1 – 2 नाही इतक्या तरुणींना फसवलं, यूनिव्हर्सिटीचा जिहादी डॉक्टर, बळजबरीने धर्मांतर अन् बलात्कार; धक्कादायक खुलासा
KGMU Love Jihad Case: केजीएमयूने जबरदस्तीने धर्मांतर आणि बलात्काराच्या प्रकरणात स्थापन केलेल्या तथ्य शोध समितीच्या बैठकीत हे स्पष्ट झाले आहे की डॉ. रमीझ अनेक मुलींच्या संपर्कात होता आणि त्याने भावनिकदृष्ट्या मुलींना ब्लॅकमेल करायचा.

तुरुंगात कैद असलेला आरोपी रमीज याच्या अडचणीत सगल वाढ होत आहे. कारण किंग जॉर्ज मेडिकल यूनिव्हर्सिटीच्या (KGMU) तथ्य शोध समितीच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आली आहेत. KGMU तथ्य शोध समितीचे सर्व अधिकाऱ्यांनी मान्य केलं आहे की, डॉक्टर रमीझ हा वाईट होती. रमीज अनेक मुलींच्या संपर्कात होता आणि मुलींना इमोशनल ब्लॅकमेल करायचा… एवढंच नाही तर, धर्मांतरासाठी देखील मुलींना स्वतःच्या जाळ्यात अडकवलं होतं… जवळपास 15 मुलींच्या रमीझ संपर्कात होता आणि कॉलेजच्या आवारात तो अनेक संशयास्पद व्यक्तींना भेटत असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
आरोपी डॉक्टर मुलींना करायचा भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल
मिळालेल्या माहितीनुसार, केजीएमयूने जबरदस्तीने धर्मांतर आणि बलात्काराच्या प्रकरणात स्थापन केलेल्या तथ्य शोध समितीच्या बैठकीत हे स्पष्ट झालं आहे की, डॉ. रमीझ अनेक मुलींच्या संपर्कात होता आणि त्यांना भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल करत होता. केजीएमयूमध्ये रमीझ याला 20 महिने झाले होते… 12 महिन्यांच्या आत त्याने एका हिंदू मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं आणि लग्न केलं. ते सुद्ध केजीएमयूच्या आवारात.
रमीझ याने लग्नात कोणत्या फॅकल्टी किंवा कोणत्या डॉक्टरांना लग्नासाठी बोलावंल नाही… उलट त्याने एक मोठं सत्य सर्वांपासून लपवल… विवाहित असल्याचं सत्य त्याने लपवलं होतं. आरोपी डॉ. रमीझ हा आग्रा, अलीगढ आणि इतर जिल्ह्यांतील मुलींशी सतत संपर्कात होता. सूत्रांनी असंही सांगितले आहे की, केजीएमयूच्या सिनियर्सना समजलं आहे की त्यांनी डॉ. रमीझवर आधीच कारवाई करायला हवी होती.
रमीज दहशतवादी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात होता
आता केजीएमयूचे अन्य रेसिडेंट डॉक्टर चौकशीच्या पेचात अडकले आहे. जे डॉक्टर आरोपीच्या फ्रेंड लिस्टमध्ये होते, त्यांची देखील चौकशी सुरु आहे. कारण जो व्यक्ती इतक्या निष्पापपणे मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवत होता, तो इतर डॉक्टरांना याबद्दल सांगितलंच असेल. याच कारणामुळे आता केजीएमयूचे अन्य रेसिडेंट डॉक्टरांमध्ये देखील भीतीचं वातावरण आहे. सूत्रांनी असं देखील सांगितलं आहे की, रमीझ हा दहशतवादी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात होता.
केजीएमयूमध्ये जिहाद…
केजीएमयूमध्ये जिहाद प्रकरण देखील समोर आलं आहे. यामध्ये अद्याप फक्त एकाला अटक करण्यात आली आहे. येणाऱ्या दिवसांत अन्य लोकांना देखील अटक होईल असं सांगण्यात येत आहे. कारण आतापर्यंत झालेल्या तपास एवढंच समोर आलं आहे की, रझीम हा फक्त एक पर्यात आहे. प्रत्यक्षात, धर्मांतर टोळीचा मुख्य दुसराच कोणीतरी आहे.
