दिल्लीतच देशाची राजधानी का?, कोलकातासहीत देशातील चार ठिकाणी राजधानी बनवा: ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशाची राजधानी दिल्लीच का? असा सवाल केला आहे. (India must have 4 capitals, says CM Mamata Banerjee)

दिल्लीतच देशाची राजधानी का?, कोलकातासहीत देशातील चार ठिकाणी राजधानी बनवा: ममता बॅनर्जी
Follow us
| Updated on: Jan 23, 2021 | 4:00 PM

कोलकाता: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशाची राजधानी दिल्लीच का? असा सवाल केला आहे. कोलकात्यासह देशाच्या चार ठिकाणी राजधानी बनवा, अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी केली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ममता बॅनर्जी यांनी कोलकात्याला देशाची राजधानी करण्याची मागणी करून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. (India must have 4 capitals, says CM Mamata Banerjee)

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125व्या जयंती निमित्त ममता बॅनर्जी यांनी आज लाँगमार्चचं आयोजन केलं होतं. त्यानंतर जनतेशी संवाद साधताना त्यांनी ही मागणी केली. केवळ दिल्लीच देशाची राजधानी का? कोलकाताही देशाची राजधानी व्हावी. देशाच्या चार ठिकाणी देशाची राजधानी असावी. दक्षिण भारतात कर्नाटक, आंध्रप्रदेश, केरळ, उत्तरेत पंजाब, हरयाणा, पूर्व बिहार, ओडिशा, बंगालमध्ये देशाच्या राजधानी निर्माण व्हाव्यात. उत्तर पूर्वेकडील राज्यांमध्येही देशाची राजधानी असावी. केवळ दिल्लीपर्यंतच मर्यादीत का राहायाचं?, असा सवाल त्यांनी केला.

दिल्लीत सर्वच आऊटसायडर

दिल्लीत सर्वच आऊटसायडर आहेत, असं सांगतानाच संसदेचं अधिवेशन देशाच्या प्रत्येक भागात झालं पाहिजे. केवळ एकाच ठिकाणी संसदेचं अधिवेशन कशासाठी? देशाच्या इतर भागात टप्प्याटप्प्याने संसदेचं अधिवेशन का घेतलं जात नाही? कोलकात्यामध्ये संसदेचं अधिवेशन का होऊ शकत नाही? असे सवालही त्यांनी उपस्थित केले.

खरा इतिहास नाकारला जातोय

पश्चिम बंगालचं स्वातंत्र्याच्या लढ्यात मोठं योगदान राहिलं आहे. भारतीय पुनर्जागरणाची सुरुवातही बंगालमधूनच झाली. बंगालने कधीच कुणापुढे मस्तक झुकवले नाही आणि झुकवणार नाही, असं सांगतानाच सध्या वन नेशन, वन पार्टी आणि वन व्होटच्या गप्पा मारल्या जात आहेत. चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडला जात असून खरा इतिहास नाकारला जात असल्याची टीकाही त्यांनी केली.

9 किलोमीटरचा मार्च

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125व्या जयंती निमित्ताने ममता बॅनर्जी यांनी 9 किलोमीटरचा मार्च काढला. श्यामबाजार पांच माथामार्गे मेयो रोड स्थित गांधीजींच्या पुतळ्यापर्यंत हा भव्य लाँगमार्च काढण्यात आला. सायरन वाजवून आणि शंखनाद करत हा मार्च काढण्यात आला. या मार्चमध्ये हजारो लोक सहभागी झाले होते. या मार्चच्या माध्यमातून ममता बॅनर्जी यांनी जोरदार शक्तिप्रदर्शनही केलं. (India must have 4 capitals, says CM Mamata Banerjee)

संबंधित बातम्या:

काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीत नेत्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची; परस्परांवर पातळी सोडून टीका

Special Report : नंदिग्राम ममता बॅनर्जींसाठी गेमचेंजर ठरणार?

तृणमूलमधील बंडाळी सुरूच; बंडखोर आमदार वैशाली दालमियांची टीएमसीतून हकालपट्टी

(India must have 4 capitals, says CM Mamata Banerjee)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.