गोकुळ अध्यक्ष निवडीआधी मोठा ट्विस्ट, हसन मुश्रीफांना मोठा धक्का, सतेज पाटलांच्या भूमिकेनं महायुतीचं टेन्शन वाढलं
गोकुळ अध्यक्ष निवडीत मोठा निर्माण ट्विस्ट झालाय. सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीने शासन नियुक्त संचालकांवर आक्षेप घेतला आहे.

गोकुळ अध्यक्ष निवडीत मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. एकीकडे गोकुळच्य अध्यक्ष निवडीसाठी 4 शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार बहाल केला आहे. कोर्टाच्या निर्णयाने महायुतीचा आत्मविश्वास बळावल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता होणार्या निवडणुकीत चारही संचालक हे मतदान करणार आहेत. परंतु या संचालकांच्या मतदानावरील अधिकारावर सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीने आक्षेप घेतला आहे. समविचारी आघाडीच्या आक्षेपामुळे महायुतीचं टेन्शन वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे. समविचारी आघाडीच्या आक्षेपामुळे आता निवडणूक होणार का, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
