AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किम जोंगची हत्या म्हणजेच जगाचा अंत… अणुहल्ल्याचा थेट नियमच बदलला, आणखी किती देशांमध्ये असा नियम?

उत्तर कोरियाने पुन्हा एकदा संपूर्ण जगाचं लक्ष आपल्याकडे वेधलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार उत्तर कोरियाने आपल्या संविधानात बदल केला आहे. नव्या बदलानुसार उत्तर कोरियाने आता अणु -प्रतिहल्ल्याबाबतचे आपले धोरण अधिक मजबूत केलं आहे.

किम जोंगची हत्या म्हणजेच जगाचा अंत… अणुहल्ल्याचा थेट नियमच बदलला, आणखी किती देशांमध्ये असा नियम?
Kim Jong UnImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 09, 2026 | 9:51 PM
Share

उत्तर कोरियाने पुन्हा एकदा संपूर्ण जगाचं लक्ष आपल्याकडे वेधलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार उत्तर कोरियाने आपल्या संविधानात बदल केला आहे. नव्या बदलानुसार उत्तर कोरियाने आता अणु -प्रतिहल्ल्याबाबतचे आपले धोरण अधिक मजबूत केलं आहे. संविधानातील सुधारीत बदलानुसार जर समजा उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांच्यावर एखाद्या देशाने हल्ला केला, किंवा एखाद्या हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला तर देशाच्या संरक्षणासाठी अणू हल्ला करण्याचे अधिकार आता तेथील सैन्याला प्राप्त झाले आहेत. याचाच अर्थ असा की जर किम जोंग उन यांचा मृत्यू झाला तर उत्तर कोरियाचं सैन्य जगातील कोणत्याही देशावर थेट अणु हल्ला करू शकते. उत्तर कोरियाप्रमाणेच जगात आणखी असे काही देश आहेत, ज्या देशांमध्ये देखील असा कायदा बनवण्यात आला आहे.

रशिया – रशियाकडे स्वयंचलित प्रतिहल्ला प्रणाली आहे. रशियाची ही स्वयंचलित प्रतिहल्ला प्रणाली जगप्रसिद्ध आहे. समजा एखाद्या मोठ्या हल्ल्यात रशियाच्या प्रमुखाचा मृत्यू झाला तर या स्वयंचलित प्रणाली प्रतिहल्ला करण्यासाठी सक्षम आहे. याद्वारे कुठल्याही देशावर अणू हल्ला होऊ शकतो.

अमेरिका – अमेरिकेमध्ये अणूबॉम्ब हल्ल्याचे सर्वाधिकार हे राष्ट्रपतींकडे आहेत, मात्र जर युद्धकाळात राष्ट्रपतींचा एखाद्या हल्ल्यात मृत्यू झाला तर अमेरिकेमध्ये देखील अपत्कालीन यंत्रणा तयार ठेवण्यात आली आहे. समजा एखाद्या युद्धामध्ये अमेरिकेच्या सर्वोच्च नेतृत्वाचा मृत्यू झाला तर अशा स्थितीमध्ये एका कमांडरकडे अणू हल्ल्यांसंदर्भातील अधिकार असतात, तो अशा स्थितीमध्ये त्या देशावर अणु हल्ला करू शकतो.

चीनमध्ये काय स्थिती?

चीनकडून अधिकृतपणे No First Use प्रथम वापर नाही, या अणु धोरणाचे पालन केले जाते. याचा अर्थ असा की कोणत्याही युद्धात चीनकडून पहिल्यांदा अणु हल्ला होणार नाही. मात्र जर समजा एखाद्या देशाने जर चीनवर अणु हल्ला केला तर मग चीनकडून देखील अणू हल्ला केला जाऊ शकतो. प्रत्येक देशाचं अणु धोरण हे वेगवेगळं आहे.

Follow Us
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार