आता धावत्या रेल्वेत प्रवासी बोर होणार नाहीत! रेल्वे याच महिन्यात सुरु करणार नवी सुविधा

| Updated on: Mar 04, 2021 | 10:33 PM

रेल्वे पीएसयू रेलटेल (RailTel) च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार रेल्वेमध्ये बहुप्रतिक्षित अशा कंन्टेंट ऑन डिमांड (CoD) सेवा या महिनापासूनच सुरु केली जाणार आहे.

आता धावत्या रेल्वेत प्रवासी बोर होणार नाहीत! रेल्वे याच महिन्यात सुरु करणार नवी सुविधा
भारतीय रेल्वे
Follow us on

नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांना आता मनोरंजनासाठी एख खास नवी सुविधा मिळणार आहे. रेल्वे पीएसयू रेलटेल (RailTel) च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार रेल्वेमध्ये बहुप्रतिक्षित अशा कंन्टेंट ऑन डिमांड (CoD) सेवा या महिनापासूनच सुरु केली जाणार आहे. या सुविधेनुसार प्रवाशांना रेल्वेत प्रिलोडेड मिल्टीलिंग्वल कंटेट उपल्बध करुन दिला जाईल. त्यात चित्रपट, बातम्या, म्युधिक व्हिडीओ आणि जनरल एन्टरटेन्मेंटचा सहभाग असेल.(Railway Ministry has decided to start content on demand service in Railway)

रेलटेलचे सीएमडी पुनीत पुनावाला यांनी सांगितलं की, बफर फ्री सेवा निश्चित करण्यासाठी मीडिया सर्व्हर रेल्वेच्या डब्यात ठेवलं जाईल. प्रवासी धावत्या रेल्वेतही आपल्या डिव्हाईसमध्ये हाय क्वालिटी असणारे बफर फ्री स्ट्रिमिंगचा आनंद घेऊ शकणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे वेळोवेळी यातील कंटेन्ट अपडेट होत राहील.

कोणत्या स्टेशनांपासून सेवेला सुरुवात?

रेल्वेही सुविधा 5 हजार 723 उपनगरी रेल्वे आणि 5 हजार 952 वाय-फाय असणाऱ्या रेल्वे स्थानकांसह 8 हजार 731 रेल्वे गाड्यांमध्ये चालू केली जाणार आहे. एक राजधानी एक्सप्रेस आणि एका पश्चिम रेल्वेतील एसी उपनगरीय रेकमध्ये ही सुविधा अंतिम टप्प्यात आणि परीक्षणाच्या तयारीत आहे.

रेल्वे आणि रेलटेलमध्ये यातून मिळणाऱ्या लाभ विभागून 50 – 50 टक्के घेतला जाणार आहे. त्यात पीएसयूला या सुविधेतून कमीतकमी 60 कोटी रुपयांचं वार्षिक उप्तन्न मिळणार आहे.

रेलटेलने रेल्वे आणि रेल्वे स्थानकावर CoD सुविधा प्रदान करण्यासाठी झी एन्टरटेन्मेंटची सहाय्यक कंपनी मार्गो नेटवर्क्ससोबत भागिदारी केली आहे. यी योजना दोन वर्षात कार्यान्वित केली जाणार आहे. यातील कंटेन्ट पेड आणि अनपेड फॉरमॅटमध्ये 10 वर्षांसाठी करार करण्यात आला आहे.

सेवानिवृत्त खोल्या पुन्हा सुरु करण्याचा निर्णय

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यानंतर रेल्वे मंत्रालयानं अजून एक निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्रालयानं विभागीय रेल्वेला कोविड संबंधित प्रोटोकॉलसह स्थानिक स्थिती लक्षात घेऊन स्थानकांवरील सेवानिवृत्त खोल्या पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान, रेल्वे बोर्डाने यापूर्वीच सेवानिवृत्त खोल्या, रेल्वे यात्री निवास आणि IRCTC द्वारे चालवले जाणारे हॉटेल्स पुन्हा सुरु करण्यास परवानगी दिली आहे.

सध्यस्थितीत आवश्यकतेनुसार आणि टप्प्याटप्प्याने विविध विशेष एक्सप्रेस / प्रवासी गाड्यांची सेवा सुरु करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सोयीचा विचार करुन रेल्वेनं सरकारने घालून दिलेल्या नियमावलीच्या पूर्ततेनुसार स्थानकांवर सेवानिवृत्त खोल्या सुरु करण्याचं ठरवलं आहे. कोरोनाचा प्रवास रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर रेल्वे मंत्रालयाकडून ही सेवा बंद करण्यात आली होती.

इतर बातम्या :

चिंता मिटली; भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ ठरतेय अधिक प्रभावी; ‘सीरम’च्या लशीलाही टाकले मागे?

पेट्रोल पंपावरील मोदींचे बॅनर 72 तासांत हटवण्याचे निवडणूक आयोगाचे आदेश

Railway Ministry has decided to start content on demand service in Railway