नामांकित विद्यापीठात शिक्षण, पैशाच्या अमिषापाई तरुण वाम मार्गाला, दिवसाला 9 लाखांची कमाई, अखेर अटक

कमी वयात जास्त पैसे कमवण्याच्या नादात बरेच तरुण चुकीच्या मार्गाला लागतात (Liquor trafficking from educated youth in Bihar)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:14 PM, 17 Jan 2021
नामांकित विद्यापीठात शिक्षण, पैशाच्या अमिषापाई तरुण वाम मार्गाला, दिवसाला 9 लाखांची कमाई, अखेर अटक

मुंबई : कमी वयात जास्त पैसे कमवण्याच्या नादात बरेच तरुण चुकीच्या मार्गाला लागतात. जास्त पैसे मिळतात म्हणून अनेक तरुण वाईट मार्गाला भरकटत जातात. मात्र त्याचा शेवट नेहमी वाईटच होतो. अशीच काहीसी घटना बिहारमध्ये घडली आहे. बिहारमधील एक 28 वर्षीय तरुण जास्त पैसे कमवण्याच्या नादात वाईट मार्गाला लागला. त्याने दारुची तस्करी सुरु केली. विशेष म्हणजे या मुलाने नोए़डा येथील एका नामांकित विद्यापीठात शिक्षण घेतलं आहे (Liquor trafficking from educated youth in Bihar).

संबंधित तरुणाचं नाव अतुल सिंह असं आहे. त्याने बिहारमध्ये दारुची तस्करी सुरु केली. दिवसाला तो तब्बल 9 लाखांची दारु विकायचा. अखेर पोलिसांनी त्याला अटक केली. मात्र, पोलिसांनी अटक करण्याआधी तो लक्झरी लाईफ जगत होता. त्याच्याजवळ 8 लाखाची स्पोर्ट्स बाईक, लक्झरी कार आणि महागडा मोबाईल होता. पोलिसांना त्याच्या घरी 21 लाख रुपये किंमतीची 1110 लीटर दारु मिळाली आहे (Liquor trafficking from educated youth in Bihar).

पोलिसांना अतुल जवळ एक डायरी मिळाली आहे. या डायरीत त्याने त्याच्या व्यवसायाविषयी माहिती नोंद केली आहे. पोलिसांनी अतुल जवळ मिळालेले सर्व कागदपत्रे जप्त केले आहेत. अतुलने पोलिसांना सांगितलं की, त्याने बेरोजगार तरुणांना कामावर ठेवलं आहे. हे तरुण दारुची डिलिव्हरी करतात. प्रत्येक डिलिव्हरीला त्या तरुणाला 500 रुपये दिले जातात. त्याने या कामासाठी 30 ते 40 मुलं ठेवले आहेत.

पाहा आखाडा, दररोज दु. 4 वा टीव्ही 9 मराठीवर

अतुलच्या दोन सहकाऱ्यांना पकडल्यानंतर पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचले. सुरुवातीला अतुलने पोलिसांना विद्यापीठाचं कार्ड दाखवत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिसांना अतुलकडून मिळालेली 1.75 लाखाची रोक रक्कम जप्त केली. अतुलचा सुरुवातीला कुक्कुटपालनाचा व्यवसाय होता. मात्र, त्या व्यवसायात नुकसान झाल्यानंतर त्याने अवैध दारु तस्करीला सुरुवात केली.

हेही वाचा : अभिनेते महेश मांजरेकर यांच्यावर मारहाणीचा आरोप, अदखलपात्र गुन्हा दाखल