पंतप्रधानांच्या प्रयत्नामुळे भारत मजबूत स्थितीमध्ये; जागतिक आरोग्य संघटनेनेही घेतली दखल, नड्डांनी केले मोदींचे कौतुक

| Updated on: Nov 07, 2021 | 3:02 PM

भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राष्ट्रीय कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. मोदींच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळेच आपण आज कोरोनामुळे उद्धभवलेल्या परिस्थितीवर मात करू शकलो असे त्यांनी म्हटले.

पंतप्रधानांच्या प्रयत्नामुळे भारत मजबूत स्थितीमध्ये; जागतिक आरोग्य संघटनेनेही घेतली दखल, नड्डांनी केले मोदींचे कौतुक
Follow us on

दिल्ली – भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी राष्ट्रीय कार्यकारिणी समितीच्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींचे कौतुक केले. मोदींच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळेच आपण आज कोरोनामुळे उद्धभवलेल्या परिस्थितीवर मात करू शकलो. कोरोनाकाळात लॉकडाऊन लावण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मोदींनी घेतला. लॉकडाऊमुळे देशाची आर्थिक स्थिती कोलमडली होती, मात्र तिला पूर्वपदावर आणण्यासाठी देखील सरकारकडून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आल्याचे नड्डा यांनी सांगितले. पुढे बोलताना नड्डा म्हणाले की, कोरोना काळात सरकार कायम जनतेच्या पाठीशी उभे राहिले, लॉकडाऊन लावण्यात आल्यानंतर सुरुवातीच्या तीन महिन्यात सरकारने नागरिकांना सर्व सुविधा घरपोहोच दिल्या.

भाजपा आर्थिक आघाडीवर यशस्वी 

मोदींचे कौतुक करताना त्यांनी म्हटले की, कोरोना काळात देशाची परिस्थिती बिकट बनली होती. कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत होता. कोरोना परिस्थितीवर मात करण्याचे मोठे आव्हान देशासमोर होते. पंतप्रधान मोदींनी हे आव्हान स्वीकारले आणि देशाला कोरोना परिस्थितीमधून बाहेर काढले. कोरोना काळात त्यांनी ज्या-ज्या योजना आणल्या, जे निर्णय घेतले त्याचे जागतिक आरोग्य संघटनेकडून देखील कौतुक करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर भाजपा सरकार आर्थिक आघाडीवर देखील यशस्वी ठरले आहे. लॉकडाऊननंतर राबवण्यात  आलेल्या विविध योजनांमुळे देशाच्या आर्थव्यवस्थेला चालना मिळाली. यासाठी जगभरातून भारताचे कौतुक होत आहे.

कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे पक्षाला यश 

यावेळी जेपी नड्डा यांनी निवडणुकीत भाजपाच्या मतांची टक्केवारी वाढवल्याबद्दल पक्षाती प्रमुख नेते आणि कार्यकर्त्यांचे देखील अभिनंदन केले. गेल्या वर्षभरात देशात झालेल्या विविध निवडणुकांमध्ये भाजपाला होणाऱ्या मतांची टक्केवारी वाढली आहे. जम्मू काश्मीरमध्ये पक्षाने दमदार कामगिरी केली. याचे सर्व श्रेय कार्यकर्तांना जात असून भविष्यात अशाच कामगिरीची अपेक्षा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच आगामी विधानसभा निवणुकींमध्ये देखील भाजपाचाचा विजय होईल असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.

नवे कृषी कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे 

जेपी नड्डा यांनी तीन कृषी कायदे आणि शेतकरी आंदोलनावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदी हे नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजून उभे राहाणारे नेते आहेत. शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच त्यांनी तीन नव्या कृषी कायद्यांना मंजुरी दिली आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे कल्याण होणार असल्याचे त्यांनी म्हटले.  भाजपाने आपल्या सत्ता काळात अनेक महत्त्वापूर्ण निर्णय घेतले ज्यामध्ये कलम 370, आयोध्या राम मंदिर अशा निर्णयाचा समावेश असल्याचे नड्डा म्हणाले.

संबंधित बातम्या 

पाकिस्तानी नौदलाचा गुजरात किनाऱ्यावर गोळीबार, एका भारतीय मच्छिमाराची हत्या

जम्मू-काश्मीरमध्ये दशहतवाद्यांविरोधात शोध मोहीम; सर्च ऑपरेशनचा 27 वा दिवस, आतापर्यंत 9 जवान शहीद

राहुल गांधींनी विद्यार्थ्यांसोबत साजरी केली दिवाळी; पहा जेवणासाठी काय केले ऑर्डर?