बिहारमध्ये पाकिस्तानी पाहुणे… आमदार अनंत सिंह यांची संपत्ती किती? आकडा थक्क करणारा

बिहारचे आमदार अनंत सिंह यांच्या मुलीच्या भव्य विवाहसोहळ्यामुळे त्यांची संपत्ती चर्चेत आली आहे. 100 कोटींहून अधिक मालमत्ता असलेले अनंत सिंह यांच्याकडे महागड्या कार, कोट्यवधींचे सोने, स्थावर मालमत्ता, गुंतवणूक आणि घोडे, हत्ती, गायींसारखी प्राणीसंपदाही आहे. त्यांच्यावरील 25 कोटींहून अधिक कर्जही प्रतिज्ञापत्रातून समोर आले आहे.

बिहारमध्ये पाकिस्तानी पाहुणे... आमदार अनंत सिंह यांची संपत्ती किती? आकडा थक्क करणारा
anant singh
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 10, 2026 | 12:16 PM

बिहारच्या मोकामाचे आमदार अनंत कुमार सिंह यांची कन्या शिवांगी हिचं लग्न होणार आहे. येत्या 25 नोव्हेंबर रोजी शिवांगी अमेरिकेत राहणाऱ्या ऋषिकेश कुमार याच्याशी विवाहबद्ध होणार आहे. या लग्नासाठी पाकिस्तानपासून दुबईपर्यंतचे पाहुणे येणार आहेत. 10 एकरवर होणाऱ्या या लग्नाला सुमारे 4 लाख लोक येणार असून या सर्व पाहुण्यांसाठी 150 प्रकारचे पदार्थ मेजवाणी म्हणून ठेवण्यात आले आहेत. अनंत सिंह यांनी आपल्या लाडक्या जावयासाठी सुमारे दोन कोटीची लँड रोव्हर डिफेंडर आणि मुलासाठी बीएमडब्ल्यू कार घेतली आहे. त्यामुळे हे लग्न अधिकच चर्चेत आलं आहे. कोरोडा रुपये या लग्नावर खर्च करणाऱ्या अनंत सिंह यांची संपत्ती आहे तरी किती? अशी चर्चाच आता देशभर रंगली आहे.

संपत्ती किती?

अनंत सिंह यांनी बिहार विधानसभा निवडणुकीच्यावेळी प्रतिज्ञापत्र सादर केलं होतं. त्यात त्यांनी आपल्या संपत्तीची माहिती दिली होती. अनंत सिंह यांनी 100 कोटीची संपत्ती असल्याचं घोषित केलं होतं. त्यांनी पत्नी नीलम देवी यांच्या संपत्तीचीही माहिती दिली होती. अनंत सिंह आणि त्यांची पत्नी नीलम देवी यांची एकूण संपत्ती 100.61 कोटी रुपये आहेत. यात सुमारे 39.73 कोटींची चल संपत्ती आहे, तर 60.87 कोटींची अचल संपत्ती आहे. अनंत सिंह यांच्या नावे सुमारे 26.66 कोटींची चल संपत्ती आहे, तर 11.22 कोटी रुपये अचल संपत्ती आहे. नीलम देवी यांच्या नावे 13.07 कोटींची चल संपत्ती आणि 49.65 कोटींची अचल संपत्ती आहे. म्हणजे नीलम देवी यांच्या नावावर सर्वाधिक संपत्ती आहे.

Loading...

25 कोटींचं कर्ज

दरम्यान, अनंत सिंह यांनी प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरील कर्जाची माहितीही दिली आहे. माहितीनुसार, अनंत सिंह यांच्यावर 2.47 कोटींचं तर पत्नी नीलम देवींच्या नावावर सुमारे 23.51 कोटी रुपयांचं कर्ज आहे. दोघांवर एकूण 25.99 कोटी रुपयांचं कर्ज आहे.

लँड क्रूझरसहीत अनेक गाड्या

अनंत सिंह यांच्याकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. प्रतिज्ञापत्रात टोयोटा लँड क्रूझर ZXचा उल्लेख आहे. या गाडीची किंमत 2.70 कोटी आहे. या शिवाय त्यांच्याकडे टोयोटा फॉर्च्यूनर आणि महिंद्रा XUV 500 सुद्धा आहे. या दोन्ही गाड्यांची एकत्रित किंमत 80 ते 90 लाखाच्या आसपास आहे. नीलम देवींच्या नावावर इनोव्हा क्रिस्टा, टोयोटा फॉर्च्यूनर आणि महिंद्रा थार आदी गाड्या आहेत. याची एकूण किमत सुमारे 77.62 लाख एवढी आहे. म्हणजे दोघांकडील सर्व वाहने एकूण 4 कोटीहून अधिक रकमेच्या आहेत.

सोने, चांदी आणि गुंतवणूक

अनंत सिंह यांच्याकडे 150 ग्रॅमचं सोनं आहे. त्याची किंमत 15 लाख रुपये आहे. नीलम देवींकडे 701 ग्रॅमचे सोन्याचे दागिने आहेत. त्याची किंमत 62.16 लाख आहे. त्यांच्याकडे 6.3 किलोची चांदीही आहे. त्याची किंमत 9.45 लाख आहे. दोघांच्या सोन्या चांदीची एकत्रित किंमत 86.61 लाख रुपये एवढी होते. अनंत सिंह यांनी बाँड, शेअर बाजार आणि विविध कंपन्यांमध्ये 10.40 कोटींची गुंतवणूक केली आहे. पत्नी नीलम देवी यांनी सुमारे 21 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे.

गायी, म्हशी आणि घोडे

अनंत सिंह यांना जसा महागड्या गाड्यांचा शौक आहे, तसाच त्यांना घोडे पाळण्याचाही शौक आहे. त्यांना घोडेस्वारीचाही छंद आहे. त्यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे घोडे, गायी, म्हशी आणि हत्ती असल्याचा उल्लेख आहे. या सर्वांची किंमत 1 लाख 90 हजार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us