AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ममतांच्या जीवावर संसदेत पोहचणारे मिथून चक्रवर्ती भाजपात कसे? काय आहे गुपित?

सत्ताधारी तृणमूल काँग्रेसपासून (TMC) पासून आपलंच सरकार येणार असा दावा करणाऱ्या भाजपपर्यंत सर्वच पक्षांनी प्रचाराचा धुराळा उठवलाय.

ममतांच्या जीवावर संसदेत पोहचणारे मिथून चक्रवर्ती भाजपात कसे? काय आहे गुपित?
| Updated on: Mar 07, 2021 | 4:05 PM
Share

कोलकाता : पश्चिम बंगालमधील राजकारणाचा पारा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलाच चढलाय. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसपासून (TMC) पासून आपलंच सरकार येणार असा दावा करणाऱ्या भाजपपर्यंत सर्वच पक्षांनी प्रचाराचा धुराळा उठवलाय. अभिनय क्षेत्रातील दिग्गजांच्या एन्ट्रीने पश्चिम बंगाल निवडणुकीत चांगलाच रंग भरलाय. भाजपने अनेक सिनेकलाकारांना पक्षात घेतलंय. त्यातच प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचाही भाजप प्रवेश झाल्याने चर्चेला उधाण आलंय. विशेष म्हणजे आधी ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय आणि त्यांच्याच बळावर संसदेत पोहचणाऱ्या मिथुन यांच्या भाजप प्रवेशाने निवडणूक प्रचाराला वेग आलाय. मात्र, ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश का केला याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत (Know all about Political journey of Mithun Chakraborty West Bengal Assembly election).

काही दिवसांपूर्वी मिथुन यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत यांच्यासोबतचा फोटो व्हायरल झाल्यापासून मिथुन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. अखेर त्यांनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला. मिथुन यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात ममता बॅनर्जी यांच्या टीएमसीमधून केली होती. 2011 मध्ये पश्चिम बंगालमध्ये टीएमसी आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सर्वोच्च स्थानी होती. त्यावेळी ममतांनी मिथुन यांना टीएमसीसोबत जोडलं.

मिथुन यांची ओळख ममता बॅनर्जींचे निकटवर्तीय म्हणून

2014 मध्ये ममता बॅनर्जी यांनी मिथुन चक्रवर्ती यांना राज्यसभेवरही पाठवले. मात्र, त्यांनी 2 वर्षानंतर राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. 2016 च्या अखेरीस राजीनामा देत त्यांनी राजकीय संन्यास घेतल्याची घोषणा केली. राजकीय संन्यास घेण्याच्या त्यांच्या निर्णयामागे चिटफंड घोटाळ्याचं कारण असल्याचंही बोललं गेलं. या घोटाळ्यात त्यांचं नाव आलं होतं. तसेच ते स्वतः या चिटफंडची कंपनी शारदा कंपनीचे ब्रँड अॅम्बेसेडर होते. त्यांची ईडीकडून चौकशीही झाली होती. त्यानंतरच त्यांनी राजकीय संन्यास घेतल्यानं चर्चेला उधाण आलं.

आता मात्र त्याच मिथुन चक्रवर्ती यांनी राजकीय संन्यासाची घोषणा बाजूला ठेवत भाजपमध्ये प्रवेश केलाय. तसेच थेट ममता बॅनर्जी यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत.

मिथुन चक्रवर्ती यांचा डाव्यांशीही संबंध

तारुण्यात मिथुन चक्रवर्ती यांचा पश्चिम बंगालमधील डाव्या पक्षांशीही संबंध आला. त्यांनी स्वतः अनेकदा सार्वजनिकपणे याला दुजोरा दिलाय. ते डाव्या पक्षाचे वरिष्ठ नेते सुभाष चक्रवर्ती यांचे निकटवर्ती होते. त्यामुळेच त्यांनी टीएमसीत प्रवेश केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र, टीएमसीसोबतचा प्रवास फार काळ टिकला नाही.

मिथुन भाजपकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा?

भाजप पश्चिम बंगालमध्ये मिथुन चक्रवर्ती यांना आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा करण्याचीही चर्चा आहे. भाजपने अद्याप बंगालमध्ये आपला मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केलेला नाही. मिथुन चक्रवर्ती शनिवारी (6 मार्च) रात्री उशिरा कोलकात्याला पोहचले. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ब्रिगेड सभेत सहभागी होणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय महासचिव कैलाश विजयवर्गीय यांनी शनिवारीच कोलकातामध्ये मिथुन चक्रवर्ती यांची भेट घेतली होती.

हेही वाचा :

कोबरा हूँ… हक छीनेगा तो खड़ा हो जाऊंगा; मिथुन चक्रवतींचा भाजपच्या रॅलीतून हुंकार!

मोदींची पश्चिम बंगालमध्ये रॅली, मिथुन चक्रवर्तींचीही ‘एन्ट्री’; पश्चिम बंगालची हवा बदलणार?

मोहन भागवत अभिनेते मिथुन चक्रवर्तींच्या घरी, बंगाल निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व

व्हिडीओ पाहा :

Know all about Political journey of Mithun Chakraborty West Bengal Assembly election

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.