AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हीच माझी गुरुदक्षिणा! बॉलिवूड स्टार आणि हिटमॅन रोहित शर्मा निघाले गुरुबंधू; जॉन अब्राहमने केला खुलासा

बॉलिवूड स्टार जॉन अब्राहमने क्रिकेटबाबत एक खुलासा केला आहे. त्यामुळे क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण रोहित शर्मा आणि जॉन अब्राहम यांचा क्रिकेट कोच एकच असल्याचं त्याने सांगितलं आहे. नेमकं काय म्हणाला जाणून घेऊयात...

हीच माझी गुरुदक्षिणा! बॉलिवूड स्टार आणि हिटमॅन रोहित शर्मा निघाले गुरुबंधू; जॉन अब्राहमने केला खुलासा
हीच माझी गुरुदक्षिणा! बॉलिवूड स्टार आणि हिटमॅन रोहित शर्मा निघाले गुरुबंधू; जॉन अब्राहमने केला खुलासाImage Credit source: PTI/X
| Updated on: Aug 11, 2026 | 10:49 PM
Share

बॉलिवूड स्टार जॉन अब्राहम याची ख्याती एक मॉडेल, सिने अभिनेता म्हणून आहे. त्यामुळे एक बॉलिवूड अभिनेता म्हणून त्याची ओळख सर्वदूर आहे. पण त्याच्या एका खुलाशाने क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण त्याने लहान असताना क्रिकेटपटू बनण्याचा ध्यास घेतला होता. त्यासाठी क्रिकेटचे धडेही गिरवले. हे धडे त्याने रोहित शर्माच्या लहानपणीच्या प्रशिक्षक असलेल्या दिनेश लाड सरांकडे गिरवले हे विशेष.. खरं तर अनेकांना यावर विश्वास बसेना. पण खुद्द बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम याने प्रशिक्षकांच्या उपस्थितीत हा खुलाला केला आणि उपस्थिततांना आश्चर्याचा धक्का दिला. जॉन अब्राहम आणि कोच दिनेश लाड यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत त्याने जाहीरपणे याची कबुली दिली आणि सरांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. इतकंच काय तर या आदराला आपली ‘गुरुदक्षिणा’ असंही म्हंटलं.

दिनेश लाड हे मुंबई क्रिकेट विश्वातील एक लोकप्रिय नाव आहे. कारण त्यांच्या मार्गदर्शनाखालीच रोहित शर्माची जडणघडण झाली. त्यांनी रोहित शर्माच नाही तर शार्दुल ठाकुर, त्यांचा मुलगा सिद्धेश लाड यांनाही घडवलं. इतकंच काय तर अभिनेता जॉन अब्राहम यालाही क्रिकेटचे धडे शिकवले. शालेय जीवनात जॉन अब्राहम हा फुटबॉल आणि क्रिकेट या दोन्ही खेळात सक्रीय होता. मुंबईच्या बोरिवली भागात जेव्हा जॉन क्रिकेट खेळायचा, तेव्हा त्याला दिनेश लाड सरांचे मार्गदर्शन लाभले होते. जॉन अब्राहमने मिडिया चाहत्यांसमोर जाहीरपणे सांगितलं की, दिनेश लाड हे फक्त रोहित शर्माचे नाही तर माझेही प्रशिक्षक होते. त्यामुळे जॉन अब्राहम आणि रोहित शर्मा हे गुरूबंधु आहेत.

जॉन अब्राहम आणि दिनेश लाड यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना विश्वास बसत नाही. अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया या व्हिडीओखाली नोंदवल्या आहेत. तसेच व्हिडीओ शेअर करत आहेत.

Follow Us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा