तृणमूलमधील बंडाळी सुरूच; बंडखोर आमदार वैशाली दालमियांची टीएमसीतून हकालपट्टी

तृणमूलमधील बंडाळी सुरूच; बंडखोर आमदार वैशाली दालमियांची टीएमसीतून हकालपट्टी

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमधील बंडाळी अजून थांबताना दिसत नाहीये. (Baishali Dalmiya Expelled From TMC For Anti-Party Activities)

भीमराव गवळी

|

Jan 22, 2021 | 7:31 PM

कोलकाता: मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमधील बंडाळी अजून थांबताना दिसत नाहीये. तृणमूलचे बंडखोर नेते राजीव बॅनर्जी यांनी वन मंत्रीपदाचा राजीनामा देऊन काही तास उलटत नाही तोच आमदार वैशाली दालमिया यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिस्तभंगाच्या नावाखाली वैशाली यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. वैशालि दालमिया या बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांच्या कन्या आहेत. (Baishali Dalmiya Expelled From TMC For Anti-Party Activities)

वैशाली दालमिया या बल्ली विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. त्यांनी गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या विरोधात उघड उघड भूमिका घेतली होती. भ्रष्टाचारामुळे पक्षाचं मोठं नुकसान होत आहे. आपल्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपण त्याविरोधात आवाज उठवत आहोत. तसेच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडेही याबाबत तक्रार केल्याचं वैशाली यांनी सांगितलं.

कमिशन राज

घर खरेदी असेल अथवा रस्ते बांधणी… प्रत्येकवेळी कमिशन दिल्याशिवाय काम होत नाही, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला. यावेळी त्यांनी प्रशांत किशोर यांच्या कार्यपद्धतीवरही आक्षेप घेतला. भ्रष्ट लोकांना पक्षात मोठ्या पदावर बसवले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला होता. त्यामुळे पक्षाने आज शिस्तपालन समितीची बैठक बोलावली होती. त्यात पक्षविरोधी कारवाया आणि शिस्तभंग केल्याप्रकरणी वैशाली यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. (Baishali Dalmiya Expelled From TMC For Anti-Party Activities)

चार मंत्र्याचा राजीनामा

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पक्षात नाराज असलेल्या राजीव बॅनर्जी यांनी वन मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे ममता बॅनर्जी यांना मोठा झटका मानला जात आहे. यापूर्वी सुवेंदू अधिकारी आणि क्रीडा राज्यमंत्री लक्षमी रतन शुक्ला यांनी ममता बॅनर्जी मंत्रिमंडळातून मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर आज राजीव यांनी राजीनामा दिला. सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांचे भाचे खासदार अभिषेक बॅनर्जींवर सातत्याने टीका केली आहे. तर, राजीनामा देऊन मंत्रिमंडळातून बाहेर पडलेल्या शुक्ला यांनी अद्याप त्यांचे पत्ते खोलले नाहीत. (Baishali Dalmiya Expelled From TMC For Anti-Party Activities)

संबंधित बातम्या:

ममता बॅनर्जी यांना आणखी एक झटका, वनमंत्र्यांचा राजीनामा; भाजपमध्ये जाणार?

भाजपकडून TMC ला सुरुंग, आणखी एक आमदार फोडला, ममता बॅनर्जींना धक्क्यावर धक्के

पश्चिम बंगालमध्ये भाजप नेत्याच्या सभेपूर्वीच बॉम्बफेक, एक जखमी; बंगाल हादरले

ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का; सहकाऱ्याकडून नव्या पक्षाची स्थापना

(Baishali Dalmiya Expelled From TMC For Anti-Party Activities)

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें