डाव्यांचा एकमेव गड ढासळणार, केरळमध्ये यावेळी काँग्रेसची सत्ता? Exit Polls चे चकित करणारे आकडे!
केरळ हे राज्य डाव्यांचा गड मानले जाते. परंतु आता या ठिकाणी डाव्यांना जबर धक्का बसण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलच्या आकड्यांनुसार तेथे काँग्रेस सत्तेत येऊ शकते. तसा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Kerala Election Exit Polls : चार राज्यं आणि एका केंद्रशासित प्रदेशामध्ये नुकतेच विधानसभेची निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा निकाल येत्या 4 मे रोजी लागणार आहे. त्याआधी पश्चिम बंगालच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया आज पूर्ण झाली. दरम्यान, मतदान संपताच आता वेगवेगळ्या संस्थांचे एक्झिट पोल आले आहेत. या एक्झिट पोलच्या आकड्यांनुसार पश्चिम बंगालमध्ये मोठा उलटफेर होण्याची शक्यता आहे. तेथे ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला जबर हादरा बसू शकतो. तेथे भाजपाची सत्ता येऊ शकते. दुसरीकडे आसाममध्ये भाजपाची सत्ता कायम राहू शकतो. दरम्यान, केरळ राज्यात मात्र सर्वांनाच थक्क करणारा चमत्कार घडण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक दशकांपासून तेथे सत्तेत असलेल्या डाव्यांना जबर धक्का बसू शकतो. तेथे काँग्रसचे सरकार येण्याची शक्यता, एक्झिट पोलच्या आकड्यांमध्ये व्यक्त करण्यात आली आहे.
एक्झिट पोलच्या आकड्यात नेमके काय आहे? कोणाची सत्ता येणार?
एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार केरळमध्ये यावेळी मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. तेथे एलडीएफ म्हणजेच लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटला (डावे पक्ष) एकूण 58 ते 68 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे यूडीएफ म्हणजेच युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटला (काँग्रेसप्रणित आघाडी) 66 ते 76 जागा मिळू शकतात. या राज्यात भाजपाला 10 ते 14 जागा मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच केरळ राज्यात डाव्यांची सत्ता जाण्याची शक्यता आहे. तेथे काँग्रेस सरकार स्थापन करू शकते.
काँग्रेस सत्तेत बसणार, डाव्यांना धक्का
केरळ हे राज्य डाव्यांचा गड मानले जाते. गेल्या कित्येक वर्षांपासून तेथे काँग्रेस आणि भाजपा हे दोन्ही राष्ट्रीय पक्ष आपलं बस्तान बसवण्याच्या प्रयत्नात आहेत. परंतु तेथे जनतेने डाव्यांनाच पसंती दिलेली आहे. असे असताना यावेळी मात्र चित्र वेगळे असण्याची शक्यता आहे. तेथे काँग्रेस पक्ष सत्तेत बसू शकतो. त्यामुळे नेमकं काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
टीप- एक्झिट पोलचे आकडे खरेच असतात असे नाही. प्रत्यक्ष मतमोजणीनंतरच कोणाची सत्ता येईल, हे स्पष्ट होईल. एक्झिट पोलच्या आकड्यांवरून कोणचाा विजय होणार याचा फक्त अंदाज बांधता येतो.
