AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सब बिकता है… 11 लाखात महामंडलेश्वर, एक लाखात अमृतस्नान, फक्त 5 हजारात… किन्नर आखाड्याची रेट लिस्ट समोर

हिमांगी सखी यांनी किन्नर आखाड्यातील भ्रष्टाचाराचा आणि मारहाणीचा गंभीर आरोप केला आहे. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांवर महामंडलेश्वर पद विक्री आणि अनाचारांचे आरोप आहेत. 11 लाख रुपयात महामंडलेश्वर खिरापतीसारखं वाटलं जात आहे, असा आरोपही हिमांगी सखी यांनी केला आहे.

सब बिकता है... 11 लाखात महामंडलेश्वर, एक लाखात अमृतस्नान, फक्त 5 हजारात... किन्नर आखाड्याची रेट लिस्ट समोर
Himangi Sakhi and Mamta Kulkarni Image Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Feb 12, 2025 | 2:59 PM
Share

अभिनेत्री ममता कुलकर्णीने किन्नर आखाड्याचं महामंडलेश्वर पद स्वीकारलं आणि सोडलं, त्यामुळे किन्नर आखाडा चर्चेत आला आहे. यावरून वाद होत असून टीकाही होत आहे. हे वाद सुरू असतानाच महामंडलेश्वर हिमांगी सखी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. लक्ष्मी नारायण त्रिपाठी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माझ्याशी मारहाण केली, असा आरोप करतानाच हिमांगी सखीने तिच्या अंगावरील जखमाच दाखवल्या आहेत.

महामंडलेश्वर हिमांगी सखीने किन्नर आखाड्यात होत असलेल्या कामकाजावर सवाल उपस्थित केले आहेत. मी या कामकाजावर सवाल केले म्हणून मला आखाड्याच्या बाहेर काढण्यात आलं. मला मारहाण करण्यात आली. केवळ पाच हजार रुपयात आखाड्याचे ओळखपत्र दिलं जात आहे. महामंडलेश्वर पदही विकलं जातं. यासाठी 11-11 लाख रुपये घेतले जातात. लक्ष्मी नारायण त्रिपाठीच ही रक्कम मागते. बग्गीत बसायचं असेल आणि शाही सन्ना करायचं असेल तर एक लाख रुपये मागितले जात आहेत, असा गंभीर आणि खळबळजनक दावाच हिमांगी सखी यांनी केला आहे.

मी आवाज उठवला

किन्नर आखाड्यात पैसे घेऊन महामंडलेश्वर पद दिलं जात आहे. ममता कुलकर्णी प्रकरणातही असचं झालंय. किन्नर आखाड्यात मांस, मदिरेचं सेवन केलं जातं. लक्ष्मी नारायण त्रिपाठीच्या देखरेखीत हे सर्व होत आहे. माझ्या शिबीरात येऊन मला मारहाण केली गेली. मी चुकीच्या विरोधात आवाज उठवला. त्यामुळेच माझ्यासोबत असं झालं, असं ती म्हणाली.

दारू आणि मांस

मी वैष्णव धर्माची आहे. मी सुरुवातीपासूनच सनातनी आहे. आम्हाला नशा करणं, मांस आणि मदिरेचा आम्हाला शौक नाही. जे लोक मांस मदिरचं सेवन करतात, ते आमच्यात येऊ शकत नाही, असं सांगतानाच महाकुंभात किन्नर आखाड्यातील शिबीरात नशापानी केलं जातं. दारू प्यायली जाते. मांस-मदिरेची रेलचेल असते. हे सर्व आखाड्याच्या प्रमुख लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्या देखरेखीत होत आहे, असं त्या म्हणाल्या.

11 लाखात महामंडलेश्वर

लक्ष्मी नारायण त्रिपाठी स्वत:ला धर्मगुरू समजतात. त्या काय संदेश देतात? 11-11 लाख रुपये गेऊन महामंडलेश्वर बनवलं जात आहे, असा आरोप करतानाच हिमांगी सखी यांना रडू कोसळलं. मी लक्ष्मी नारायण त्रिपाठींविरोधात कायदेशीर लढा देणार आहे. जे चुकीचं आहे, त्याविरोधात आवाज उठवणार आहे. किन्नर आखाडा आमच्याविरोधात गुंडगिरी करत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल