AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zojila tunnel : भारताचा महत्त्वकांक्षी प्रकल्प सुरु होणार, MEIL ला जोजिला बोगद्यासह 33 किमी रस्त्याचं कंत्राट

जम्मू काश्मीरमधील हिमालयाच्या पर्वत रांगांमध्ये सुरु होणाऱ्या भारताच्या महत्त्वकांक्षी जोजिला बोगद्याचं (Zojilla Tunnel) काम लवकरच सुरु होणार आहे (MEIL to construct Zojilla Tunnel in Himalayan region).

Zojila tunnel : भारताचा महत्त्वकांक्षी प्रकल्प सुरु होणार, MEIL ला जोजिला बोगद्यासह 33 किमी रस्त्याचं कंत्राट
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Aug 21, 2020 | 7:51 PM
Share

नवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील हिमालयाच्या पर्वत रांगांमध्ये सुरु होणाऱ्या भारताच्या महत्त्वकांक्षी जोजिला बोगद्याचं (Zojilla Tunnel) काम लवकरच सुरु होणार आहे (MEIL to construct Zojilla Tunnel in Himalayan region). मेघा इंजिनिअरींग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (MEIL) हे काम करणार आहे. यासाठी आज नॅशनल हायवे अँड इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (NHIDCL) निविदा मागवल्या होत्या. त्यात एमईआयएलने बाजी मारली. हा प्रकल्प दोन टप्प्यांमध्ये पूर्ण केला जाणार आहे. यात जवळपास 33 किलोमीटर रस्ते बांधले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात यापैकी 18.5 किलोमीटर रस्त्याचं काम होईल.

या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात 14.5 किलोमीटरचा जोजिला बोगदा बांधण्यात येणार आहे. यात 9.5 मीटर रुंदीच्या दोन पदरी रस्त्याचा समावेश असेल. तसेच बोगद्याची उंची 7.57 मीटर इतकी असेल. हा प्रकल्प पूर्ण करताना अनेक अडथळे येणार आहेत. त्यामुळे अत्यंत कल्पकपणे यावर काम केले जाणार आहे. MEIL ने 4 हजार 509.5 कोटी रुपयांची निविदा सादर करत हा प्रकल्प मिळवला. इतर कंपन्यांच्या निविदा अधिक किमतीच्या असल्याने MEIL ने यात आघाडी घेतली.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

• हिमालाय क्षेत्रात कारगिली मार्गे जम्मू काश्मीर ते लेह असा भारताचा महत्वकांक्षी प्रकल्प • अंदाजे 4 हजार 509.5 कोटींचा प्रकल्प • अत्यंत प्रतिकूल परिस्थित प्रकल्पाचं काम होणार

श्रीनगर ते लेह (लडाख) हा रस्ता वर्षभर सुरु राहण्यात अनेक अडथळे आहेत. श्रीनगर-लडाख हायवे तर हिवाळ्यात बर्फ पडून जवळपास 6 महिने पूर्णपणे बंद असतो. या काळात सैन्याची वाहनं देखील प्रवास करु शकत नाहीत. त्यामुळे पर्यायी रस्त्यांचा अवलंब करुन निश्चित ठिकाणी पोहचणं फार खर्चिक होऊन जाते.

यात आर्थिक बोजासह वेळेचाही मोठा अपव्यय होतो. त्यामुळेच कारगील मार्गे सोनामार्ग ते लेह आणि लडाख बोगदा रस्त्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. तो आता पूर्णत्वाकडे जातो आहे. हा बोगदा रस्ता पृष्ठभागापासून तब्बल 700 मीटर खोलवर केला जाणार आहे.

MEIL चे संचालक सुब्बैह (Ch. Subbaiah, MEIL Director) म्हणाले, “हा प्रकल्प दोन टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे. हा प्रकल्प केवळ 72 महिन्यांमध्ये पूर्ण केला जाणार आहे.”

वर्षातील जवळपास 8 महिने बर्फ पडत असणाऱ्या या भागात प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. प्रकल्पाच्या जवळच एक नदी वाहत असल्याने त्याचंही मोठं आव्हान असणार आहे. प्रवाशांना प्रवास करण्याची चांगली व्यवस्था व्हावी म्हणून श्रीनगर ते बालताल दरम्यान महामार्गावरही एक बोगदा बांधला जाणार आहे. या बोगद्यामुळे अमरनाथला जाणाऱ्या यात्रेकरुंचीही मोठी सोय होणार आहे.

हेही वाचा :

कोण किती पाण्यात?, कोणत्या देशाचं नौदल तुफानी ताकदीचं?

चिनी सैनिकांनी पाकिस्तानच्या जवानांना धुतलं, जोरदार हाणामारी

चोराच्या मनात चांदणं, राफेल भारतात दाखल होताच लाखो पाकिस्तान्यांची गूगलवर माहिती सर्च, पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांवरही राफेलचीच चर्चा

MEIL to construct Zojilla Tunnel in Himalayan region

Follow Us
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद
कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली...
Kapil Sibbal | कपिल सिब्बलांचा एक-एक युक्तिवाद, शिंदे गटाची धाकधूक वाढली; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडतंय?