AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM KCR: महाराष्ट्रासारखं तेलंगानामध्ये सरकार पाडून दाखवा; मोदी सरकारलाही पाडू शकतो; केसीआर यांचा थेट मोदींनाच इशारा

केसीआर यांनी कोरोनाच्या काळाविषयी बोलताना सांगितले की, तुम्ही कोरोना महामारीच्या काळात अपयशी ठरला आहात. अचानक लॉकडाऊन जाहीर करून तुम्ही कोट्यवधी लोकांना अडचणीत आणले आहे. ज्या गंगा नदीला पवित्र समजले जाते त्या गंगेच्या पात्रात शेकडो मृतदेहांची विल्हेवाट तुमच्या काळातच झाली आहे.

CM KCR: महाराष्ट्रासारखं तेलंगानामध्ये सरकार पाडून दाखवा; मोदी सरकारलाही पाडू शकतो; केसीआर यांचा थेट मोदींनाच इशारा
| Updated on: Jul 03, 2022 | 4:23 PM
Share

मुंबईः देशातील महाबलाढ्य सरकार म्हणून ज्याची गणना केली जाते, त्या भाजप पक्षाची (Bhartiy Janata Party) भविष्यातील ध्येयधोरणं, निवडणुका याविषयी हैदराबादमध्ये महामंथन (Hyderabad Mahamantha) चालू आहे. त्यामुळे तेलंगानामध्ये राजकीय घडामोडींनी वेग आला आहे. तेलंगानाचे मुख्यमंत्री केसीआर (Telgana CM KCR) यांनी भाजपवर निशाना साधताना म्हटले आहे की, फक्त एकदा आमचे सरकार पाडून दाखवा, त्यानंतर मी मोदी सरकारही पाडू शकतो असंही त्यानी वक्तव्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे.पी. नड्डा असे भाजपचे दिग्गज नेते हैदराबादमध्ये असतानाच केसीआर यांनी टीका केल्याने सगळ्यांच्या भुवया उंचवल्या आहेत.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या मदतीने सरकारची स्थापना केली. महाराष्ट्रातील या राजकीय घडामोडीची चर्चा गल्लीपासून दिल्ली पर्यंत होत असतानाच दुसरीकडे मात्र तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये मात्र भाजपचे महामंथन सुरू आहे.  यानिमित्ताने हैदराबादमध्ये भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांची उपस्थिती या मेळाव्यात आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची ही बैठक सुरू आहे.

घराणेशाहीवर भाजपची टीका

देशातील राजकारणावर टीका करताना भाजपकडून घराणेशाहीच्या मुद्यावरून भाजपने जोरदार टीका केली आहे, तर आता तेलंगणामध्येही राजकीय घडामोडींना आणि अनेक नेत्यांना आता उकळ्या फुटू लागल्या आहेत. तेलंगणा राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी आमचे 104 आमदार आहेत आणि भाजप म्हणत आहे की ते महाराष्ट्राप्रमाणे सरकार पाडू शकते. त्यावर बोलताना केसीआर म्हणाले की, भाजपला माझे आव्हान आहे, त्यांनी एकदा हा प्रयत्न करून पाहावा, त्यानंतर आमची ताकद बघा आम्ही थेट दिल्लीतील तुमचे सरकार पाडू शकतो असंही त्यांनी मत व्यक्त केले आहे.

तुम्ही किती लोकांना घाबरवणार

केसीआर यांनी भाजपवर हल्लाबोल करताना म्हणाले की, भाजपच्या बाहेर असणाऱ्या लोकांना घाबरवून तुम्ही किती घाबरवणार आहात. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही हल्लाबोल चढविला आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकशाही धोक्यात आणली आहे, त्यांच्या घटनाबाह्य राजकारणामुळेच त्यांनी सात राज्यांतील सरकार पाडले असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. यावेळी त्यांच्या पदाविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, नरेंद्र मोदी यांच्यापूर्वी 14 पंतप्रधान होते पण कोणीही देशाचे नुकसान केले नाही. तसेच नरेंद्र मोदी पंतप्रधान नव्हे तर तुमच्या उद्योगपती मित्रांचे सेल्समन झाला आहात अशीही टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

पंतप्रधान खोटे बोलत आहेत

हैदराबादमध्ये होणाऱ्या पीएम मोदींच्या जाहीर सभेबाबत ते म्हणाले की, तुमच्या उद्योगपती मित्राला श्रीलंकेत व्यवसायाची संधी मिळवून देण्यासाठी तुम्ही काय केले तेही तुम्ही सांगा. त्यानंतर टीआरएस प्रमुख केसीआर म्हणाले की, पंतप्रधान खोटे बोलत आहेत. काळा पैसा आणण्याबाबत ते बोलत होते. काळा पैसा एक रुपयाही आला नाही, उलट तो दुप्पट झाला. असे आकडे सांगत आहेत. 15 लाख देण्याची चर्चा झाली मात्र 15 पैसेही आले

चुकीच्या धोरणामुळे किती तरी कंपन्या देशाबाहेर

पंतप्रधान यांच्यावर जोरदार टीका करताना ते म्हणाले की, तुमच्या चुकीच्या धोरणामुळे किती तरी कंपन्या देशाबाहेर गेल्या आहेत. रुपयाची घसरण का होत आहे असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. सत्तेत येण्यापूर्वी भाजपमधील लोक मनमोहन सिंग यांचे सरकार असताना त्यांच्यावर टीका केली जात होती, पण तुम्ही आता काय करत आहात असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.

तुम्ही कोरोना महामारीच्या काळात अपयशी

केसीआर यांनी कोरोनाच्या काळाविषयी बोलताना सांगितले की, तुम्ही कोरोना महामारीच्या काळात अपयशी ठरला आहात. अचानक लॉकडाऊन जाहीर करून तुम्ही कोट्यवधी लोकांना अडचणीत आणले आहे. ज्या गंगा नदीला पवित्र समजले जाते त्या गंगेच्या पात्रात शेकडो मृतदेहांची विल्हेवाट तुमच्या काळातच झाली आहे. जे केंद्र सरकारचे काम आहे, ते काम आम्ही केले आहे, लोकांना पैसे देऊन, ट्रेन चालू करण्याची मागणी करून आम्ही लोकांना त्यांच्या घरी सोडले आहे.

एकही चांगले आणि हिताचे काम झाले नाही

भाजपवर टीका करताना केसीआर एवढ्यावरच थांबले नाहीत त्या पुढे जाऊन ते म्हणाले की, पंतप्रधान पदावर असतानाही तुमच्याकडून एकही चांगले आणि हिताचे काम झाले नाही. जनतेच्या हिताची कोणतीही हिताची कामं करण्यात आली नाहीत. कर भरा म्हणून सांगून तुम्ही 30 हजार कोटीची रक्कम तुम्ही घशात घातली. सगळे जग आपल्या देशाला महात्मा गांधींचा भारत म्हणून ओळखतात, तर तुम्ही मात्र महात्मा गांधींचा जेवढा अपमान करायचा आहे तेवढा अपमान करता.

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.