AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लालू प्रसाद यादव यांचा मोठा निर्णय, मुलगा तेज प्रताप यांची पक्षातून हकालपट्टी, कुटुंबातूनही केलं बेदखल

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे लालू प्रसाद यादव यांनी आपला मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांना पक्षातून निलंबित केलं आहे. तसेच कुटुंबातून देखील बेदखल केलं आहे.

लालू प्रसाद यादव यांचा मोठा निर्णय, मुलगा तेज प्रताप यांची पक्षातून हकालपट्टी, कुटुंबातूनही केलं बेदखल
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 25, 2025 | 4:23 PM
Share

राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी आपला मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांच्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. लालू प्रसाद यादव यांनी तेज प्रताप यादव यांची सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी केली आहे. तसेच तेज प्रताप यादव यांना कुटुंबातून देखील बेदखल करण्यात येत असल्याचं लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं आहे. लालू प्रसाद यांनी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, या पोस्टमधून त्यांनी याबाबत माहिती दिली, इथून पुढे आता तेज प्रताप यांची पक्षात आणि कुटुंबासाठी कोणतीही भूमिका नसेल असं लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं आहे.

लालू प्रसाद यादव यांनी नेमकं काय म्हटलं?

वैयक्तिक जीवनात नैतिक मूल्यांकडे दुर्लक्ष केल्यानं सामाजिक न्यायासाठीचा आपला सामूहिक संघर्ष कमकुवत होतो. मोठ्या मुलाचा सार्वजनिक व्यवहार आणि वर्तन तसेच कार्यपद्धती आपल्या कौटुंबीक मुल्ये आणि परंपरांनुसार नाहीये. म्हणून मी त्याला पक्ष आणि कुटुंबापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्याचा पार्टी आणि कुटुंब यामध्ये कोणतीही भूमिका नसणार आहे. मी त्याला पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करत आहे, असं लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं आहे.

त्याच्या आयुष्यातील चांगल्या वाईट गोष्टी आणि गुण -दोष पाहण्यासाठी तो सक्षम आहे. ज्या लोकांना त्याच्यासोबत संबंध कायम ठेवायचे आहेत, त्यांनी त्यांच्या स्वतःच्या विवेकबुद्धीने निर्णय घ्यावेत. मी नेहमीच सार्वजनिक जीवनात योग्य अचारण असलं पाहिजे, या भूमिकेचा समर्थक राहिलो आहे, असं लालू प्रसाद यादव यांनी म्हटलं आहे.

दरम्यान तेज प्रताप यादव यांनी त्यांच्या रिलेशनशिपबद्दल जाहीर कबुली दिली होती, त्यांनी अनुष्का यादव नावाच्या एका तरुणीसोबत आपला फोटो शेअर केला होता, मी अनुष्कासोबत गेल्या 12 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यानंतर लालू प्रसाद यादव यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

दरम्यान त्यानंतर आता तेज प्रताप यांचं देखील एक ट्विट समोर आलं आहे, त्यांनी आपलं अकाऊंट हॅक झाल्याचा दावा केला आहे. काही फोटो चुकीच्या पद्धतीने एडीट करून माझ्या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आले, मला आणि माझ्या कुटुंबाला बदनाम करण्याचा उद्देश यामागे आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

Follow Us
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?