AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Target Killing : मागे जे झालं तेच आता होत आहे; आता पर्याय नाही

दरम्यान कालच जम्मू-काश्मीरमध्ये हिंदू सरकारी कर्मचारी आणि काश्मिरी पंडितांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला होता. याअंतर्गत काश्मिरी पंडित किंवा हिंदू सरकारी कर्मचाऱ्यांची सुरक्षित स्थळी बदली केली जाणार होती. तर टार्गेट किलिंगवरून जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी बुधवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेतला. खोऱ्यात दहशतवाद्यांच्या टार्गेट किलिंगच्या धमकीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ही सूत्रांनी दिली होती.

Target Killing : मागे जे झालं तेच आता होत आहे; आता पर्याय नाही
काश्मिरी पंडितImage Credit source: tv9
| Updated on: Jun 02, 2022 | 4:44 PM
Share

श्रीनगर : काश्मिरी पंडितांनी टार्गेट किलिंगवर (Target Killing) तातडीची बैठक बोलावली आहे. खोऱ्यातून बाहेर पडण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. खरे तर अलीकडच्या काही दिवसांत काश्मिरी पंडित (Kashmiri Pandit), हिंदू आणि गैर-स्थानिक लोकांना दहशतवाद्यांनी आपला निशाणा बनवला आहे. ते त्यांच्यावर हल्ला करत आहेत. त्याशिवाय काही स्थानिक रहिवाशांना देखिल दहशतवाद्यांनी ठार केले आहे. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात दहशतीचे वातावरण (Terror) पसरले आहे. अशातच आज कुलगाममध्ये एका बँक कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली. हत्या करण्यात आलेला बँक कर्मचारी हा हिंदू होता. मूळच्या राजस्थानचा असणारा आणि येथे राहणाऱ्या या बँक कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे टार्गेट किलिंगवर तातडीची बैठक बोलावत आता खोऱ्यातून बाहेर पडण्याशिवाय पर्याय नाही नसल्याचे अनेक काश्मिरी पंडितांनी म्हटले आहे.

काश्मीरमध्ये शांतता परतल्यानंतर अनेक काश्मिरी पंडितांची कुटुंबे येथे परतली होती. मात्र पुन्हा एकदा याच लोकांना येथे टार्गेट केले जात आहे. त्यामुळे काश्मिरी पंडित लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच सातत्याने होत असलेल्या टार्गेट किलिंगची दखल घेत काश्मिरी पंडितांनी आता तातडीची बैठक बोलावली. यामध्ये सुरक्षेबाबत चर्चा होणार असल्याचे मानले जात आहे. त्याचबरोबर सातत्याने होत असलेल्या टार्गेट किलिंगच्या पार्श्वभूमीवर आता काश्मिरी पंडितांना सुखरूप पाठवले जाणार आहे. जम्मू-काश्मीरचे लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांनी राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेतला.

कुलगाममध्ये बँक कर्मचाऱ्याची हत्या

त्याचवेळी, कुलगाम जिल्ह्यात गुरुवारी दहशतवाद्यांनी राजस्थानशी संबंध असलेल्या बँक कर्मचाऱ्याची बँकेच्या आवारात गोळ्या झाडून हत्या केली. खोऱ्यात 1 मे पासून बिगर मुस्लिम सरकारी कर्मचाऱ्याची हत्या होण्याची ही तिसरी वेळ आहे. त्याचबरोबर गेल्या महिनाभरातील टार्गेट किलिंगची ही आठवी घटना आहे. अधिकार्‍यांनी सांगितले की, विजय कुमार दक्षिण काश्मीर जिल्ह्यातील इलाकाई देहाती बँकेच्या अरे मोहनपोरा शाखेत व्यवस्थापक होते. यात तो गंभीर जखमी झाला आणि रुग्णालयात नेत असताना त्याचा मृत्यू झाला. नॅशनल कॉन्फरन्स आणि भारतीय जनता पक्षासह अनेक राजकीय पक्षांनी या घटनेचा निषेध केला आहे.

कुमार हा मूळचा राजस्थानच्या हनुमानगढचा आहे, त्याने आठवड्यापूर्वी कुलगाम शाखेत काम करण्यास सुरुवात केली होती. यापूर्वी केंद्र सरकार, जम्मू-काश्मीर प्रशासन आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या सह-मालकीच्या बँकेच्या कोकरनाग शाखेत काम केले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. दोन दिवसांपूर्वी 31 मे रोजी कुलगाम जिल्ह्यातील गोपालपूर येथे दहशतवाद्यांनी जम्मूच्या सांबा जिल्ह्यातील हिंदू शिक्षिका रजनी बाला यांची गोळ्या झाडून हत्या केली होती. तर याआधी 12 मे रोजी बडगाम जिल्ह्यातील चदूरा तहसीलदार कार्यालयात राहुल भट्ट यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

जिल्हा मुख्यालयात बदली

दरम्यान कालच जम्मू-काश्मीरमध्ये हिंदू सरकारी कर्मचारी आणि काश्मिरी पंडितांबाबत मोठा निर्णय घेण्यात आला होता. याअंतर्गत काश्मिरी पंडित किंवा हिंदू सरकारी कर्मचाऱ्यांची सुरक्षित स्थळी बदली केली जाणार होती. तर टार्गेट किलिंगवरून जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी बुधवारी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत हा निर्णय घेतला. खोऱ्यात दहशतवाद्यांच्या टार्गेट किलिंगच्या धमकीमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ही सूत्रांनी दिली होती.

काश्मीरचे पंडितही सुरक्षेच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. हिंदू सरकारी कर्मचाऱ्यांची ही बदली दुर्गम भागातून जिल्हा मुख्यालयात केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. सुरक्षेच्या दृष्टीने हे केले जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया 6 जूनपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. जम्मू-काश्मीर प्रशासनाकडून या हिंदू सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षित घरेही उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्याचदरम्यान आज हा हल्ला झाला असून एका बँक कर्मचाऱ्याची हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे काश्मिरी पंडित खोऱ्यातून बाहेर पडण्याशिवाय पर्याय नसल्याचे म्हणत आहेत.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.