AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LoC वर घुसखोरीचा प्रयत्न, दोन्ही बाजूंनी ताबडतोब गोळीबार, अखेर… लष्कराला मोठं यश

Jammu Kashmir Infiltration : राजौरी येथे लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. नियंत्रण रेषेजवळ (LoC) घुसखोरीचा हा प्रयत्न करण्यात आला होता, यावेळी दोन्ही बाजूंनी गोळीबार करण्यात आला.

LoC वर घुसखोरीचा प्रयत्न, दोन्ही बाजूंनी ताबडतोब गोळीबार, अखेर... लष्कराला मोठं यश
loc infiltration attempt rajouriImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Aug 28, 2026 | 11:33 PM
Share

जम्मू-काश्मीरमधून मोठी बातमी समोर आली आली आहे. राजौरी येथे लष्कराने घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. नियंत्रण रेषेजवळ (LoC) घुसखोरीचा हा प्रयत्न करण्यात आला. लष्कराच्या जवानांना रुमलीधारा परिसरात काही संशयास्पद हालचाली आढळून आल्या होत्या. त्यानंतर जवानांनी घुसखोरांना आव्हान दिले. यावेळी घुसखोरांनी लष्कराच्या जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. जवानांनीही तत्काळ प्रत्युत्तर देत गोळीबार केला. लष्कराच्या कारवाईनंतर घुसखोरांना तेथून माघार घेण्यास भाग पाडले.

परिसरातील सुरक्षा वाढवली

घुसखोरांनी माघार घेतल्यानंतर लष्कराने संपूर्ण परिसराला वेढा घातला. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम सुरू करण्यात आली. जवानांकडून जंगल आणि आजूबाजूच्या परिसरात झडती घेतली जात आहे. घुसखोर लपून बसले असण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रत्येक संभाव्य ठिकाणाची तपासणी केली जात आहे. लष्कराने परिसरात अतिरिक्त जवानांचीही तैनाती केली आहे.

सुरक्षादलांच्या विविध पथकांकडून वेगवेगळ्या ठिकाणी शोधमोहीम राबवली जात आहे. घुसखोरांनी माघार घेतलेल्या मार्गांवरही विशेष नजर ठेवण्यात आली आहे. लष्कराने परिसरातील देखरेख आणखी वाढवली आहे. कोणत्याही संशयास्पद हालचालीवर जवानांचे बारकाईने लक्ष आहे. सध्या संपूर्ण परिसरात शोधमोहीम सुरू आहे.

अतिरिक्त जवानांची तैनाती

लष्कराने घुसखोरीच्या या प्रयत्नाला गांभीर्याने घेतले असून, ऑपरेशनमध्ये आणखी जवानांचा समावेश करण्यात आला आहे. संवेदनशील भागांमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. लष्कराची पथके सातत्याने परिसरात तैनात आहेत आणि घुसखोरांचा शोध घेत आहेत. अद्याप कोणत्याही घुसखोराला पकडल्याची माहिती समोर आलेली नाही. घुसखोरीच्या प्रयत्नात नेमके किती जण सहभागी होते, याचा लष्कराकडून तपास केला जात आहे. त्यांच्या जवळ शस्त्रे होती का, याचीही चौकशी सुरू आहे. शोधमोहीमेदरम्यान सुरक्षादलांकडून आजूबाजूच्या परिसराचीही तपासणी केली जात आहे.

राजौरीमध्ये आधीही घुसखोरीचे प्रयत्न

राजौरीचा परिसर LoCच्या जवळ असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानला जातो. या भागात यापूर्वीही घुसखोरीचे प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लष्कर आणि सुरक्षादले येथे सातत्याने सतर्क असतात. जवानांच्या सतर्कतेमुळे यावेळीही घुसखोरीचा प्रयत्न वेळीच हाणून पाडण्यात आला. लष्कराच्या प्रत्युत्तरानंतर घुसखोरांनी माघार घेतली. त्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली. कोणताही घुसखोर परिसरात लपून बसलेला नाही, याची खात्री करण्यासाठी लष्कराकडून तपासणी केली जात आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ