ज्या जागेवर नमाज पठण, तेथे पंतप्रधान मोदींचा 35 हजार लोकांसोबत मोठा इतिहास, काँग्रेस नेत्याचा आक्षेप कारण…
ज्या जागेवर फक्त नमाज पठणाला परवानगी होती, त्या जागेचं वास्वत नेमकं काय? तेथे पंतप्रधान मोदींचा 35 हजार लोकांसोबत मोठा इतिहास, काँग्रेस नेत्याने का घेतला असा आक्षेप? सध्या सर्वत्र काँग्रेस नेत्याने उपस्थित केलेल्या प्रश्नाची चर्चा रंगली आहे?

नुकतात अंतराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगचं महत्त्व जनतेला पटवून दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाच्या वर्षी पश्चिम बंगाल, कोलकाता येथे जनतेसोबत योग दिवस साजरा केला. पण आता यामुळे नव्या वादाची सुरुवात झाली आहे. वादाची सुरुवात कोलकाता येथील रेड रोडवरून झाली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रेड रोडवर फक्त नमाजसाठी परवानगी दिली जात होती. कोणत्याही हिंदू सणासाठी किंवा योगासाठी येथे परवानगी दिली जात नव्हती. आता रेड रोडवर पंतप्रधानांसोबत 35 हजारांहून अधिक लोकांनी एकत्र योगाभ्यास केल्यानंतर वाद टोकाला पोहोचला. यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. बंगालमध्ये जातीय विभाजनाचं राजकारण वाढीस लावण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप त्यांनी केला.
अधीर रंजन चौधरी चौधरी म्हणाले, ‘ईदच्या दिवशी गेल्या अनेक वर्षांपासून रेड रोडवर नमाज पठण केली जायची… यावर हिंदू बांधवांना कोणत्याही प्रकारचा आक्षेप नव्हता आणि मुस्लीमांवर कोणता तिरस्कार नव्हता … ईद वर्षातून फक्त एकदा येते आणि नमाज देखील फक्त एक तासाची असते… पण असं रुजवण्यात आलं की, रस्ता बंद केल्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास होत आहे… त्यामुळे रेड रोडवर होणारी नमाज बंद करण्यात आली आणि ब्रेगेट परेड ग्राउंडवर आयोजित करण्यात आली…’
अधीर रंजन चौधरी चौधरी यांनी असा प्रश्न उपस्थित केला की, ‘जर ब्रिगेड परेड ग्राउंड मुस्लिमांसाठी निश्चित करण्यात आलं असेल, तर पंतप्रधान मोदींच्या योग कार्यक्रमासाठी ‘रेड रोड’ का बंद केला जात आहे? कोणत्या अधिकाराखाली हे केलं जात आहे? तेव्हा सरकारचं असं म्हणणं होतं की, प्रवाशांना त्रास होतो, तर आता योग कार्यक्रमाने प्रवाशांना त्रास झाला नाही?
”रेड रोड’वरील वाहतूक थांबवल्याने राज्यातील जनतेला काही ठोस फायदा होईल का, हे पश्चिम बंगाल सरकार स्पष्ट करू शकेल का? असे देखील प्रश्न काँग्रेस नेत्याने उपस्थित केले. एवढंच नाही तर, संकुचित वृत्ती ही कधीच बंगालची ओळख राहिलेली नाही. जातीय आणि संकुचित राजकारणाच्या वातावरणाने राज्याला दूषित करु नका… असं देखील अधीर रंजन चौधरी चौधरी म्हणाले.
केंद्र सरकारवर साधला निशाणा…
अधीर रंजन चौधरी चौधरी यांनी सत्तेत असलेल्या भाजप पक्षावर निशाणा साधला आहे. ‘ही सरकार देशातील सर्व पक्ष फोडून खासदार, आमदारांना स्वतःसोबत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. कारण त्यांना संसदेत दोन-तीन महत्त्वाची विधेयके मंजूर करून घ्यायची आहेत. याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे… असं देखील काँग्रेस नेते म्हणाले आहेत.