ऐ जी! कुछ खा लूं क्या… लग्नानंतर नवरी एवढंच बोलली, त्यानंतर नवरदेवासोबत.. ऐकून व्हाल चकीत!
सीकर जिल्ह्यातील सुरेश झांझभार यांच्याशी झारखंडच्या गिरिडीह येथील एका तरुणीने लग्न केले. लग्नानंतर नवरी दोन लाख रुपये आणि किमती दागिने घेऊन पळून गेली. पारसनाथ रेल्वे स्थानकाजवळ जेवणाच्या बहाण्याने ती पळाली. सुरेशने पोलिसात तक्रार दाखल केली असून, पोलिस नवरीचा शोध घेत आहेत. या प्रकरणात दोन दलालांचाही सहभाग असल्याचा संशय आहे.

झारखंडच्या गिरिडीहमध्ये एका व्यक्तीने असंख्य स्वप्न उराशी बाळगून लग्लन केलं. नवरीसोबत सात फेरे घेतले. त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. आता सुखाचा संसार सुरू होईल आणि आपलंही वेगळं जग निर्माण होईल, असं त्याला वाटू लागलं. पण त्याची स्वप्न ही स्वप्नच राहिली. नवरी म्हणजे त्याची बायको त्याच्यासोबत काय करणार हे थोडी ना त्याला माहीत होतं. त्याला पुढे काय वाढून ठेवलंय याची पुसटशीही कल्पना नव्हती. राजस्थानच्या या नवरदेवाला झारखंडच्या नवरीने असा काही चुना लावला की तो आयुष्यभर याद ठेवेल.
सीकर जिल्ह्यातील सुरेश झांझभार याचं लग्न तर झालं पण त्याचा आनंद फार काळ टिकला नाही. लग्नाच्या काही तासानंतर नवरी दोन लाख रुपये रोख आणि किमती दागिने घेऊन फरार झाली. त्यामुळे लग्नाच्या घरात एकच हाहा:कार माजला. जिथे पाहुण्यांची उठबस सुरू होती, तिथं आता पोलिसांनी डेरा टाकलाय. प्रत्येकाची कसून चौकशी केली जात आहे. घटना कशी घडली याची माहिती घेतली जात आहे. सीसीटीव्ही फुटेज शोधले जात आहेत.
गेली ती परत आलीच नाही
2 मे रोजी सुरेशचं लग्न गिरिडीहच्या फुलची गावच्या 26 वर्षीय तरुणीशी पारंपारिक पद्धतीने झालं. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी सुरेश आणि त्याचे कुटुंबीय नवरीला घेऊन राजस्थानकडे जायला निघाले. पारसनाथ रेल्वे स्थानकापर्यंत सर्व आले. त्यावेळी 8 वाजले होते. त्यानंतर नवरीने जेवणाचा बहाणा केला. ऐ जी! कुछ खा लूं क्या… असं म्हणून ती स्टेशनच्या बाहेर पडली ती परत आलीच नाही. नवरदेव मात्र रेल्वे स्थानकात ताटकळत बसला होता.
मोबाईलही बंद
सुरेशने दिलेल्या माहितीनुसार, नवरीने तिचा फोनही सोबत नेला होता. तास उलटला तरी नवरी काही आली नाही. तिचा फोनही वारंवार स्विच्ड ऑफ येत होता. त्यामुळे काही तरी गडबड असल्याचा कुटुंबाला संशय आला. कुटुंबाने सर्व वरात थेट पोलीस ठाण्यात नेली. मुफ्फसिल पोलीस ठाण्यात जाऊन सुरेशने तक्रार नोंदवली.
दोन लाख दिले होते
सुरेशने तक्रारीत गंभीर आरोप केले आहेत. या लग्नासाठी त्याने नवरीच्या घरच्यांना आणि मध्यस्थांना मिळून दोन लाख रुपये दिले होते. यातील एक दलाल मुकेश पासवान त्याचा सहकारी आहे. मुकेश हा बिहारचा आहे. तर दुसरा रिंकू पासवान हा गिरिडीह येथील रहिवाशी आहे. दोघांनीही हे स्थळ आणलं होतं.
नवरी सापडेच ना
या प्रकरणावर मुफ्फसिल पोलिसांनी माहिती दिली आहे. नवरी पळून गेल्याची आणि नवरदेवाची फसवणूक झाल्याची पुष्टी झाली आहे. आम्ही गुन्हा दाखल करून घेतला आहे. चौकशी सुरू आहे. मुलीचा मोबाईल बंद येत असल्याने तिचा काहीच पत्ता सापडत नाहीये. पोलिसांची टीम तिचा शोध आहे, असं पोलिसांनी सांगितलं.
