चोराच्या मनात चांदणं, राफेल भारतात दाखल होताच लाखो पाकिस्तान्यांची गूगलवर माहिती सर्च, पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांवरही राफेलचीच चर्चा

चोराच्या मनात चांदणं या उक्तीप्रमाणे पाकिस्तानला राफेल स्वतःच्या विनाशाचं कारण वाटू लागलं आहे. पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांमधूनही याच भीतीपोटी भरभरुन चर्चा होत आहे (Rafale trend in Pakistan and millions of searches on google).

चोराच्या मनात चांदणं, राफेल भारतात दाखल होताच लाखो पाकिस्तान्यांची गूगलवर माहिती सर्च, पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांवरही राफेलचीच चर्चा

कराची : राफेलची विमानं भारताच्या भूमीवर लँड होताच, तिकडे पाकिस्तानात भीतीचा थरकाप उडू लागला आहे. फक्त सरकारच नाही तर पाकिस्तानी जनतासुद्धा राफेलच्या क्षमतेबाबत गूगलवर माहिती सर्च करु लागली आहे. राफेलची विमानं तातडीनं आणण्याचा मुख्य उद्देश चिनी वायुदलाला उत्तर देण्याचा आहे. मात्र चोराच्या मनात चांदणं या उक्तीप्रमाणे पाकिस्तानला राफेल स्वतःच्या विनाशाचं कारण वाटू लागलं आहे. पाकिस्तानी वृत्तवाहिन्यांमधूनही याच भीतीपोटी भरभरुन चर्चा होत आहे (Rafale trend in Pakistan and millions of searches on google).

भारताला राफेलची डिलिव्हरी मिळताच पाकिस्तानी सोशल मीडियात राफेल ट्रेंडिंगमध्ये आलं. काही तासात 1 लाखांहून जास्त लोकांनी राफेलच्या क्षमतांबाबत गूगलवर सर्च केलं. भारत-चीन वादापासून पाकिस्तानला स्वतःवर हल्ला होण्याची भीती वाटू लागली आहे. तिथल्या अनेक मंत्र्यांनी तशी जाहीर विधानंही केली आहेत. भारताच्या सैन्यखरेदीच्या करारांविरोधात पाकिस्तानला पोटशूळ उठलाय आणि भीती सुद्धा वाटत आहे. त्यामुळेच भारत करत असलेल्या सैन्यखरेदीच्या करारांवर जगानं नियंत्रण आणावं, अशा बोंबा मारणं पाकिस्ताननं सुरु केलं आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

पाकिस्तानकडे सध्या सर्वात आधुनिक अमेरिकेचं F-16 हे विमान आहे. तर भारताकडे सर्वात वेगवान आणि अत्याधुनिक विमान राफेल आहे. पाकिस्तानचं F-16 ताशी 1470 किलोमीटर वेगानं उडतं. तर भारताचं राफेल तासाला 2223 किलोमीटरचं अंतर पार करतं. पाकिस्तानी F-16 निर्मिती ही 1973 साली झाली. तर भारतीय राफेल हे 1986 साली बनवलं गेलं (Rafale trend in Pakistan and millions of searches on google).

पाकिस्तानच्या F-16 मधली AIM मिसाईल हवेतून हवेत 80 किलोमीटरपर्यंत मारा करतात. तर राफेलची स्काल्प मिसाईल हवेतून जमिनीवर तब्बल 600 किलोमीटरपर्यंत मारा करते. त्याशिवाय राफेलचं विमान हे वेगवेगळ्या 7 प्रकारच्या मोहिमांवर पाठवलं जाऊ शकतं.

राफेलच्या मिटिऑर मिसाईलची क्षमता इतकी घातक आहे, की ती मिसाईल पाकिस्तानच्या F-16 विमानाला तब्बल 100 किलोमीटर लांबवरुनसुद्धा जमीनदोस्त करु शकतं. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर, समजा याआधीपर्यंत पाकिस्तानच्या एका F-16 विमानाला रोखण्यसााठी भारताला दोन-दोन सुखोई विमानं तैनात करावी लागायची. तर आता फक्त 1 राफेल पाकिस्तानच्या दोन-दोन F-16 विमानांवर भारी पडेल.

हेही वाचा : शत्रूंच्या मनात धडकी भरवणारं राफेल विमान अंबाला एअरबेसवर दाखल

शेवटी हा विमानांच्या क्षमतांचा मुद्दा झाला. पण आपल्या सैनिकांनी मिग-21 च्या जोरावर पाकिस्तानचं F-16 पाडलंय. हे पाकिस्तानचं वायुदल कधीच विसरणार नाही. त्यामुळे राफेलपुढे पाकिस्तानच्या वायुदलाची अवस्था ही एखाद्या पखं नसलेल्या पक्ष्यांप्रमाणे होईल.

पाकिस्तानची सर्वात मोठी गोची म्हणजे त्यांच्याकडची F-16 विमानं ही अमेरिकेच्या परवानगीशिवाय येत नाहीत. कारण F-16 विमानं ही फक्त दहशतवाद्यांच्या विरोधातच वापरली जावीत, अशी अट घालूनच अमेरिकेनं F-16 विमानं पाकिस्तानला सोपवली आहेत. राफेलच्या विमानांची एक तुकडी भारतीय वायुदलात दाखल होणं, म्हणजे अख्खं पाकिस्तानी वायुदल पंगू होण्यासारखं आहे. हीच भीती पाकिस्तानला अवस्थ करत आहे.

हेही वाचा : चीनचे सर्व फासे उलटे पडणार, भारतीय वायुदलात आकाशातला सर्वात मोठा योद्धा दाखल होणार

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *