Maharashtra News LIVE : कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना मध्यरात्री अटक
Maharashtra News LIVE : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टी पुन्हा रस्त्यावर उतरली आहे. CJPचे संस्थापक अभिजीत दिपके यांना काल मध्यरात्री अटक करण्यात आली आहे.

LIVE NEWS & UPDATES
-
लातूर जिल्हा बँक निवडणूक, सहकार मंत्र्यांचा ऐनवेळी सावध पवित्रा
लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुती एकसंघ आहे असे सांगण्यात येत असतानाच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी काँग्रेसच्या धीरज देशमुख यांना सोबत घेऊन सहकाऱ्यांचे नामनिर्देशन पत्र दाखल केले आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेत महायुती राहिली नसून भाजपाचे तिन्ही आमदार ही निवडणूक एक पॅनल तयार करून लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर, आमदार अभिमन्यू पवार आणि आमदार रमेश कराड हे एकत्रित आता सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आणि काँग्रेसचे नेते धीरज देशमुख यांचा या निवडणुकीत सामना करणार आहेत.
-
तुळजाभवानी गाभाऱ्यातील दर्शन प्रकरणी कारवाई
तुळजाभवानी देवीच्या गाभारा दर्शन प्रकरणावरून तुळजापूरचे नगराध्यक्ष विनोद गंगणे यांना नोटीस देण्यात आली आहे. सोलापूरचा मटका व्यावसायिक अरुण रोडगे याला तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यातून दर्शन दिल्याच्या प्रकरणात आता मंदिर संस्थानकडून आता कारवाया सुरू करण्यात आले आहेत या प्रकरणी सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक अमोल भोसले यांना निलंबित केल्यानंतर तुळजापूरचे नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनाही जिल्हाधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. येत्या 48 तासांत खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.दरम्यान, नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी मात्र आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. आपण कोणालाही मंदिराच्या गाभाऱ्यात सोडलं नाही, तसंच मंदिरातील कोणत्याही कर्मचाऱ्याला दमदाटी केली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. याशिवाय, यापूर्वी इतर कोणते विश्वस्त सदस्य कोणाला गाभाऱ्यात घेऊन गेले होते, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी नगराध्यक्ष गंगणे यांनी केली आहे.
-
-
गणेशोत्सवात दागिने चोरणारी उत्तर प्रदेशातील आंतरराज्यीय टोळी जेरबंद
गणेशोत्सवाच्या गर्दीचा फायदा घेत भाविकांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणाऱ्या उत्तर प्रदेशातील आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात पुणे पोलिसांना यश आलंय. फरासखाना पोलिसांनी आरोपीला अटक करून १३९.७२० ग्रॅम सोन्याचे दागिने, मोबाईल फोन आणि चाकूसह लोखंडी कटर असा सुमारे २१ लाख २१ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
-
शहरात १० टक्के पाणीकपात आणि दुसरीकडे महापालिकेकडून पाण्याची नासाडी
पिंपरी चिंचवडमधील काळेवाडी परिसरात पाण्याचे टँकर आणून बीआरटी मार्गाचे डिव्हायडर धुतले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. एकीकडे नागरिक पाण्यासाठी तक्रारी करत असताना दुसरीकडे पाण्याचा असा वापर होत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
-
लग्नाचे आमिष दाखवून शेतमजूर कुटुंबाची फसवणूक
लग्न लावून देण्याचे आमिष दाखवून पैसे उकळल्याचा प्रकार आंबेगाव तालुक्यात समोर आला आहे. याप्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
-
-
दसरा मेळाव्यासाठी ठाकरेंना महापालिकेने घातल्या 24 अटी
सालाबादाप्रमाणे यंदाही दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे ठाकरेंचा शिवसेना दसरा मेळावा होणार आहे. पण त्यासाठी महापालिकेने थोड्या थोडक्या नाहीत तर 24 अटी घातल्या आहेत. त्यावरून वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
-
जामिनाच्या वेळी घातलेल्या अटींचे उल्लंघन केल्यामुळे दिपकेंना अटक
सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी दिल्लीमध्ये आंदोलन पुकारले होते. मात्र, त्यापूर्वीच त्यांना अटक करण्यात आली. जामिनाच्या वेळी घातलेल्या अटींचे उल्लंघन केल्यामुळे काल पुन्हा दिपकेंना अटक करण्यात आली.
-
-
मध्यरात्री CJPचे संस्थापक अभिजीत दीपके यांना पुन्हा अटक
अभिजीत दिपके यांनी ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन पुकारले आहे. मात्र, दिल्ली पोलिसांनी विमानतळाहून ताब्यात घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा अभिजीत दिपके यांना दिल्ली पोलिसांकडून अटक करण्यात आले.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी कॉकरोच जनता पार्टीने 16 ऑक्टोबर 2026 रोजी तिरंगा मार्चचे आयोजन केले. यादरम्यान दिल्ली पोलिसांनी अगोदर अभिजीत दिपके यांना नोटीस दिली होती. त्यापूर्वी दिल्लीत दाखल होताच पोलिसांनी अभिजीत दिपके आणि त्यांच्या पक्षाच्या महत्वाच्या नेत्यांना अटक केली. जामीन देताना काही अटी मान्य करण्यात आल्या होत्या. मात्र, पुन्हा अभिजीत दिपके मोर्चात सहभागी झाले. त्यामुळे काल मध्यरात्री अभिजीत दिपके यांना अटक करण्यात आली. तसेच ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA) च्या राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा यांना मंडी हाऊसजवळ पोलिसांनी ताब्यात घेतले होते. नेहा बोरा यांची सुटका करण्यात आली आहे. मात्र, अभिजीत दिपके अद्याप अटकेत आहेत.
ब्लूमबर्गच्या एका अहवालात ऑक्सफोर्ड इकॉनॉमिक्सच्या प्रमुख अर्थतज्ज्ञ अॅलेक्झांड्रा हरमन प्रसाद यांनी सांगितले की, पेट्रोलच्या किमतीत नोव्हेंबरमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ तेव्हा होण्याची शक्यता आहे, जेव्हा पुढच्या वर्षी ७ राज्यांत निवडणुका आहेत. त्यापैकी पाच राज्यांत, ज्यात उत्तर प्रदेश आणि पंजाब यांचा समावेश आहे, मार्च ते मे दरम्यान मतदान होणार आहे. अशा परिस्थितीत इंधनाच्या किमतीतील वाढ राजकीय वळण घेऊ शकते.
सालाबादाप्रमाणे यंदाही दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कात ठाकरेंचा शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. पण त्यासाठी महापालिकेने थोड्या थोडक्या नाहीत तर 24 अटी घातल्या आहेत. त्यावरून वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
Published On - Oct 17,2026 8:28 AM
