AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गांजा पिऊन पायलट उडवत होता विमान, एअर इंडियाच्या फुकेत ते दिल्ली विमान प्रकरणाला वेगळे वळण

एअर इंडियाच्या फ्लाईट AI2379 च्या पायलट-इन-कमांडच्या कन्फर्मेटरी लॅब टेस्टच्या मारिजुआनासाठी पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे हा मुख्य पायलट गांजा पिलेला होता अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.

गांजा पिऊन पायलट उडवत होता विमान, एअर इंडियाच्या फुकेत ते दिल्ली विमान प्रकरणाला वेगळे वळण
Air india
| Updated on: Aug 11, 2026 | 10:33 PM
Share

एअर इंडियाच्या फुकेट ते दिल्ली विमान एअर टर्ब्युलन्स निर्माण होऊन विमान ३०० फूट खाली येऊन विमानातील १७ प्रवासी आणि क्रु मेंबर जखमी झाले होते. या फ्लाईट क्रमांक AI2379 विमानाचा पायलट-इन-कमांड डोपिंग टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आला होता.आता त्याची दुसरी डोपिंग टेस्टही पॉझिटिव्ह आली आहे. पायलट-इन-कमांडची कन्फर्मेटरी लॅब टेस्ट मारिजुआना ( गांजा ) पॉझिटिव्ह आली आहे.म्हणजे वैमानिक गांजा पिऊन विमान उडवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दोन्ही पायलटची झाली होती मेडिकल तपासणी

या घटनेनंतर विमानाच्या दोन्ही पायलटची सायकोएक्टीव्ह सब्सटन्स स्क्रीनिंग करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार को-पायलटच्या सुरुवातीच्या तपासात अशी कोणतीही संशयास्पद बाब उघडकीस आली नव्हती. मात्र, पायलट इन कमांडच्या सुरुवातीच्या स्क्रीनिंगचा परिणाम असा आला की विस्तृत तपासणी गरज लागली. यानंतर पायलट-इन-कमांडचा सँपल कन्फर्मेटरी टेस्टसाठी एका लॅबमध्ये पाठवण्यात आले होते. या तपासणीत सँपल मारिजुआनासाठी पॉझिटिव्ह आढळले.

फ्लाईंग रोस्टरवरुन हटवले दोन्ही पायलट

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत दोन्ही पायलटना आधीच फ्लाईंग रोस्टरवरुन हटवण्यात आले होते. सध्या दोन्ही पायलट विमान उड्डाणावरुन ड्युटीवरुन हटवण्यात आले आहे. आता पुढील कारवाई तपास पूर्ण झाल्यानंतर आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या निष्कर्षाच्या आधारे केली जाणार आहे.

काय म्हणाले मंत्री राम मोहन नायडू?

पायलटच्या अमलीपदार्थांच्या सेवनाशी जुडलेल्या नियमात संभाव्य सुधारणा संदर्भात नागरी उड्डान मंत्री राम मोहन नायडू किंजरापु यांनी सांगितले की आम्ही या मुद्यांवर सतत अभ्यास करत आहोत. आम्ही DGCA ( नागरी विमान संचनालयाने ) देखील या संदर्भात अपडेट मागितले आहेत. आम्ही या गंभीरतेने घेत आहोत. जर आम्हाला वाटले की सध्याचे नियम पर्याप्त नाहीत. आम्ही यावर गंभीरपणे पावले उचलणार आहोत. जेथे गरज असेल तेथे नियमात बदल करु.

४ ऑगस्ट रोजी एअर इंडियाचे थायलंडच्या फुकेतवरुन दिल्लीला येणारे विमान अचानक टर्बुलन्समध्ये सापडले होते. यामुळे विमान ३०० फूट खाली आले. त्यामुळे विमानात हवेचा दाब वाढून प्रवाशांना याचा मोठा फटका बसला.त्यामुळे विमानातील १३ प्रवासी आणि ४ क्रु मेंबर जखमी झाले होते. जखमींच्या उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. काही प्रवाशांच्या कान,मान आणि खांद्याला जखमा झाल्या होत्या. या विमानात एकूण १३७ प्रवासी आणि ८ क्रु मेंबर होते. टर्ब्युलन्स नंतरही विमानाने आपले उड्डाण कायम ठेवत सकाळी ११.०७ वाजता दिल्ली विमानतळावर सुखरुप लँडींग केले.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?