AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बंगालमध्ये टीएमसी, डावे आणि काँग्रेसची मॅच फिक्सिंग, मोदींच्या घणाघातानं दिदी घायाळ

स्वातंत्र्यपूर्व काळात पश्चिम बंगाल देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत आघाडीवर होता. त्याकाळी बंगालमध्ये उत्तम पायाभूत सुविधा होत्या. | PM Narendra Modi

बंगालमध्ये टीएमसी, डावे आणि काँग्रेसची मॅच फिक्सिंग, मोदींच्या घणाघातानं दिदी घायाळ
पश्चिम बंगालच्या सरकार नाईलाजाने पंतप्रधान किसान योजनेत सहभागी झाले. मात्र, राज्य सरकारकडून केंद्राला शेतकऱ्यांची यादीच देण्यात आलेली नाही. त्यामुळे बंगालमधील शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान किसान योजनेचे पैसे जमा करता आलेले नाहीत, असे नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.
| Updated on: Feb 07, 2021 | 7:41 PM
Share

कोलकाता: तुम्ही ममता बॅनर्जी (Mamta Banejree) यांना विकासाविषयी प्रश्न विचारले किंवा त्यांच्यासमोर जय श्रीराम म्हटलं की, त्यांना लगेच राग येतो. मात्र, भारताला बदनाम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कारस्थानाबद्दल त्या चकार शब्द काढत नाहीत, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. (PM Narendra Modi slams TMC while Addressing a rally in Haldia)

ते रविवारी पश्चिम बंगालच्या हल्दिया येथील प्रचारसभेत बोलत होते. यावेळी नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसवर बोचऱ्या शब्दांत टीका केली. ‘मा, माटी, मानुष’चा नारा देणाऱ्या पक्षामुळे शेतकरी दु:ख सोसत आहेत. पश्चिम बंगालच्या सरकार नाईलाजाने पंतप्रधान किसान योजनेत सहभागी झाले. मात्र, राज्य सरकारकडून केंद्राला शेतकऱ्यांची यादीच देण्यात आलेली नाही. त्यामुळे बंगालमधील शेतकऱ्यांच्या खात्यावर पंतप्रधान किसान योजनेचे पैसे जमा करता आलेले नाहीत, असे नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले.

तृणमूल काँग्रेसच्या छुप्या मित्रांपासून सावध राहा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी तृणमूल काँग्रेसच्या छुप्या मित्रांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला. आपली लढाई तृणमूल काँग्रेसशी असली तरी डावे आणि काँग्रेस यांच्यापासून सावध राहिले पाहिजे. या सगळ्यांनी पडद्यामागे हातमिळवणी केली आहे. दिल्लीत या सगळ्यांच्या भेटीगाठी आणि चर्चा होतात. यापूर्वी केरळात पाच वर्षे जनतेची लूट करण्यासाठी काँग्रेस आणि डाव्या पक्षांची हातमिळवणी झाली होती, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली.

विकासाच्या शर्यतीत पश्चिम बंगाल पिछाडीवर

स्वातंत्र्यपूर्व काळात पश्चिम बंगाल देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत आघाडीवर होता. त्याकाळी बंगालमध्ये उत्तम पायाभूत सुविधा होत्या. नोकरदरांना अनेक संधी उपलब्ध होत्या. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये बंगाल ही विकासाची गती कायम राखण्यात अपयशी ठरल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

बंगाल ‘टीएमसी’ला राम कार्ड दाखवणार: मोदी

पश्चिम बंगालमध्ये फुटबॉलचा खेळ विशेष लोकप्रिय आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तृणमूल काँग्रेसवर टीका करताना शाब्दिक कोटी केली. बंधू आणि भगिनींनो बंगाल फुटबॉलवर प्रेम करणारं राज्य आहे. त्यामुळेच मी फुटबॉलच्या भाषेत सांगू इच्छतो, तृणमूल काँग्रेसने एका पाठोपाठ एक असे कित्येक ‘फाउल’ केलेले आहेत. गैरप्रशासन, विरोधकांवर हल्ला व हिंसाचाराचा फाउल, बंगालच्या लोकांचा पैसा लुटण्याचा फाउल व श्रद्धेवर होत असलेल्या हल्ल्यांचा फाउल. बंगालची जनता सर्वकाही पाहत आहे. त्यामुळे आता लवकरच बंगाल तृणमूलला राम कार्ड दाखवणार असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

(PM Narendra Modi slams TMC while Addressing a rally in Haldia)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.