आम्ही POK मध्ये तिरंगा फडकवायला चाललोय, भाजप नेत्याची घोषणा; नेमकं प्रकरण काय?

. 2014 साली भारताचे क्षेत्रफळ काय होते, आज काय आहे? भारतीय जनता पार्टी याची माहिती देऊ शकेल का? असा सवाल अखिलेश यादव यांनी ट्वीटच्या माध्यमातून केला होता.

आम्ही POK मध्ये तिरंगा फडकवायला चाललोय, भाजप नेत्याची घोषणा; नेमकं प्रकरण काय?
pok and indian flag
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 16, 2026 | 10:04 PM

India Vs Pakistan : उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली. रविवारी (16ऑगस्ट) केशव प्रसाद मौर्य हे कौशांबी दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना त्यांनी पाकव्याप्त काश्मीर, काँग्रेस, वंदे मातरम् तसेच इतर अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. समाजवादी पार्टी हा पक्ष लवकरच संपणार आहे, असा दावाही त्यांनी केला. अखिलेश यादव यांनी भारताची सीमा आणि शेजारील राष्ट्रांच्या विस्तारवादी भूमिकेवरून मोदी सरकारला घेरले होते. अखिलेश यादव यांच्या या टीकेवरही मौर्य यांनी प्रत्युत्तर दिले आहे. विशेष म्हणजे लवकरच पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताचा तिरंग फडकणार आहे, असा दावाही त्यांनी केला.

अखिलेश यादव नेमकं काय म्हणाले होते?

अखिलेश यादव यांनी मतदारसंघांच्या पुनर्रचनेवरून मोदी सरकारला घेरले होते. मतदारसंघांच्या पुनर्रचनेऐवजी देशाच्या सीमेचे संरक्षण करावे. 2014 साली भारताचे क्षेत्रफळ काय होते, आज काय आहे? भारतीय जनता पार्टी याची माहिती देऊ शकेल का? असा सवाल अखिलेश यादव यांनी ट्वीटच्या माध्यमातून केला होता. यादव यांच्या याच प्रश्नाला केशव प्रसाद मौर्य यांनी प्रत्युत्तर दिले.

पीओकेवर भारताचा तिरंगा फडकणार

अखिलेश यादव यांनी भारताच्या क्षेत्रफळाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर बोलताना 2014पूर्वी भारताकडे जितका भूभाग होता, तितकाच आजही आहे. उलट भारताचा आता विस्तार होणार आहे. भारत त्या मार्गाने चालतो आहे, असा दावा त्यांनी केला. भारत आता लवकरच पाकव्याप्त काश्मीरमध्ये तिरंगा फडकविणार आहे, असेही ते म्हणाले.

मौर्य यांची काँग्रेसवरही टीका

काँग्रेसच्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमातील ‘वंदे मातरम्’ गीताच्या मुद्द्यावरूनही मौर्य यांनी टीका केली. देशभरात स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला. सर्वत्र ‘वंदे मातरम्’चे या गीताचे सर्व कडवे सादर झाले. परंतु काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी यामध्ये अडथळा आणला, असा दावा त्यांनी केला. काँग्रेसने घडलेल्या प्रकाराबद्दल देशाची माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान या टीकेवर आता काँग्रेस तसेच अखिलेश यादव काय उत्तर देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us