J.P. Nadda : केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांची तब्येत बिघडली; तातडीने दिल्लीतील AIIMS रुग्णालयात दाखल
केंद्रीय मंत्री नड्डा यांची तब्येत बिघडल्याचे समोर आलं आहे. त्यानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांची तब्येत बिघडली आहे. त्यांना तातडीने नवी दिल्लीतील AIIMS रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या नड्डा यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांना आता हृदयरोग विभागाच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखी ठेवण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांची अँजिओग्राफी देखील करणयात आल्याची माहिती रुग्णालयाने दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांना 13 ऑगस्ट रोजी सायंकाळी अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर अँजिओग्राफीसह अनेक चाचण्या करण्यात आल्या. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांचे समर्थक आणि राजकीय वर्तुळात चिंता पसरली आहे. परंतु रुग्णालयाने हेल्थ अपडेट जारी करत टेन्शनचं घेण्याचं कोणतंही कारण नसल्याचे म्हटलं आहे.
Official statement by AIIMS New Delhi regarding the health status of Hon’ble Union Minister of Health and Family Welfare, Shri J.P. Nadda. pic.twitter.com/zsV5gXd4h9
— AIIMS, New Delhi 🇮🇳 (@aiims_newdelhi) August 14, 2026
एम्सने हेल्थ बुलेटिनमध्ये काय म्हटलं?
एम्सने हेल्थ बुलेटिन जारी करत म्हटलं की, ‘केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांना मागील काही दिवसांपासून अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले. त्यांच्यावर अनेक चाचण्या देखील करण्यात आल्या. त्याचबरोबर नड्डा यांच्यावर कोरेनरी अँजिओग्राफी देखील करण्यात आली आहे. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना हृदयरोग विभागाच्या डॉक्टरांच्या देखरेखी खाली ठेवण्यात आलं आहे. त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज कधी मिळणार, याबाबत अद्याप कोणतीही अपडेट देण्यात आलेली नाही
तत्पूर्वी, भाजप नेते, जे. पी. नड्डा यांनी आज फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्त एक भावुक संदेश दिला. फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्त नड्डा म्हणाले की, ’14 ऑगस्ट1947 रोजी फाळणीच्या दिवशी नरसंहार, रक्तपात, लाखो लोकांनी अनुभवलेल्या वेदना, संघर्ष, त्यागाला स्मरण करतो. स्वातंत्र्यासाठी सर्वस्व गमावलेल्या सर्व कुटुंबांना आदरांजली व्यक्त करतो, असे नड्डा यांनी सांगितले. जे.पी. नड्डा यांनी काल ‘हर घर तिरंगा’ या अभियनात भाग घेतला. तसेच त्यांनी दिल्लीतील शासकीय निवासस्थानी तिरंगा फडकवला. त्यांनी देशबांधवांना घरांवर भारताचा तिरंगा झेंडा फडकवून या अभियानात सहभागी होण्याचेही आवाहन केलं.