AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उज्जवल निकम केंद्रीय मंत्रिमंडळात? अमित शहांच्या भेटीने चर्चांना उधाण, दिल्लीत मोठ्या घडामोडी

गेल्या काही काळापासून केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा रंगली आहे. अशातच आता भाजपचे राज्यसभा खासदार उज्जवल निकम यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे.

उज्जवल निकम केंद्रीय मंत्रिमंडळात? अमित शहांच्या भेटीने चर्चांना उधाण, दिल्लीत मोठ्या घडामोडी
Amit Shah Ujjwal nikam MeetingImage Credit source: X
| Updated on: Aug 11, 2026 | 11:29 PM
Share

राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही काळापासून केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा रंगली आहे. अशातच आता भाजपचे राज्यसभा खासदार उज्जवल निकम यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. त्यामुळे आता त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचीही चर्चा रंगू लागली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

उज्ज्वल निकम अमित शहांच्या भेटीला

उज्जवल निकम यांनी अमित शाह यांची भेट घेतली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू असताना या भेटीला खास महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यांना आता केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र याबाबत अद्याप घोषणा झालेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, संसदेचे अधिवेशन संपल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. या विस्ताराआधी झालेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

निकम यांच्याबाबत मुंबईतून चांगला अहवाल

सूत्रांच्या माहितीनुसार, उज्जवल निकम आणि अमित शाह यांच्या भेटीचा फोटो समोर आला आहे. ज्येष्ठ वकील असलेले निकम हे भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांच्याबाबत मुंबईहूनही चांगला अहवाल दिल्लीला पोहोचला आहे. त्यामुळे त्यांचे प्रमोशन होऊन त्यांच्यावर महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता देशाचे लक्ष मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागले आहे.

कोण आहेत उज्ज्वल निकम?

उज्ज्वल निकम हे प्रसिद्ध विशेष सरकारी वकील आहेत. हत्या, दहशतवाद आणि इतर गाजलेल्या फौजदारी खटल्यांमध्ये त्यांनी सरकारची बाजू मांडली आहे. 2025 मध्ये त्यांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती झाली. त्यांना 2016 मध्ये पद्मश्री पुरस्कारही मिळाला आहे. आता त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उज्ज्वल निकम यांच्या गाजलेल्या केसेस

  • 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण : निकम यांची या खटल्यासाठी सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली होती. या प्रकरणात निकम यांनी सरकारची बाजू मांडली. त्यांच्या कारकिर्दीला मोठी राष्ट्रीय ओळख मिळवून देणाऱ्या प्रकरणांपैकी हे एक होते.
  • 26/11 मुंबई दहशतवादी हल्ला : हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात प्रसिद्ध खटला मानला जातो. 26/11 हल्ल्यात जिवंत पकडला गेलेला दहशतवादी अजमल कसाब याच्याविरुद्धच्या खटल्यात निकम विशेष सरकारी वकील होते. त्यांनी कसाबविरोधात सरकारची बाजू मांडली आणि न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा सुनावली.
  • गुलशन कुमार हत्या प्रकरण : टी-सीरीजचे संस्थापक आणि चित्रपट निर्माते गुलशन कुमार यांची मुंबईत हत्या झाली होती. या हत्येच्या खटल्यात निकम सरकारी वकील होते. मात्र या प्रकरणात अनेक आरोपी निर्दोष सुटले आणि अखेरीस एका आरोपीची दोषसिद्धी झाली.
  • प्रमोद महाजन हत्या प्रकरण : भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांची त्यांचे भाऊ प्रवीण महाजन यांनी गोळी झाडून हत्या केली होती. या गाजलेल्या खटल्यातही निकम यांनी सरकारची बाजू मांडली.
  • कोपर्डी बलात्कार व हत्या प्रकरण : कोपर्डी प्रकरणातही ते विशेष सरकारी वकील होते. या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी त्यांनी सरकारची बाजू मांडली.

Follow Us
संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
Santosh Pandit Case | संतोष पंडितांना मोठा धक्का! 21 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी
धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार...
Uday Samant on Uddhav Thackeray | धनुष्यबाण गोठवा! उद्धव ठाकरेंची मागणी; उदय सामंतांचा सणसणीत पलटवार, म्हणाले काँग्रेसच्या मांडीवर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
MPSC अध्यक्षांनी राजीनामा द्यावा! रोहित पवारांची मोठी मागणी; नाही दिला तर...
भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये!
Devendra Fadnavis | भरती परीक्षांतील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार ॲक्शन मोडमध्ये! मुख्यमंत्र्यांनी काय दिले आदेश?
दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का?
Uddhav Thackeray | दहिहंडीतलं उत्तान नृत्य नव हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनी सरकारला घेरलं
मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी...
Mumbai-Pune Expressway | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर नंबर प्लेटचा खेळ! दंडापासून वाचण्यासाठी अनोखी शक्कल; एकाच गाडीवर तब्बल...
PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट..
मोठी बातमी! PM मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न? BKCमध्ये बनावट PMO IDसह तरुण ताब्यात
उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना....
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मोठी मागणी! धनुष्यबाण चिन्ह गोठवा; शिवसेना पक्षचिन्हाच्या लढाईला नवं वळण
एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही!
CM Devendra Fadnavis | एकाच्या ताटातलं काढून दुसऱ्याच्या ताटात टाकणारे आम्ही नाही! मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात...
Onion Price Hike | शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! कांद्याला मिळतोय विक्रमी भाव; पिंपळगावात 6600, तर लासलगावात दर किती?