
बिहार विधानसभा 2025 चा निकाल नुकताच लागला असून एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाले. बिहार निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. आरजेडी आणि कॉंग्रेसलचा धुव्वा उडाला. आरजेडीला अत्यंत मोठा पराभवाचा सामना करावा लागला. लालू प्रसाद यादव यांच्या राजकीय अस्तित्वावरच प्रश्न उपस्थित होतोय. त्यामध्ये आता लालूंच्या कुटुंबातील कलह पुढे आलाय. लालू प्रसाद यादवच्या लेकीने अत्यंत धक्कादायक असा निर्णय घेतला. लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी राजकारण सोडत असल्याची मोठी घोषणा करत कुटुंबापासूनही दूर जात असल्याचा खळबळजनक निर्णय घेतला. रोहिणी यांनी थेट सोशल मीडियावर याबद्दलची पोस्ट शेअर केली. इंस्टाग्रामवर याबाबतची पोस्ट रोहिणी यांनी सोशल मीडियावर शेअर केली.
लालू प्रसाद यादव यांची पार्टी आरजेडी संकटात असतानाच आता कुटुंबातही मोठी फुट पडल्याचे स्पष्ट होतंय. रोहिणी यांनी दावा केला की, त्यांनी संजय यादव आणि रमीझ यांच्या दबावाखाली हे पाऊल उचलले. त्यांच्या विधानामुळे आरजेडी गटात खळबळ उडाली आहे. निवडणुकीतील पराभवादरम्यान समोर आलेला कौटुंबिक कलह पक्षाच्या समस्या आणखी गुंतागुंतीच्या करू शकतो.
राष्ट्रीय जनता दलाने (RJD) देखील निवेदन जारी केले आहे. ज्यामध्ये म्हटले आहे की ही एक अंतर्गत कुटुंबाची बाब आहे. भाजप नेते प्रदीप भंडारी यांनीही यावर प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कुटुंब विरुद्ध कुटुंब असे भाकित हे खरे होताना दिसत आहे. मुळात म्हणजे लालूंच्या कुटुंबात मागील काही दिवसांपासून वाद उफाळताना दिसतोय. त्यामध्येच आता त्यांच्या लेकीने कुटुंबापासून आणि राजकारणापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला.
As PM @narendramodi predicted-
“PARIVAR VS PARIVAR” POST BIHAR ELECTION RESULTS. https://t.co/DBNrxt91KA
— Pradeep Bhandari(प्रदीप भंडारी)🇮🇳 (@pradip103) November 15, 2025
रोहिणी या आपल्या वडिलांच्या पार्टीमध्ये सक्रिय होत्या. मात्र, कालच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर आरजेडीला मोठा धक्का बसला. तो पराभव होऊन अवघे काही तास होत नाहीत, तोवरच रोहिणी यांनी फक्त राजकारणच नाही तर थेट कुटुंबापासूनही दूर जाण्याचा निर्णय घेतला. आरजेडीने स्पष्ट केले की, ही आमची काैटुंबिक बाब आहे. मात्र, आता ती काैटुंबिक बाब राहिली नसून देशभरात जोरदार चर्चा होताना दिसतंय.