जेव्हा मोदी समक्ष ममता दीदीने ‘जय श्रीराम’चे नारे देणाऱ्यांना सुनावलं!

| Updated on: Jan 23, 2021 | 7:33 PM

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच 'जय श्रीराम'च्या घोषणा देणाऱ्यांना झापले. (Mamata Banerjee Refuses To Speak At Netaji Event)

जेव्हा मोदी समक्ष ममता दीदीने जय श्रीरामचे नारे देणाऱ्यांना सुनावलं!
cm Mamta Banarjee
Follow us on

कोलकाता: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणाऱ्यांना झापले. एखाद्याला कार्यक्रमाला बोलवायचं आणि त्याची बेईज्जती करायची हे तुम्हाला शोभत नाही, अशा शब्दांत ममता बॅनर्जी यांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना सुनावलं. ममता बॅनर्जी यांचा हा संतप्त अवतार पाहून सर्वचजण अवाक् झाले. (Mamata Banerjee Refuses To Speak At Netaji Event)

कोलकाता येथे व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. केंद्र सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने लोक आले होते. मात्र, कार्यक्रमात वारंवार ‘जय श्रीराम’ आणि ‘भारत माता की जय’चे नारे सुरू होते.

लक्षात ठेवा, हा शासकीय कार्यक्रम आहे

यावेळी ममता बॅनर्जी भाषणाला उभ्या राहताच ‘भारत माता की जय’ आणि ‘जय श्रीरामचे नारे’ सुरू झाले. त्यामुळे ममता बॅनर्जी या प्रचंड भडकल्या. भाषणापूर्वीच सुरू झालेल्या या घोषणेमुळे नाराज झालेल्या ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधानांसमोरच घोषणा देणाऱ्यांना सुनावलं. मला वाटतं हा शासकीय कार्यक्रमाची काही शिस्त पाळायला हवी. हा शासनाचा कार्यक्रम आहे. एखाद्या राजकीय पक्षाचा कार्यक्रम नाही. हा सर्व पक्षीय आणि पब्लिक प्रोग्राम आहे. कोलकात्यात हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मी पंतप्रधान आणि सांस्कृतिक मंत्रालायची आभारी आहे. एखाद्याला आमंत्रित करून त्याचा अपमान करणं तुम्हाला शोभत नाही. या घटनेचा निषेध म्हणून मी आता भाषणच करणार नाही. जय हिंद, जय बांगला, असं म्हणत ममता बॅनर्जी यांनी भाषण आटोपतं घेतलं. त्यामुळे उपस्थितांमध्ये एकच शांतता पसरली.

पहिल्यांदाच एका मंचावर

त्यानंतर ममता बॅनर्जी या तडक आपल्या आसनावर जाऊन बसल्या. या कार्यक्रमाला राज्यापाल जगदीप धनखडही उपस्थित होते. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच मोदी आणि ममता बॅनर्जी एकाच मंचावर आले होते. त्यामुळे मोदी आणि ममता बॅनर्जी काय बोलणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. (Mamata Banerjee Refuses To Speak At Netaji Event)

 

संबंधित बातम्या:

दिल्लीतच देशाची राजधानी का?, कोलकातासहीत देशातील चार ठिकाणी राजधानी बनवा: ममता बॅनर्जी

काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत नेत्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची; परस्परांवर पातळी सोडून टीका

Special Report : नंदिग्राम ममता बॅनर्जींसाठी गेमचेंजर ठरणार?

तृणमूलमधील बंडाळी सुरूच; बंडखोर आमदार वैशाली दालमियांची टीएमसीतून हकालपट्टी

(Mamata Banerjee Refuses To Speak At Netaji Event)