लग्नाच्या घरात पोहोचले किन्नर, केली मोठ्या रकमेची डिमांड, पैसे न मिळाल्याने विचित्र कृत्य, जाणून व्हाल हैराण
लग्नाच्या घरात किन्नरांना घातला गोंधळ, केला अव्वाच्या सव्वा पैशांची डिमांड... पण नवऱ्या मुलाने मागणी पूर्ण केली नाही म्हणून केलं विचित्र कृत्य... जाणून तुम्हाला देखील बसेल धक्का

तृतीयपंथी म्हणजे किन्नर यांचं आयुष्य सामान्य लोकांपेक्षा फार वेगळं असतं. तृतीयपंथी सकाळी किती वाजता उठतात, कमाई कशी करतात? ट्रेनच्या माध्यमातून त्यांची किती कमाई होते… असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतात. तर शुभ कार्यात देखील किन्नरांना आशीर्वाद देण्यासाठी बोलावण्यात येत. अशात किन्नर ठराविक रकमेची मागणी करतात. पण त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर, किन्नर शाप देतात असं देखील म्हणतात. असं काही एका लग्नाच्या घरात झालं आहे.
ही घटना प्रयागराजमधील मीरापूर शहरातील आहे, जिथे एका मुलाचं लग्न होतं. लग्न असल्यामुळे भोजनाची देखील व्यवस्था करण्यात आली होती. भोजनाच्या दुसऱ्या दिवशी किन्नर समाज लग्न घरात आले आणि त्यांनी सोहळ्याला सुरुवात केली. सोहळा झाल्यानंतर किन्नर यांनी मोठ्या रकमेची मागणी केली. लग्ना घरातील लोकांना किन्नरांना 11 हजार रुपये दिले. पण त्यांनी तब्बल 51 हजार रुपयांची मागणी केली.
किन्नरांची 51 हजारांची मागणी पूर्ण केली नाही. पण 11 हजार रुपये घेतल्यानंतर किन्नरांनी वराला शाप दिला. ते म्हणाले की तू लवकरच मरशील आणि तुझी बायको विधवा होईल आणि तुला मूल होणार नाही. घडत असलेला घटना पाहून लोक हैराण झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, अरुण कुमार निषाद हे मीरापूर काकराहा घाट येथील रहिवासी आहेत. ते म्हणतात की, 9 मे रोजी त्यांच्या धाकट्या भावाच्या लग्नाच्या भोजन समारंभानंतर 11 मे रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास परिसरातील किन्नर माझ्या घरी आले आणि त्यांना 51 हजार रुपयांची मागणी केली.
मी माझी असमर्थता व्यक्त केली तेव्हा माझ्या कुटुंबाला शिवीगाळ करण्यात आली आणि माझ्या धाकट्या भावाला आणि सुनेला उघडपणे शिवीगाळ करण्यात आली. यादरम्यान आम्ही 112 वर फोन करून पोलिसांना बोलावलं. त्यानंतरही पोलिसांसमोर त्यांची क्रूरता सुरूच राहिली. पोलिसांनी देखील किन्नर समाजावर कोणताच दबाव आणला नाही. ही चिंतेची बाब होती. पोलिसांकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.
अखेर प्रकरण पोलीस स्थानकात पोहोचलं. या मुद्द्यावर एक करार लिहून प्रकरण संपवण्यात आलं. यानंतरही किन्नरांचा दृष्टिकोन अजिबात बदलला नाही. ते सतत गुंडगिरी, लुटमार आणि परिसरातील लोकांशी गैरवर्तन करत आहेत. ते लोकांना त्रास देत आहेत आणि त्यांच्याकडून पैसे वसूल करत आहेत. जर प्रशासनाने या सर्व घटनांची दखल घेतली नाही तर या समस्येमुळे कधीही गंभीर घटना घडू शकत… अशी शक्तता देखील वर्तवण्यात आली.
