खरा शत्रू तर…, भारत-पाकिस्तानवर मलाला युसुफझाईची प्रतिक्रिया, वक्तव्य चर्चेत
पाकिस्तान आणि भारत हे एकमेकांचे शत्रू नाहीत, खरा शत्रू तर हा दहशतवाद आहे. मी दहशतवादाचा निषेध करते, भारत आणि पाकिस्तानने मिळून दहशतवादाचा सामना करायला पाहिजे, असं मलालाने म्हटलं आहे.

जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जगभरातून निषेध केला जात आहे, मंगळवारी मध्यरात्री भारतानं पाकिस्तानवर सर्जिक स्ट्राईक करून या हल्ल्याचा बदला घेतला आहे, पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील 9 दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. त्यामुळे भारत आणि पाकिस्तानमधील तणाव आता आणखी वाढला आहे. भारताला युरोपीयन राष्ट्रं आणि अमेरिकेकडून समर्थ मिळत असल्याचं दिसून येत आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर आता शांतीचा नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसुफझाईने प्रतिक्रिया दिली आहे. भारत आणि पाकिस्तान एकमेकांचे शत्रू नसल्याचं तिने म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाली मलाला
पाकिस्तान आणि भारत हे एकमेकांचे शत्रू नाहीत, खरा शत्रू तर हा दहशतवाद आहे. मी दहशतवादाचा निषेध करते, भारत आणि पाकिस्तानने मिळून दहशतवादाचा सामना करायला पाहिजे, आंतरराष्ट्रीय स्थरावर देखील या प्रश्नावर चर्चा होणं गरजेचं आहे, इतर देशांनी देखील या प्रकरणात लक्ष घालावं, सर्वांनी एकत्र येऊन दहशतवादाविरोधात लढा द्यायचा हवा, मला सुद्धा कधीकाळी याच दहशतवादाचा सामना कारवा लागला होता असं मलालाने म्हटलं आहे.
दरम्यान भारतानं आज सकाळीच पाकिस्तानच्या बारा शहरांवर पन्नास ड्रोन हल्ले केले होते, मात्र तरी देखील पाकिस्तानच्या कुरापती थांबण्याचं नाव घेत नाहीयेत, आता पुन्हा एकदा भारताच्या तीन राज्यांमध्ये पाकिस्ताननं हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे, जम्मू काश्मीर, पंजाब आणि राजस्थानमध्ये पाकिस्तानने हल्ल्याचा प्रयत्न केला मात्र हा हल्ल्याचा प्रयत्न फसला आहे. भारतानं पाकिस्तानचे सर्व मिसाईल पाडले आहेत. पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर आपटलं आहे.
भारताचा ड्रोन हल्ला
दरम्यान त्यापूर्वी आज सकाळी भारतानं पाकिस्तानवर ड्रोन हल्ला केला होता, पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर हल्ल्याचा प्रयत्न केला, त्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी हा हल्ला करण्यात आला, भारतानं पाकिस्तानच्या बारा शहरांवर पन्नास ड्रोन हल्ले केले, भारतानं पाकिस्तानची रडार सिस्टिम पूर्णपणे उद्ध्वस्त केली आहे. त्यानंतर आता पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे.
