काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता, मुलाचं नाव ठेवलं काँग्रेस

राजस्थानमध्ये एका काँग्रेस कार्यकर्त्याने आपल्या मुलाचं नाव काँग्रेस (Congress jain rajsthan) ठेवलं आहे. त्यामुळे सर्वत्र या काँग्रेस कार्यकर्त्याची चर्चा सुरु आहे.

  • Updated On - 1:17 pm, Wed, 22 January 20 Edited By:
काँग्रेसचा सच्चा कार्यकर्ता, मुलाचं नाव ठेवलं काँग्रेस

जयपूर : राजस्थानमध्ये एका काँग्रेस कार्यकर्त्याने आपल्या मुलाचं नाव काँग्रेस (Congress jain rajsthan) ठेवलं आहे. त्यामुळे सर्वत्र या काँग्रेस कार्यकर्त्याची चर्चा सुरु आहे. काँग्रेस पक्षाचा सच्चा कार्यकर्ता असल्यामुळे त्याने थेट पक्षाचे नाव आपल्याला मुलाला दिलं. विनोद जैन असं या काँग्रेस कार्यकर्त्यांचं (Congress jain rajsthan) नाव आहे.

नुकतेच त्याने आपल्या मुलाचे बर्थ सर्टिफिकेट काढले यावरही त्याने आपल्या मुलाचं नाव काँग्रेस ठेवलं आहे. 18 जुलै रोजी विनोदला मुलगा झाला होता. त्याने त्यांच्या मुलाचं नाव काँग्रेस जैन असं ठेवलं आहे.

विनोद जैनला नुकतेच आपल्या मुलाचे बर्थ डे सर्टिफिकेट मिळाले. मुलाचं नाव काँग्रेस ठेवल्याने त्याच्या कुटुंबीयानी आणि मित्रांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला. पण विनोग कुणाचे ऐकण्यास तयार नाही. त्याचे काँग्रेस पक्षावर एवढे प्रमे आहे की त्याने मुलाचं नाव काँग्रेस ठेवलं

“माझा मुलगा जेव्हा मोठा होईल तेव्हा संपूर्ण देशात तो काँग्रेस पक्षाचे वर्चस्व असेल”, असं विनोद जैनने सांगितले.

विनोद राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची प्रेरणा घेऊन काँग्रेसमध्ये काम करत आहेत. विनोदने एनएसयूआयचे जिल्हा महासचिव पदावरुन आपल्या राजकीय करिअरची सुरुवात केली होती. आज अशोक गहलोत यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चालणाऱ्या टीमचा विनोद सदस्य आहे.