Video : छत्तीसगडमध्ये हवा भरताना जेसीबीचा टायर फुटला, दोघांचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद
छत्तीसगडमध्ये हवा भरताना जेसीबीचा टायर फुटला
Image Credit source: TV9
Follow us on

छत्तीसगड : जेसीबीच्या टायरमध्ये हवा भरताना टायर (Tire) फुटल्याने गॅरेजमधील दोन कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची हृदयाद्रावक घटना छत्तीसगडमधील रायपूरमध्ये घडली आहे. राजपाल सिंग (32) आणि प्रांजन नामदेव (32) अशी दुर्दैवी मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. ही भयानक घटना गॅरेजमधील सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या घटनेत एका कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून दुसऱ्याचा रुगणालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दोन्ही मृतदेहांचे शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. (JCB’s tire ruptures while inflating in Chhattisgarh, killing two; Incident captured on CCTV)

कशी घडली घटना ?

रायपूरमधील सिलतारा येथील घनकून स्टील प्रायव्हेट लिमिटेडच्या गॅरेजमध्ये ही भयानक घटना घडली आहे. दुपारी पावणे चारच्या सुमारास एका जेसीबीच्या टायरमध्ये हवा भरण्याचे काम गॅरजमधील दोन कर्मचारी राजपाल सिंग आणि प्रांजन नामदेव हे करत होते. यावेळी दुर्दैवाने हवा भरत असताना टायरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, टायरजवळ उभे असलेले दोन तरुण हवेत फेकले गेले. टायरही हवेत उडून दूरवर पडले. या घटनेत एका कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा कर्मचारी गंभीर जखमी झाल्याने त्याला तात्काळ उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला. याप्रकरणी सिलतारा चौकी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. (JCB’s tire ruptures while inflating in Chhattisgarh, killing two; Incident captured on CCTV)