AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

16 वर्षांच्या भाच्यावर मामीचा जडला जीव, म्हणाली.. हाच माझा पती !

उदरनिर्वाहासाठी काम शिकायला घरी आलेल्या भाच्यावर मामीचा जीव जडला आणि तिने त्याच्याशी अनैतिक संबंध राखले. ती त्यालाच आपला पती मानू लागली आणि एके दिवशी,,

16 वर्षांच्या भाच्यावर मामीचा जडला जीव, म्हणाली.. हाच माझा पती !
अल्पवयीन भाच्यावर जडला मामीचा जीव, पतीच समजू लागलीImage Credit source: प्रातिनिधिक फोटो
| Updated on: May 27, 2025 | 9:35 AM
Share

प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं असं म्हणतात… कधी होणाऱ्या जावयाचा सासूवर जीव जडतो तर कधी दीराचा वहिनीवर.. पण या अशा गोष्टी ऐकल्या की कानांवर विस्वास बसत नाही हे खरा… आपल्याच मुलीच्या होणाऱ्या नवऱ्याच्या प्रेमात पडून, तिची आई भावी जावयासोबत पळून गेल्याचे प्रकरण काही दिवसांपूर्वी खूप गाजलं होतं. त्याची चर्चा शांत होते ना होते तोच आता उत्तर प्रदेशच्या मेरठमध्ये आणखी एक धक्कादायक आणि हैराण करणारं प्रकरण समोर आलं आहे. तिथे एका 35 वर्षांच्या महिलेचा तिच्या 16 वर्षांच्या भाच्यावर जीव जडलाय. एवढंच नव्हे तर तिचे त्याच्याशी अनैतिक संबंधही असून आता तोच माझा पती आहे, असं म्हणत ती इरेला पेटली आहे. मात्र त्या अल्वपयीन मुलाच्या घरच्यांनी विरोध केला., पण ते पाहून ती महिला पोलिसांना घेऊ थेट त्याच्या घरीच धडकली ना राव.. आधी तो माझा भाचा होता, पण आता माझा पती आहे. माझ्या पतीला त्याच्या घरच्यांनी बंधक बनवून ठेवलंय, असा आरोपही तिने केला असून त्यामुळे चांगलीच खळबळ माजली आहे.

अशा परिस्थितीत, पोलीस आता या अवैध संबंधांच्या गुंत्यात अडकले आहेत. सध्या पोलीस अल्पवयीन मुलाच्या वयाच्या प्रमाणपत्राच्या आधारे प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला दिल्लीची रहिवासी आहे. तर अल्पवयीन मुलगा तिच्या पतीचा भाचा आहे आणि तो मेरठमधील दौराळा येथील रहिवासी आहे. चौकशीदरम्यान अल्पवयीन मुलीच्या कुटुंबाने पोलिसांना सांगितले की, त्या महिलेच्या पतीचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले होते.

मामीकडे काम शिकायला गेला होता भाचा

त्यानंतर त्या अल्पवयीन मुलाला, मामीला मदत करण्यासाठी तिच्याकडे पाठवण्यात आले. यामागील हेतू असा होता की तो दिल्लीत राहून तो एसी-फ्रीजचे काम शिकेल आणि नंतर मेरठला परत येईल आणि स्वतःचा व्यवसाय सुरू करेल. कुटुंबातील सदस्यांच्या सांगण्यानुसार, दिल्लीत एकत्र राहत असताना, महिलेने अल्पवयीन मुलाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि त्याच्याशी बराच काळ अनैतिक संबंध ठेवले. आता काही दिवसांपूर्वीच, तो मुलगा त्याच्या घरी आला तेव्हा त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याला इथेच थांबवून ठेवलं. मात्र दिल्लीत राहणाऱ्या त्या महिलेला ही बातमी समजताच तिने मेरठ गाठलं आणि त्या अल्पवयीन मुलाला घेऊन जाण्याबद्दल बोलू लागली.

पोलिसांनी मागितलं वयाचं प्रमाणपत्र

मात्र त्या मुलाला घेऊन जाण्यास घरच्यांनी विरोधा दर्शवला, तेव्हा त्या महिलेने थेट पोलिसांना बोलावले. हा अल्पवयीन मुलगा, आता तिचा नवरा आहे आणि ती त्याच्यासोबत राहणार आहे, असं तिने पोलिसांना सांगितलं..महिलेच्या या विधानामुळे दारोलामध्ये मोठा गोंधळ उडाला. मोठ्या मुश्किलीने पोलिसांनी दोन्ही पक्षांना समजावून शांत केले. मात्र, अद्यापही हा प्रश्न सुटलेला नाही. मेरठचे एसपी सिटी आयुष विक्रम सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाचे वय 16 वर्षे असल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत, हे प्रकरण मिटवण्यासाठी, आता त्याच्या वयाचं प्रमाणपत्र मागितले आहे. ते तपासल्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.