बायकोला मारझोड करणं कितपत योग्य? देशभरातल्या धक्कादायक सर्व्हेक्षणची जोरदार चर्चा

सर्वेक्षणात 18 राज्यांतील महिलांना कौटुंबिक हिंसाचाराबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे, बहुतांश महिलांनी पतीने पत्नीला मारहाण करणाचे समर्थन केले आहे! जर देशातील महिला अजूनही घरगुती हिंसाचाराच्या विरोधात आवाज उठवत नसतील, तर भारतात खरेच महिला सक्षमीकरण होत आहे का?

बायकोला मारझोड करणं कितपत योग्य? देशभरातल्या धक्कादायक सर्व्हेक्षणची जोरदार चर्चा
Domestic voilence

नवी दिल्लीः राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य सर्वेक्षणाच्या नुकत्याच जाहीर झालेल्या अहवालात असे दिसून आले आहे की भारतात महिलांची संख्या आता पुरुषांपेक्षा जास्त आहे. जे दर्शवते की आपल्या देशात मुलींच्या हत्या/बाल हात्या कमी झाल्या आहेत. तर, दुसरीकडे महिलांचे शैक्षणिक स्तरात आणि बँक खात्यांमध्ये वाढ झालीये आणि प्रजनन दर कमी झाला आहे. भारताच्या सामाजिक आणि महिला सक्षमीकरणासाठी ही खूप चांगली बाब आहे. परंतु याचवेळी, कौटुंबिक हिंसाचाराबद्दल भारतीय महिलांचा दृष्टीकोन अजूनही चिंताजनक आहे.

सर्वेक्षणात 18 राज्यांतील महिलांना कौटुंबिक हिंसाचाराबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे, बहुतांश महिलांनी पतीने पत्नीला मारहाण करणाचे समर्थन केले आहे! जर देशातील महिला अजूनही घरगुती हिंसाचाराच्या विरोधात आवाज उठवत नसतील, तर भारतात खरेच महिला सक्षमीकरण होत आहे का? हा गंभीर प्रश्न आहे.

महिला अत्याचाराविरोधात नाहीत!

सर्वेक्षण केलेल्या महिलांपैकी, तेलंगणात सर्वीधीक 83.8 टक्के महिलांंचं म्हणणं आहे की पुरुषांनी त्यांच्या पत्नीला मारहाण करणे योग्य आहे. तर, हिमाचल प्रदेशात सर्वात कमी- 14.8 टक्के महिलांंनी या मारहाणीचं समर्थन केलं आहे. सर्वेक्षण केलेल्या पुरुषांपैकी, कर्नाटकमधल्या 81.9 टक्के पुरुषांनी पत्नीला मारहाण करणे योग्य आहे असं मत दिल. तर, हिमाचल प्रदेशात- 14.2 टक्के पुरुषांनी या मारहाणीचं समर्थन केलं आहे.

सर्वेक्षणानुसार, घरगुती हिंसाचाराचे समर्थन करण्याची सर्वात सामान्य कारणे म्हणजे, सासरचा लोकांचा अनादर करणे आणि घराकडे व मुलांकडे दुर्लक्ष करणे ही आहेत. यावर विश्वास ठेवणे कठीण आहे, की एकीकडे भारतातील महिलांमध्ये शैक्षणिक पातळी आणि जागरूकता वाढत आहे, पण तरीही महिलांवरील अत्याचाराविरोधात भूमिका घेण्याचा अभाव आहे.

राष्ट्रीय कुटुंब आणि आरोग्य विभागाचे हे सर्वेक्षण 2019-20 वर्षाचे आहे, जे नुकतेच जाहीर झाले. आसाम, आंध्र प्रदेश, बिहार, गोवा, गुजरात, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, तेलंगणा, त्रिपुरा आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये हे सर्वेक्षण केले गेले.

कौटुंबिक हिंसाचाराचे समर्थन करणाऱ्या महिलांची टक्केवारी इतर राज्यांमध्ये आंध्र प्रदेश- 83 टक्के, कर्नाटक- 77 टक्के, मणिपूर- 66 टक्के आणि केरळ 52.4 टक्के अशी आहे.

इतर बातम्या

कुर्ल्यात 20 वर्षीय तरुणीची बलात्कारानंतर हत्या, इन्स्टा व्हिडीओ शूटिंगसाठी गेलेल्या तरुणांना आढळला मृतदेह

महाराष्टात मुली नेमक्या कुणाला नकोत? कोणत्या जिल्ह्यांनी ‘बेटी बचाव’चा नारा सार्थ ठरवला? वाचा सविस्तर


Published On - 4:43 pm, Sat, 27 November 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI