अजून मोठे संकट? LPG तुटवड्यामुळे मोबाईलचे नेटवर्क गायब? कॉलिंग आणि डेटाही नाही वापरता येणार, मोठी अपडेट काय?

LPG Shortage Mobile Network: दूरसंचार टॉवरचे व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांनी मोठा इशारा दिला आहे. आता अजून एक मोठे संकट नागरिकांवर येणार आहे. LPG तुटवड्याचा फटका आता मोबाईलधारकांना बसण्याची शक्यता आहे. त्यांचे कॉलिंग आणि डेटाही बंद होण्याची शक्यता आहे, काय आहे ती मोठी अपडेट?

अजून मोठे संकट? LPG तुटवड्यामुळे मोबाईलचे नेटवर्क गायब? कॉलिंग आणि डेटाही नाही वापरता येणार, मोठी अपडेट काय?
एलपीजी सिलेंडर, मोबाईल नेटवर्क
Image Credit source: गुगल
| Updated on: Mar 13, 2026 | 11:33 AM

LPG Shortage Mobile Network: देशभरात गॅस तुटवडा आणि एलपीजी सिलेंडर टंचाई आहे. जनता पुन्हा एकदा रांगेत उभी राहिली आहे. नोटबंदीसारखाच अनुभव जनतेला येत आहे. कडक उन्हात, तहानभूक विसरून एका सिलेंडरसाठी अबालवृद्ध आणि महिला रांगेत उभ्या आहेत. पण स्वयंपाकापुरताचा हा मुद्दा मर्यादित नाही. तर एलपीजी (LPG) पुरवठा बंद झाल्याने एक मोठे संकट उभे ठाकले आहे. तुमच्या खिशातील मोबाईलचे नेटवर्क गायब होण्याची भीती व्यक्त होत आहे. डेटा आणि कॉलिंग बंद होण्याची शक्यता आहे. फोनमधील सिग्नल गायब होण्याची शक्यता आहे. काय आहे ती मोठी अपडेट?

मोबाईल टॉवर बंद होणार?

तुम्हाला वाटत असेल की मोबाईल टॉवरचा LPG शी काय संबंध? टॉवर तयार करणारी कंपनी गॅल्वेनायजेशन (Galvanization) हिला ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात LPG वा LNG चा वापर करावा लागतो. ही प्रक्रिया टॉवरला गंजमुक्त ठेवण्यासाठी उपयोगी पडते. तसेच टॉवरचे आयुष्य वाढवते. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने आदेश दिला आहे. त्यानुसार सध्या सरकारी कंपन्या केवळ घरगुती ग्राहकांना एलपीजी पुरवठा प्राधान्याने करत आहेत. त्यामुळे 5 मार्च 2026 पासून टॉवर तयार करणाऱ्या कंपन्यांनी गॅस पुरवठा खंडीत केला आहे.

मोबाईल आणि इंटरनेट बंद होणार?

डिजिटल इंफ्रास्ट्रक्चर प्रोव्हायडर्स असोसिएशन (DIPA),यामध्ये इंडस टॉवर्स आणि व्होडाफोन-आयडिया यासारख्या बड्या कंपन्या सहभागी आहेत. त्यांनी सरकारला इशारा दिला आहे की, गॅस न मिळाल्यास टॉवर तयार करण्याचे प्रकल्प बंद करावे लागू शकतात. जर हे प्रकल्प बंद झाले तर त्यांना पुन्हा सुरू करणे अवघड होईल आणि सध्याच्या मोबाईल टॉवरवर लोड वाढेल आणि सेवा सुव्यवस्थित न ठेवल्याने, मेंटनन्स होणार नाही. नेटवर्क जाम होण्याचे प्रमाण वाढले. कॉल ड्रॉप होतील आणि इंटरनेटचा वेग कमी होईल

केवळ कॉलिंगच नाही तर 5G सेवा प्राभवित होईल. बँकिंग सेवा, बँकिंग व्यवहार, ऑनलाईन शिकवणी, ऑनलाईन पेमेंट आणि सुरक्षेशीसंबंधित सर्व प्रणाली या नवीन संकटामुळे प्रभावित होतील. विद्युत पुरवठा खंडित झाल्यावर टॉवर चालवण्यासाठी त्यांना डिझेल जनरेटरचा वापर करावा लागतो. आता टॉवरचे उत्पादन आणि मेन्टनन्ससाठी सुद्धा गॅस मिळत नसल्याने कंपन्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे.

Follow Us