
Kolkata Rape Case: कोलकाता येथील प्रतिष्ठित साऊथ कोलकाता लॉ कॉलेजमध्ये 25 जून रोजी एका 24 वर्षीय विद्यार्थिनीवर कथितपणे सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणाती आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, या प्रकरणात आरोपींची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी माध्यमांशी बोलताना दावा केला आहे. संबंधित मुलीवर बलात्कार झाला असेल तर तिच्या अंगावर लव्ह बाईट कसे काय अस शकतात? असा अजब तर्क या वकिलाने लावला आहे.
लॉ कॉलेज सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीचे नाव मनोजित मिश्रा असे आहे. या प्रकरणी मनोजितसह एकूण तिघांना अटक करण्यात आले आहे. न्यायालयात मनोजित मिश्रा याची बाजू अॅड. राजू गांगुली यांनी मांडली. त्यानंतर गांगूली यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. तक्रारदार पक्ष फक्त एकच बाजू पाहात आहे. आरोपीच्या अंगावर जे ओरखडे आहेत, त्याचीच चर्चा केली जात आहे. मात्र आरोपीच्या शरीरावर लव्ह बाईट्स मिळालेले आहेत, हे कोणीही सांगत नाहीये. एखाद्या व्यक्तीवर बलात्कार होत असेल तर बलात्कार करणाऱ्या व्यक्तीच्या शरीरावर लव्ह बाईट्स कसे काय असू शकतात? असा सवाल अॅड.राजू गांगुली यांनी उपस्थित केला आहे.
तसेच आरोपीच्या शरीरावर ओरखडे दिसून आले आहेत, हे खरंय. हे ओरखडे पाहून तरुणीने विरोध केला याचे संकेत मिळूही शकतात. मात्र आरोपीच्या अंगावर काही निशाण असेही आहेत, ज्यातून त्यांच्यातील नात्याची समंती दिसून येते, असाही तर्क अॅड राजू गांगुली यांनी लावला.
लॉ कॉलेजमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार करताना व्हिडीओही रेकॉर्ड करण्यात आला होता. या व्हिडीओविषयीही अॅड. गांगुली यांनी अजब तर्क लावला. अनेकजण या व्हिडिओला टॉर्चर व्हिडिओ म्हणत आहेत. यावर बोलताना गांगुली म्हणाले की, या व्हिडीओचा चुकीच्या पद्धतीने संदर्भ घेतला जात आहे. हा टॉर्चर व्हिडीओ नाही. आरोपीच्या गळ्यावर लव्ह बाईट्स असतील तर तुम्ही हा व्हिडीओ कसा असेल, हे समजू शकता. प्रतिवादी काहीतरी पवत आहेत. जनतेला भ्रमित केलं जातंय.
दरम्यान, अॅड. गांगुली यांच्या या तर्कांमुळे लॉ कॉलेजमधील सामूहिक बलात्कार प्रकरणात नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.