AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

करोडपती सुनेचा भयानक कारनामा, शातिर दिमागाची खेळी, थेट सासऱ्यालाच… या हत्याकांडाने देशात खळबळ

कानपूरमधील औषध व्यावसायिक विनीत मिनोचा यांच्या हत्येचा पोलिसांनी छडा लावला आहे. कौटुंबिक वाद आणि पैशांवरून सुनेनेच 6 लाखांची सुपारी देऊन हत्येचा कट रचल्याचे समोर आले. मृतदेह फ्लॅटमध्ये आढळल्यानंतर तपासात विशाल या माजी कर्मचाऱ्याचा सहभाग उघड झाला. सुरुवातीला हृदयविकाराचा झटका भासवण्याचा प्रयत्न होता, पण नंतर चाकूने हल्ला झाला. सून शालूला अटक करण्यात आली आहे.

करोडपती सुनेचा भयानक कारनामा, शातिर दिमागाची खेळी, थेट सासऱ्यालाच... या हत्याकांडाने देशात खळबळ
| Updated on: Sep 08, 2026 | 6:29 PM
Share

Kanpur Businessman Murder Case : कानपूरच्या कल्याणपुर ठाण्याजवळील रतन ऑर्बिट अपार्टमेंट मध्ये औषधांचे व्यापारी विनीत मिनोचा यांची हत्या झाली, त्याप्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला होता. यापरकरणी पोलिांनी मृत इसमाच्या सुनेलाच अटक केली. या हत्याकांडाच शालूचा सहभाग असल्याचे तपासात समोर आलं होतं. यापूर्वी या हत्याकांडाप्रकरणी पोलिसांनी विशाल आणि त्याचा साथीदार यांना बेड्या ठोकल्या हत्या. ही हत्या लुटीच्या कारणाने नव्हे तर कौटुंबिक तणावामुळे आणि पैशांशी निगडीत वादामुळे झाल्याचं समोर आलं. या हत्येसाठी 6 लाखांची सुपारी देण्यात आली. त्यापैकी 2 लाख हे ॲडव्हान्स म्हणून देण्यात आले होते. पोलिसांकडून याप्रकरणी कसून तपास सुरू असून आरोपींची चौकशी सुरू आहे.

फ्लॅटमध्ये सापडला मृतदेह

कुटुंबीय घराबाहेर असताना फ्लॅटमध्ये विनीत यांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. त्यांचा मुलगा, सून आणि नातू घराबाहेर होते. मात्र कुटुंबीय घरी आल्यावर त्यांच्या पायाखलची जमीनच सरकली. फ्लॅटमध्ये विनीत यांचा मृतदेह आढळला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी फ्लॅटच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता दोन संशयित फ्लॅटमध्ये प्रवेश करताना दिसले. त्यापैकी एक हाँ विनीत यांचा माजी नकोर विशाल हाँ असल्याचं तपासादरम्यान उघड झालं.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल सुमारे सहा वर्षांपूर्वी विनीत यांच्याकडे काम करत होता. चोरीच्या आरोपावरून त्याला नोकरीवरून काढण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतरही विशाल या विनीत यांच्या कुटुंबाशी संपर्क कायम होता. त्याच्याकडे फ्लॅटची डुप्लिकेट चावीदेखील होती. घटनेच्या दिवशी कुटुंबीय घराबाहेर गेल्यानंतर काही वेळाने विशाल आपल्या साथीदारासह फ्लॅटमध्ये पोहोचला. दोघे बराच वेळ घरातच थांबले आणि विनीत यांच्या परतण्याची वाट बघत होते. आरोपी एक तासाहून अधिक काळ फ्लॅटमध्ये उपस्थित होते, अशी माहिती तपासातून समोर आली.

चाकूने केला हल्ला

विनीत घरी परतल्यानंतर आरोपींनी त्यांच्यावर चाकूने हल्ला केला, असा दावा पोलिसांनी केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने विनीत यांचा मृत्यू झाला. हत्येचा तपास करताना पोलिसांनी कौटुंबिक वाद आणि पैशांच्या व्यवहाराच्या दिशेनेही चौकशी सुरू केली. कुटुंबात पैसे आणि घरखर्चावरून तणाव होता, असा पोलिसांचा दावा आहे.

या तपासादरम्यान विनीत यांची सून शालू हिच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप समोर आला. पोलिसांच्या दाव्यानुसार, विनीत यांच्या हत्येसाठी सहा लाख रुपयांची सुपारी ठरवण्यात आली होती. त्यापैकी दोन लाख रुपये ॲडव्हान्स म्हणून तर उरलेले नंतर देण्यात येणार होते. देण्यात येणार होते, तर उर्वरित चार लाख रुपये हत्या झाल्यानंतर देण्याचे ठरले होते.

हत्या नव्हे हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचा दाखवण्याचा प्लान

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीला विनीत यांची हत्या करून ती नैसर्गिक मृत्यू असल्याचे भासवण्याचा प्लान आखण्यात आला होता. ते झोपेत असताना उशीने दाबून मारायचं आणि त्यांचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाल्याचं दाखवायचं, असा कथितरित्या कट होता. मात्र, त्या रात्री विनीत मुलांच्या खोलीच्या दिशेने गेले. तिथे आधीपासून उपस्थित असलेला आरोपी विशाल आणि त्याच्या साथीदाराशी त्यांचा सामना झाला. त्यानंतर आरोपींनी कथितरित्या योजना बदलली आणि विनीत यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी विनीत यांच्या सुनेला अटक करण्यात आली असून तिची तुरूंगात रवानगी करण्यात आली. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Follow Us
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Santosh Pandit Case | संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! रोहित पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?