AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India New CDS Appointed : देशाचे नवीन चीफ ऑफ डिफेंस स्टाफ, नौदल प्रमुख यांच्या नावाची सरकारकडून घोषणा

India New CDS Appointed : केंद्र सरकारकडून आज देशाचे नवीन चीफ ऑफ डिफेंस स्टाफ आणि नौदल प्रमुख यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. विद्यमान सीडीएस जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे 2026 रोजी समाप्त होणार आहे.

India New CDS Appointed : देशाचे नवीन चीफ ऑफ डिफेंस स्टाफ, नौदल प्रमुख यांच्या नावाची सरकारकडून घोषणा
New CDS N S Raja Subramani
| Updated on: May 09, 2026 | 7:55 AM
Share

केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी (सेवानिवृत्त) यांना देशाचं पुढचं चीफ ऑफ डिफेंस स्टाफ (CDS) म्हणून नियुक्त केलं आहे.वर्तमान सीडीएस जनरल अनिल चौहान यांची जागा ते घेतील. 30 मे 2026 रोजी अनिल चौहान यांचा कार्यकाळ समाप्त होणार आहे. पदभार स्वीकारल्यानंतर लेफ्टनंट जनरल सुब्रमणी सैन्य विषयक विभाग सचिव म्हणून काम करतील. लेफ्टनंट जनरल सुब्रमणी यांची सैन्यातील कारकिर्द शानदार आहे. सध्या ते राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात सैन्य सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. याआधी ते सैन्य उपप्रमुख आणि मध्य कमान जीओसी इन सी सारख्या महत्वपूर्ण पदांवर काम केलं आहे. थिएटर कमांड आणि सशस्त्र सैन्य दल यांचं एकत्रीकरण करण्याची प्रक्रिया पुढे नेण्यात त्यांची भूमिका महत्वाची असेल.

लेफ्टनंट जनरल सुब्रमणी नॅशनल डिफेन्स अकादमी, जॉइंट सर्विसेज कमांड एंड स्टाफ कॉलेज (यूके) आणि नॅशनल डिफेन्स कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी किंग्स कॉलेज लंडनमधून मास्टरची डिग्री मिळवली आहे. लेफ्टनंट जनरल सुब्रमणी यांना 1985 साली गढवाल रायफल्समध्ये कमिशन मिळालं. या दरम्यान वाइस एडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांची भारतीय नौदलाचे पुढचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते 31 मे रोजी पदभार स्वीकारतील. त्यांचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2028 पर्यंत असेल.

सीडीएसची जबाबदारी काय असते?

मावळते सीडीएस जनरल अनिल चौहान यांची पाकिस्तान विरुद्ध ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्वाची भूमिका होती. रणनितीक निर्णय, शस्त्रास्त्र खरेदी, तिन्ही सैन्य दलांच्या गरजा यात सीडीएसचा रोल महत्वाचा असतो. नौदल, एअरफोर्स आणि लष्कर या तिन्ही सैन्य दलांमध्ये उत्तम समन्वय रहावा यासाठी केंद्र सरकारने सीडीएस या पदाची निर्मिती केली आहे. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी तिन्ही सैन्य दलांमध्ये सीडीएसमुळे उत्तम समन्वय राखता आला. थिएटर कमांडवर तिन्ही सैन्य दलात एकमत घडवणं हे नव्या सीडीएससमोरील मुख्य लक्ष्य असेल. याआधी जनरल बीपिन रावत देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ होते. पदावर असताना हेलिकॉप्टर अपघातात त्यांचं निधन झालं होतं.

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत