MDH म्हणजे मसाल्यांचा बादशाह, जगभरात किचन किंग मसाल्यांचे कोट्यवधी खवय्ये

MDH मसाले संपूर्ण जगातील भारताचा एक प्रमुख मसाला ब्रँड आहे. 100 वर्षाहून अधिक काळापासून MDH ने सर्वोत्तम मसाले देऊन खवय्यांना आपलसं करून टाकलं आहे.

MDH म्हणजे मसाल्यांचा बादशाह, जगभरात किचन किंग मसाल्यांचे कोट्यवधी खवय्ये
MDH
| Edited By: | Updated on: Aug 28, 2025 | 3:08 PM

महाशियां दी हट्टी (Mahashian Di Hatti) कंपनी आपल्या अप्रतिम मसाल्यांसाठी जगभरात लोकप्रिय आहे. MDH मसाले संपूर्ण जगातील भारताचा एक प्रमुख मसाला ब्रँड आहे. 100 वर्षाहून अधिक काळापासून MDH ने सर्वोत्तम मसाले देऊन खवय्यांना आपलसं करून टाकलं आहे. किचन किंग मसाला MDHच्या खास उत्पादनापैकी एक आहे. किचन किंग मसाल्याचीही प्रचंड लोकप्रियता आहे. जगभरात या मसल्याचे चाहते आहेत.

भारतीय स्वयंपाक घरात मसाले म्हणजे फक्त चव वाढवण्याचे तत्त्व नाहीत, तर प्रत्येक पदार्थाचा तो आत्मा मानला जातो. एमडीएच किंग मसाला त्यापैकीच एक आहे. एमडीएच किंग मसाला आपला सुगंध, अस्सल स्वाद आणि शुद्धतेसाठी प्रत्येक घरातील पहिली पसंत झाला आहे. हा बहुपयोगी मसाला केवळ खाद्यपदार्थांना चवच देत नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

शिजवण्याच्या दृष्टीने हा मसाला अत्यंत उपयोगी आहे. भाजी, डाळ, कढी आणि स्नॅक्ससारख्या पदार्थांमध्ये संतुलित चव आणि मनमोहक सुगंध देण्याचं काम हा मसाला करतो. फक्त एक चमच मसाला टाकल्यावर स्वयंपाक घरात रेस्टॉरंट सारखा सुगंध दरवळू लागतो. या मसाल्यामुळे वेळही वाचतो. तसेच पदार्थांमध्ये वेगवेगळे मसाले टाकण्याची गरजही भासत नाही. या मसल्याची चव प्रत्येकवेळी तीच राहते. त्यामुळे घरगुती जेवण रुचकर, चविष्ट आणि अप्रतिम होतं.

युट्यूब लिंक –

किचन किंग मसाल्याचे फायदे

एमडीएच किचन किंग मसाल्यांमध्ये हळद, जिरे, धने, अद्रक, इलायची आणि काळी मिरी असते. त्यामुळे शरीराला त्याचे लाभ होतात. हळद आणि आल्यामध्ये सूज कमी करणारे घटक असतात. त्यामुळे शरिराला आराम मिळतो. मसाल्यांमध्ये असणारी विलायची आणि जिरे पचनक्रिया मजबूत करण्यास मदत करते. यामुळे रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलही संतुलित राहते. त्याचबरोबर काळी मिरी शरीरातील मेटाबॉलिजम वाढवते. या मसाल्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, यामुळे रोगांपासून संरक्षण होते.

मसाल्यांमध्ये रंगांचा वापर नाही

एमडीएच मसाले हे आपल्या उत्तम गुणवत्तेसाठी ओळखले जातात. या मसाल्यांमध्ये शुद्ध आणि नैसर्गिक मसाल्याचे पदार्थ वापरले जातात. या मसाल्यांमघ्ये हानिकारक रंग किंवा भेसळ नसते. कंपनी मसाल्यासाठी लागणारा कच्चा माल उत्पादन केंद्रांमधून घेते आणि नंतर आधुनिक मशीनद्वारे त्यावर प्रक्रिया केली जाते. यामुळे चव आणि शुद्धतेबाबत तडजोड होत नाही. यामुळे मसाल्याचा मूळ सुगंध आणि रंग नैसर्गिक राहतो. यामुळे भारतातील प्रत्येक घरातील लोकांचा एमडीएचवर विश्वास आहे.