AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भेसळयुक्त दूध पिल्याने तब्बल 16 जणांचा तडफडून मृत्यू, डेअरी मालकाने…सत्य समोर येताच खळबळ!

भेसळयुक्त दूध पिल्यामुळे त्यांना मळमळ, उलटी, पोटदुखी, लघवी बंद होणे, मूत्रपिंड निकामी होणे अशा प्रकारचा त्रास जाणवत होता. सुरुवातीला 22 फेब्रुवारी रोजी अशा काही तक्रारी समोर आल्या.

भेसळयुक्त दूध पिल्याने तब्बल 16 जणांचा तडफडून मृत्यू, डेअरी मालकाने...सत्य समोर येताच खळबळ!
adulterated milkImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 22, 2026 | 3:13 PM
Share

अनेकांना दूध प्यायला आवडतं. दुधापासून वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. हे पदार्थही अनेकजण चवीने खातात. दुसरीकडे चहामध्येही लाखो लोक दूध टाकतात. परंतु काही ठिकाणी भेसळयुक्त दूध विकले जाते. थोड्याशा नफ्यापाई केलेल्या या कांडामुळे अनेकदा लोकांचा जीव जातो. अशीच एक धक्कादायक घटना आता घडली आहे. भेसळयुक्त दूध प्यायलाने तब्बल 16 लोकांचा मृत्यू झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे आणखी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

लोकांना व्हायला लागला वेगवेगळा त्रास

मिळालेल्या माहितीनुसार ही घटना आंध्रप्रदेशातील गोदावरी जिल्ह्यात घडली आहे. या जिल्ह्यातील लालाचेरुवु, चौदेस्वरनगर आणि स्वरूपनगर या भागात फेब्रुवारी महिन्यापासून भेसळयुक्त दूध विकले जात होते. त्या भागात फेब्रुवारीपासूनच लोक आजारी पडत होते. भेसळयुक्त दूध पिल्यामुळे त्यांना मळमळ, उलटी, पोटदुखी, लघवी बंद होणे, मूत्रपिंड निकामी होणे अशा प्रकारचा त्रास जाणवत होता. सुरुवातीला 22 फेब्रुवारी रोजी अशा काही तक्रारी समोर आल्या. नंतर या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर त्याच भागात असलेल्या एका डेअरीमधून भेसळयुक्त दूध विकले जात असल्याचे समोर आले. या भेसळयुक्त दूधात एथिलीन गायकॉल नावाचा विषारी पदार्थ मिसळला जात होता. याच भेसळीमुळे 20 पेक्षा जास्त लोक रुग्णालयात दाखल झाले होते. यात लहान मुलं, वृद्ध यांचाही समावेश होता. यातील 16 जणांचा मृत्यू जाला आहे. तर तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

रुग्णांना डायलॅसिस, व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले

मिळालेल्या माहितीनुसार गोदावरी जिल्ह्यातील नरसापूरम गावाताली डेअरीमधून हे दूध विकले जात होते. 100 पेक्षा जास्त कुटुंबांना या डेअरीमधून दूध देण्यात आले होते. दूध पिल्यानंतर काही तासांनीच लोकांची प्रकृती बिघडू लागली. त्यानंतर रुग्णांना डायलॅसिस, व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. दरम्यान आयसीयूत असलेल्या रुग्णांवर उपचार केला जात आहे. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. आरोपींना लवकरत लवकर कठोर शिक्षा दिली जावी, अशी मागणी केली जात आहे.

Follow Us
राज ठाकरे अचानक फडणवीसांच्या भेटीला! भेटीचं नेमकं कारण काय?
मोठी बातमी! भाजपवर टीका अन् अचानक मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला! राज ठाकरेंच्या भेटीचं नेमकं कारण काय?
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप,
भगवा टिळा अन् धीरज परदेशी प्रकरण; आमदाराच्या खळबळजनक आरोपानंतर संताप, अखेर मुख्यमंत्र्यांनी...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण...
भारत-चीन सीमावाद पुन्हा चर्चेत, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाण... अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनचे टोचले कान, काय घडलं?
पंतप्रधानांच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ!
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या व्हिडीओचा सोशल मीडियावर धुमाकूळ; नेमकं काय म्हणाले?
सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; काय घडलं?
ShivSena | सुनावणी संपताच ठाकरेंच्या वकिलांची कोर्टाकडे मोठी मागणी; नेमकं काय घडलं?
शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
Sanjay Raut | शिवसेना पक्ष-चिन्हाचा फैसला जवळ? कपिल सिब्बलांच्या युक्तिवादानंतर संजय राऊत म्हणाले, आशेचा किरण...
विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!
Shivsena Case Hearing | विधिमंडळ पक्षात फूट म्हणजे राजकीय पक्षात फूट नाही!; कपिल सिब्बलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे
आमचा युक्तीवाद सुरु होईल तेव्हा... कपिल सिब्बल यांच्या दाव्यांवर शिंदे गटाकडून सर्वात मोठी प्रतिक्रिया
2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी?
मोठी बातमी! 2018ची घटना असंवैधानिक तर शिंदेंची निवड संवैधानिक कशी? कपिल सिब्बलांचा कोर्टात मोठा युक्तिवाद
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर
अखेर मुळ शिवसेना कुणाची? सिब्बलांकडून थेट लेखी निवेदनाची प्रत सादर, चार मुद्यामध्येच... कोर्टात नेमकं काय घडलं?